काही मंत्र्यांनी रिक्षा चालवली, पण तुम्ही…; भाजप नेत्याची संजय राऊतांवर कडवी टीका
काही मंत्र्यांनी रिक्षा चालवली आहे. पण तुम्ही जुगाराच्या अड्ड्यावर बसायचे, अशा शब्दात भाजप नेत्यांनी संजय राऊतांवर कडवी टीका केली.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि सत्तांधाऱ्यांवर जोरदार टीका केली. कालच्या राहुल गांधी यांच्या कार्यक्रमावरून सत्ताधाऱ्यांनी जोरदार टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. फडणवीसांनी टीकेचे बाण राहुल गांधी यांच्यावर सोडले. परंतु संजय राऊतांनी राहुल गांधींवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच निशाणा साधला. त्यानंतर राऊतांच्या टीकेचा समाचार नवनाथ बन यांनी घेतला. संजय राऊत हे जुगाराच्या अड्ड्यावर बसत होते, अशा शब्दात भाजपने राऊतांवर टीका केली.
भाजप नगरसेवक नवनाथ बन म्हणाले, ‘राजीव गांधी यांच्यानंतर सोनिया गांधी, सोनिया गांधी यांच्यानंतर राहुल गांधी…हा तुमचा घराणेशाहीचा इतिहास आहे. भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य कार्यकत्यांना संधी देते. संजय राऊतांनी सांगावं की, काँग्रेसमध्ये कोणत्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली हे सांगावे. देवाभाऊ कोणत्याही धर्मांत वाद लावत नाही. तर ते पुढे घेऊन जायचं काम करतात. देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात तरुणांसोबत संवाद साधला. राहुल गांधींची कॉपी करण्याची आम्हाला गरज नाही. 2025 चं आंदोलन नव्हतं, त्यावेळीही वरळीच्या डोममध्ये देवाभाऊंनी तरुणांशी संवाद साधला होता. प्रथम मतदार हे देवाभाऊ आणि पंतप्रधान मोदींना मतदान करत आहेत. 2029 साली देखील पहिल्यांदा मतदान करणारे आणि जेन-झी भाजपला आशीवार्द देतील’.
नवनाथ बन यांची संजय राऊतांवर टीका
‘काही मंत्री रिक्षा चालवत होते. काही जण पान टपरी चालवत होते, हे सत्य आहे. परंतु संजय राऊत तुम्ही भांडुपच्या गाढव नाक्यावर बसून दलाली करत होता. तुम्ही दलाली करून राजकारणात आला. तुम्ही नाक्यावर जुगाराच्या अड्ड्यावर बसत होता. हा इतिहास तुम्हाला माहिती आहे. जुगाराच्या अड्डयावर बसलेले संजय राऊत आहेत. रिक्षा चालवून आणि सर्वसामान्य कुटुंबातून आलेले अनेक मंत्री आहेत. सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम भाजपने (bjp) केलं आहे. तुम्हाला ते जमणार नाही, अशा शब्दात नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर (Sanjay raut ) टीका केली.