
मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 152 व्या जयंतीच्या मुहूर्तावर अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी गोडसे या चित्रपटाची घोषणा केली आहे. मांजरेकरांच्या या नव्या चित्रपटामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटाला राज्यातील वेगवेगळे पक्ष तसेच संघटनांनी विरोध दर्शविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी तर महेश मांजरेकर यांना या चित्रपटाची निर्मिती करुन देणार नाही अशी भूमिका घेतली आहे.
“चित्रपट निर्माता व अभिनेता असलेले महेश मांजरेकर यांनी गांधी जयंती निमित्त नवीन “गोडसे”नावाच्या चित्रपटाची घोषणा केली. त्या चित्रपटाचे टिझर त्यांनी गांधी जयंतीच्या मुहूर्तावर रिलीज केले. त्यांनीच घोषणा केलेला सिनेमा हा महेश मांजरेकर यांच्या वैचारिक पातळीचे निदर्शक आहे. महात्मा गांधीच्या जयंतीदिनी त्यांचाच मारेकरी असलेला नथुराम गोडसेच्या आयुष्यावर सिनेमा निर्माण करण्याचा घाट महेश मांजरेकर यांनी घातला आहे, अशी टीका बाबासाहेब पाटील यांनी केलीय.
तसेच, महेश मांजरेकर यांनी “मी शिवाजी राजे भोसले बोलतो” हा सिनेमा तयार केला. शिवाजी महाराजांच्या आधुनिक विचारांचा वारसा लाभलेला विषय मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला होता आणि त्यात ते यशस्वी झाले होते. दरम्यान नथुराम गोडसेच्या नावाने चित्रपट निर्मिती करण्यामागे विकृत मानसिकता असलेल्या काही यंत्रणेचा हात असल्याची शक्यता आहे. महात्मा गांधीच्या लोकप्रियतेला ठेच पोहोचवून त्यांचा प्रति द्वेष निर्माण करून नथुराम गोडसेला हिरो करण्याचा प्रयत्न होत नाही ना ? अशी शंका उपस्थित होत आहे,” असेदेखील बाबासाहेब पाटील म्हणाले आहेत.
तसेच अशा प्रकारच्या सिनेमातून महेश मांजरेकर काय साध्य करू इच्छितात याचा खुलासा त्यांनी करावा. महाराष्ट्राच्या मातीत अशा विकृत मानसिकता असलेल्या व्यक्तीचे उदात्तीकरण करण्याचे काम केले तर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कदापी खपवून घेणार नाही. त्यामुळे लोकांच्या भावनेला ठेच पोहोचेल असे कोणतेही कृत्य करू नये, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, मांजरेकर यांनी चित्रपटाची घोषणा केल्यानंतर मोठे वादंग निर्माण झाले असले तरी त्यांच्याकडून अद्याप स्पष्टीकरण आलेले नाही. राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीदेखील मांजरेकरांच्या या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे.
इतर बातम्या :
शाहरुख खानच्या मुलाला ताब्यात घेतल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया, आर्यन खान…
माझ्या मुलीच्या पराभवामागे गिरीश महाजनच; नाथाभाऊंचा गंभीर आरोप
चतु:श्रृंगी मंदिरात गुरुवारपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात; मंदिर प्रशासन सज्ज, ऑनलाईन दर्शनाची
Manoj Bajpayee’s father | ‘फॅमिली मॅन’च्या वडिलांचे निधन, दीर्घ काळापासून होते आजारी, दिल्लीमध्ये घेतला अखेरचा श्वास https://t.co/1nVdu4OoUO #ManojBajpayee | @BajpayeeManoj
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 3, 2021
(ncp leader babasaheb patil opposed mahesh manjrekar film godse said will not allow to produce film)