AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘व्हीप बजावण्यापूर्वी पडद्याआड बऱ्याचशा गोष्टी घडल्या’, सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. यावेळी त्यांनी व्हीपबद्दल मोठा दावा केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर आज निवडणूक आयोगात सुनावणी पार पडत आहे. या सुनावणीसाठी ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर दाखल झाले तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

'व्हीप बजावण्यापूर्वी पडद्याआड बऱ्याचशा गोष्टी घडल्या', सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Nov 24, 2023 | 4:54 PM
Share

नवी दिल्ली | 24 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर आज केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी पार पडत आहे. या सुनावणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे खासदार सुनील तटकरे निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दाखल झाले. ते निवडणूक आयोगाबाहेर दाखल झाले तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना अविश्वासाच्या ठरावावेळी अजित पवार गटाच्या आमदारांनी सरकारच्या बाजूने मतदान केल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता सुनील तटकरे यांनी त्यावेळी नेमकं काय घडलं होतं, याबाबत भाष्य केलंय. मतदानाचा व्हीप बजावण्यावेळी पडद्यामागे काही घडामोडी घडल्या होत्या, असा दावा सुनील तटकरे यांनी केलाय.

“मी सुप्रिया सुळे यांचं कालचं स्टेटमेंट पाहिलं. नरेंद्र मोदी सरकारवर अविश्वासाचा ठरावावर लोकसभेत चर्चा झाली होती. खरंतर मी आज सर्व गोष्टी उघड करणार नाही. पण व्हीप बजावण्यापूर्वी पडद्याआड बऱ्याचशा गोष्टी घडल्या होत्या. त्या मलाही ज्ञात आहेत. कदाचित जयंत पाटील यांच्याशी आपल्यापैकी कुणी संपर्क केला नाही. जयंत पाटील यांनी त्या चर्चचं विश्लेषण केलं तर ठीक राहील. नाहीतर काळ्या चौकामध्ये मी सुद्धा बोलेन”, असा इशारा सुनील तटकरे यांनी दिला.

‘आम्ही एनडीएत सहभागी झालो असल्यामुळे…’

“दुसऱ्या दिवशी चर्चा झाली ती अविश्वास प्रस्तावावर होती. ज्यावेळेला अविश्वासाच्या ठरावावर मतदानाची वेळ आली त्यावेळी प्रत्यक्ष मतदानाची वेळ आली नाही”, असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं. “आम्ही एनडीएत सहभागी झालो असल्यामुळे सरकारच्या विरोधात ज्यावेळेला प्रस्ताव येतो, त्यावेळेला आम्ही सरकारच्या बाजूने असल्यामुळे सरकारच्या बाजूनेच मतदान केलं असतं हे स्पष्ट आहे. त्यात दुमत नाही. निर्भया प्रकरण झाल्यानंतर मनमोहन सिंह सरकारवर ज्यावेळी अविश्वासाचा प्रस्ताव आला होता त्यावेळी सरकार पक्षामध्ये असताना खासदारांनी कोणाच्या बाजूने मतदान केल्या होत्या?”, असा सवाल सुनील तटकरे यांनी केला.

‘महिला विरोधी सातत्याने म्हणणं चुकीचं’

“केवळ टीका कराव्यात यासाठी जाणीवपूर्वक काही गोष्टी बोलल्या जातात. दुसरी गोष्ट सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महिला आरक्षणाच्या विधेयकाचा वेळेला मी मतदान केलं नाही. खरं आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण पूर्णपणे ऐकलं. मी वारंवार सांगितलंय की, गणेशोत्सवाचा पहिला दिवस होता, त्यामुळे मला जाणं आवश्यक होतं. लोकसभेचे 542 सदस्य होते. मतदानात सहभागी झालेल्या सदस्यांची संख्या 480 होती. त्यामुळे उरलेले सगळे महिला विरोधी आहेत, असं सातत्याने म्हणणं चूक आहे”, असं प्रत्युत्तर सुनील तटकरे यांनी दिलं.

“स्वत:चं अपयश झाकण्यासाठी नैराश्यापोटी दुसऱ्यावर असे आरोप केले जातात, त्यावेळेला अशी स्थिती निर्माण झालेली बघायला मिळते”, असा टोला सुनील तटकरेंनी लगावला. “आम्ही 5 जुलैला राज्यव्यापी शिबिरआ बोलावलं होतं त्यावेळी अजित पवारांनी विस्तृतपणे भूमिका मांडली होती. आता आमचं 30 आणि 1 तारखेला राज्यव्यापी शिबिर आहे. त्यावेळी स्पष्टपणाची भूमिका आपल्याला पाहायला मिळेल”, असं सुनील तटकरे यांनी सांगितलं.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी