सर्वात मोठी बातमी… नवाब मलिक यांना कोर्टाचा मोठा दणका… दाऊदच्या मालमत्ता प्रकरणात नेमकं काय घडलं?

नवाब मलिक यांचे नाव थेट मनी लाँड्रिंग प्रकरणात आले आणि त्यांना थेट कोर्टात जाण्याची वेळ आली. सध्या नवाब मलिक हे जामिनावर बाहेर आहेत. आता नुकताच कोर्टामधील सुनावणीमध्ये नवाब मलिक यांना मोठा दणका कोर्टाने दिलाय.

सर्वात मोठी बातमी... नवाब मलिक यांना कोर्टाचा मोठा दणका... दाऊदच्या मालमत्ता प्रकरणात नेमकं काय घडलं?
Nawab Malik
| Updated on: Nov 18, 2025 | 3:52 PM

राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांना मुंबई सत्र न्यायालय विशेष एमपी एमएलए कोर्टाने मोठा दणका दिला. नवाब मालिकांविरोधात कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोप निश्चित झाले आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी मोठी अपडेट आहे. याच प्रकरणी नवाब मलिक यांना 2022 मध्ये अटक झाली होती. सध्या नवाब मलिक जामिनावर बाहेर आहेत. दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर, सलीम पटेल,  1993 च्या मुंबई स्फोटाचा आरोपी सरदार खान आणि नवाब मलिक यांनी गोवावाला कम्पाउंडमधील मुनीरा प्लंबर या महिलेची तीन एकर जमीन कट रचून बळकावल्याचा आरोप होता.

नवाब मलिक मनी लाँड्रिंग प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयात विशेष कोर्टात 3 वाजता सुनावणी झाली. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या कोर्टासमोर मलिक यांच्या वकिलाने विनंती केली. या प्रकरणात आम्ही मुंबई हायकोर्टासमोर काही आवश्यक कागदपत्रे ईडीकडून मागितले आहेत. मात्र, न्यायालयाने पुन्हा 3 वाजता आरोप निश्चितसाठी पुन्हा सुनावणी ठेवली होती. न्यायालयाने त्यांना या प्रकरणात दोषी ठरवले आहे. आता डिसेंबर 19 ला पुढील सुनावणी होणार आहे.

न्यायालयीन सुनावणीदरम्यान, नवाब मलिक यांच्या वकिलांनी सांगितले की, आम्ही या प्रकरणाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील मागील सुनावणी दरम्यान, एएसजी अनिल सिंग यांनी उच्च न्यायालयाला सांगितले होते की ते आरोपी पक्षाला या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे प्रदान करतील आणि तोपर्यंत आरोप निश्चित केले जाणार नाहीत. मात्र, न्यायालयाने या विधानावर नाराजी व्यक्त केली आणि म्हटले की, माझ्या खंडपीठाच्या वतीने कोणी कसे विधान करू शकते? हे बरोबर नाही.

त्यानंतर आरोपीच्या वकिलांनी उच्च न्यायालयाचा निर्णय जाहीर होईपर्यंत किंवा सरकारी वकील निवेदन देईपर्यंत आरोप निश्चित करणे पुढे ढकलण्याची विनंती केली. मात्र, सत्र न्यायालयाचे न्यायाधीशांनी कठोरपणे म्हटले की, कोणत्याही प्रकरणात चार आठवड्यांच्या आत आरोप निश्चित करण्याचे उच्च न्यायालयाने स्पष्टपणे निर्देश दिले आहेत. आमच्या खंडपीठावर आधीच मोठा खटला आहे. आता नवाब मलिक यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाल्याचे बघायला मिळतंय.