AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार यांनी स्वत:च्या मुलास फटकारले, गुंड गजा मारणे याच्या भेटीवर अजितदादांची काय प्रतिक्रिया

Ajit Pawar and Parth Pawar | कुख्यात गुंड गजानन मारणे याची अजित पवार यांचे पुत्र रोहित पवार यांनी भेट घेतली. त्या भेटीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली. आता या प्रकरणात अजित पवार यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी पार्थ याला फटकारले आहे.

अजित पवार यांनी स्वत:च्या मुलास फटकारले, गुंड गजा मारणे याच्या भेटीवर अजितदादांची काय प्रतिक्रिया
| Updated on: Jan 26, 2024 | 1:53 PM
Share

पुणे, दि.26 जानेवारी 2024 | उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी कुख्यात गुंड गजानन मारणे याची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यावर विरोधकांकडून टीका होऊ लागली. कारण कुख्यात गुंड शरद मोहोळ याची 5 जानेवारीला हत्या झाली होती. त्या प्रकरणात मारणे टोळीचा म्होरक्या गजा उर्फ गजानन मारणे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी गजानन मारणे याची भेट घेतल्यामुळे चर्चा सुरु झाली. या प्रकरणात आता अजित पवार यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी स्वत:च्या मुलास फटकारले आहे, असे अजिबात घडता काम नये, याबाबत मी पार्थशी बोलणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले.

नेमके काय म्हणाले अजित पवार

पार्थ आणि गजा मारणे यांची भेट म्हणजे अत्यंत चुकीची घटना आहे. मी त्याच्याबद्दल माहिती घेत आहे. पार्थसोबत जे कार्यकर्ते गेले, ते त्याला तिथे घेऊन गेले. असा प्रकार अजिबात घडता कामा नये. पार्थशी माझी भेट झाल्यावर त्याला मी सांगणार आहे. माझ्याकडून एकदा अशी घटना घडली होती. पण जेव्हा मला कळले त्यादिवशी त्या व्यक्तीला पक्षातून काढले, अशी आठवण अजित पवार यांनी सांगितली.

कोण आहे गजा मारणे

गजानन मारणे याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे. तो मारणे टोळीचा मुख्य म्होरक्या आहे. पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणामध्ये त्याला अटक झाली होती. या खून प्रकरणात तो तीन वर्ष येरवडा कारगृहात होता. पार्थ पवार गजा मारणे याला भेटले तेव्हा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर आणि माजी महापौर दत्ता धनकवडे उपस्थित होते.

रोहित पवार यांनी इव्हेंट केला

आमदार रोहित पवार यांची ईडी चौकशी म्हणजे त्यांनी इव्हेंट केल्याचा प्रकार आहे. माझी पण एसीबी चौकशी झाली होती. पाच तास ही चौकशी झाली होती. आयकर विभागाचे लोकही आले होते. पण आम्ही कधी इव्हेंट केला नाही. लोक जमा केली नाही. कोणी काय करायचे हा त्यांचा अधिकार आहे. तसेच कोणी काय आरोप करायचे हा ज्यांचा त्यांचा अधिकार आहे. चौकशीसाठी ज्याला आदेश येतात त्याला चौकशीला बोलावले जाते. त्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.