माकडासारख्या उड्या….बारा पक्ष फिरलेला माकडछाप….भाजप नेत्याचा एकेरी शब्दात रविंद्र धगेंकरांवर जिव्हारी लागणार वार
बारा पक्ष फिरलेला माकडछाप म्हणत भाजप नेत्याने रविंद्र धगेंकरांवर जिव्हारी लागणार वार केला आहे. नवनाथ बन यांनी एकेरी शब्दात रविंद्र धंगेकर यांच्यावर टीका केली.

विधानपरिषदेच्या निकालानंतर महायुतीच वाद पेटला आहे. नवनाथ बन यांनी काल विधानपरिषदेतील पराभवाचं खापर शिंदे गटावर फोडलं. पुण्यातील पदवीधर मतदारसंघातील भाजपच्या पराभवावरून भाजप नेते नवनाथ बन यांनी शिंदे गटाचे रविंद्र धंगेकर यांच्यावर गंभीर आरोप केला. रविंद्र धंगेकर यांच्या भूमिकेने भाजपला फटका बसल्याचा आरोप बन यांनी केला. या निकालावरून नवनाथ बन आणि रविंद्र धंगेकर यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका केली. त्यानंतर आज शुक्रवारी देखील भाजपच्या नवनाथ बन यांनी शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांच्यावर जहरी टीका केली आहे. बारा पक्ष फिरलेला माकडछाप म्हणत नवनाथ बन यांनी शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांच्यावर निशाणा साधला.
नवनाथ बन यांनी म्हटलं की, ‘ज्यांनी 12 पक्ष फिरून वेगवेगळ्या पक्षात फिरून शिवसेनेत प्रवेश केला. बारा पक्ष फिरलेला माकडछाप व्यक्ती अतिशय खालच्या भाषेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , भाजपवर आणि माझ्यावर टीका करत आहे. ज्यांना एक पक्षात करिअर करणे जमलं नाही. करिअर करण्यासाठी बारा पक्ष फिरून शिवसेनेत आले. तुमचा माकडछाप ब्रँड हा पुणेकरांना दाखवून दिला. या माकडछाप ब्रँडच्या व्यक्तीला पुणेकरांनी घरी बसवलं. या माकडछापला विधानसभेतही घरी बसवलं. जेव्हा पुणे महापालिकेची निवडणूक झाली, त्यावेळी कुटुंबातील दोघांचं डिपॉझिट जप्त झालं. असा व्यक्ती भाजप आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करत आहे. ज्यांचा ब्रँड माकडछाप आहे. माकडाच्या हातीत कोलीत…अशी त्यांची अवस्था …बारा घरी जाऊन करिअर करता आलं नाही. बारा घरी जाऊन धुणीभांडी करून करिअर सेट करू शकले नाहीत. पुणे महापालिकेत मुलाचं डिपॉझिट वाचवता आले नाही. एवढचं त्याला सांगायचं आहे की, त्यांनी भाजपला शहाणपण शिकवू नये’.
‘माझ्या पाठीमागे कमळ आहे. त्याच्या पाठीमागे पंजा, रेल्वे इंजिन , धनुष्यबाण उद्या शिटी येईल. तुला एकाही पक्षात कुणीही किंमत दिली नव्हती. कधी काँग्रेस, मनसे आणि शिवसेना….उद्या उबाठामध्ये जाईल. मी 12 वर्ष अखिल भारतीय विद्यार्थी सेनेचा कार्यकर्ता होतो. त्यानंतर पत्रकारिता केली. भाजपचे कमळ हातात घेऊन काम करत आहे. तुमच्यासारखं 12 पक्ष आणि चिन्ह …बारा घरे फिरून करिअर सेट करण्यासाठी आलो नाही. करिअर सेट न झाल्याने बारा पक्ष फिरतात. आता माकडासारख्या उड्या मारत आहे. माकडछाप व्यक्तीकडे लक्ष देऊ नये, अशी टीका नवनाथ बन यांनी रविंद्र धंगेकर यांच्यावर केली.