AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी: भुसावळमध्ये जयंत पाटलांच्या गाड्यांचा ताफा अडवला; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याविरोधात रोष

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्याविरुद्ध स्थानिक पातळीवर असलेल्या नाराजीतून हे आंदोलन करण्यात आल्याचे समजते. | Jayant Patil

मोठी बातमी: भुसावळमध्ये जयंत पाटलांच्या गाड्यांचा ताफा अडवला; राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याविरोधात रोष
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर आंदोलकांनी संतोष चौधरी यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर जयंत पाटील यांनी गाडीतून खाली उतरत आंदोलकांशी संवादही साधला.
| Updated on: Feb 12, 2021 | 6:56 PM
Share

जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या गाड्यांचा ताफा शुक्रवारी भुसावळमध्ये अडवण्यात आला. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जगन सोनवणे यांच्यासह इतर 10 संघटनांच्यावतीने आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्याविरुद्ध स्थानिक पातळीवर असलेल्या नाराजीतून हे आंदोलन करण्यात आल्याचे समजते. (NCP Jayant Patil parivar samvad yatra in Bhusawal)

यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर आंदोलकांनी संतोष चौधरी यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर जयंत पाटील यांनी गाडीतून खाली उतरत आंदोलकांशी संवादही साधला.

जयंत पाटलांच्या स्वागताच्या बॅनर्सवरुन नाथाभाऊ गायब

भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना गुरुवारी पहिल्यांदाच पक्षातील अंतर्गत गटबाजीचा अनुभव आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली काढण्यात आलेली परिवार संवाद यात्रा सध्या जळगावात आली आहे. या पार्श्वभूमीवर जळगावात राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांच्या स्वागताचे बॅनर्स लावले होते.

मात्र, यापैकी एकाही बॅनरवर एकनाथ खडसे यांना स्थान देण्यात आलेले नाही. राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाने उत्तर महाराष्ट्रात पक्षाचा विस्तार करण्याची जबाबदारी एकनाथ खडसे यांच्यावर सोपविली आहे. अशावेळी स्वागताच्या फलकावर त्यांचाच फोटो न लावण्यात आल्याने प्रचंड चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक पातळीवरील गटबाजीतून हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, शुक्रवारी सकाळी एकनाथ खडसे यांचे छायाचित्र असलेली बॅनर्स लावण्यात आल्याने हा वाद निवळल्याचे समजते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लावलेले 107 बॅनर्स उतरवले

जयंत पाटील यांच्या दौऱ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भुसावळमध्ये लावलेले तब्बल 107 बॅनर्स नगरपालिकेकडून खाली उतरवण्यात आले आहेत. भुसावळ नगरपालिकेवर भाजपचे वर्चस्व आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शुभेच्छा फलक लावण्यासाठी मागितलेली परवानगी देखील इलेक्ट्रिकल पोलचे कारण पुढे करून परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे भुसावळमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचंड संतापले आहेत. परिणामी सध्या भुसावळमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

संबंधित बातम्या:

..तर राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष होण्यास उशीर लागणार नाही- खडसे

खडसेंची राष्ट्रवादीत एन्ट्री झाल्यानंतर जयंत पाटील पहिल्यांदाच जळगाव दौऱ्यावर, अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश, भाजपला रोखण्याची रणनिती!

शरद पवार यांनी पक्षात घेतलं नसतं, तर मी राजकारणातून बाद झालो असतो – एकनाथ खडसे

(NCP Jayant Patil parivar samvad yatra in Bhusawal)

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.