मी असल्या प्रकरणाने घाबरणार नाही, रुपाली ठोंबरे पाटील यांचा निर्धार

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आणि रुपाली चाकणकर यांच्यात आता वाद पेटला आहे. रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर गुंड घालून मारहाण केल्याचा आरोप माधवी खंडाळकर यांनी केल्यानंतर आता घुमजाव केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आणि महिला प्रदेशाध्यक्ष आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या दोघींमध्ये चांगलीच जुंपली आहे. रुपाली ठोंबरे पाटील यांनी गुंड पाठवून आपल्या मारहाण केल्याचा दावा माधवी खंडाळकर यांनी फेसबुक लाईव्ह करुन केला होता. त्यानंतर या महिलेने पुन्हा हा दावा मागे घेतला होता. आता या महिलेने तिसरा व्हिडीओ टाकत दुसरा व्हिडीओ दबावाखाली केला असे म्हटल्याने वाद वाढला आहे.  माधवी खंडाळकर यांना चाकणकर यांनीच फूस लावल्याचा आरोप करत रुपाली ठोंबरे पाटील यांनी मला अटक करा असे म्हणत पोलिस ठाण्यात सिनियर पीआयशी शाब्दीक वाद केल्याचे उघडकीस आले आहे.

राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी बीडच्या डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणात त्यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन पीडीत महिलेच्या नातेवाईकांना नेते अजित पवार यांच्याशी फोनवरुन संवाद करुन दिला होता. त्यावेळी महिला डॉक्टरच्या नातेवाईकांनी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात अजितदादांकडे नाराजी व्यक्त केली होती. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी संपदा मुंडे यांच्या चारित्र्यांवर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका होत असतानाच आता रुपाली ठोंबरे पाटील यांनी वचपा काढल्याचे समोर आले होते.

रुपाली ठोंबरे पाटील यांनी गुंड पाठवून मारहाण केल्याच्या माधवी खंडाळकर यांनी आरोप केल्यानंतर त्यांनी नंतर माघार घेतली होती. परंतू दुसरा व्हिडीओ मी दबावाखाली केल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता या आरोपामागे कोणाचे षडयंत्र आहे असा सवाल रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला आहे. रुपाली ठोंबरे पाटील यांनी आरोप करताना म्हटले की रुपाली चाकणकर बेजबाबदार व्यक्ती आहेत. चाकणकरांना नाचता येत नाही अंगण वाकडं आहे. त्यांना त्या पदाचे गांभीर्य नसते, त्यांना चांगलं काम करता येत नाही. चाकणकरांना पहावत नाही, आताचा एक दाखला आहे, आणि आधीचा एक दाखला आहे. रूपाली चाकणकरांनी अशाच काही महिलांचे मानसिक आणि शारीरिक शोषण केले आहे. त्या महिला पक्ष सोडून देतात त्यांची नावे सुध्दा मला माहीती आहे. त्यांची पक्षाच्या वरिष्ठांकडे तक्रार सुध्दा केली आहे असेही रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटले आहे.

मी साम दंड भेद वापरणार

माधवी खंडाळकर यांना सांगायला त्या विसरल्या का ? मी बीडला गेले आहे. माधवी रणधीर माझी लहाणपणाची व्हॉलीबॉल खेळातील मैत्रीण आहे. चाकणकरांचा यावेळी गडी चुकला, तो मी परतून लावला आहे. चाकणकर यांची मी कुणाकडे तक्रार करणार नाही, मी साम दंड भेद वापरणार आहे.चाकणकरांनी नैतिकतेने पदाचा राजीनामा द्यावा
चाकणकरांच्या चुकीच्या गोष्टींसाठी पक्षाने किंवा आम्ही का भोगावे ? असा सवाल ही रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला आहे.

माधवीचे रक्त होते की कुंकवाचे पाणी ?

पिडीताच्या नातेवाईक, बीडमधील लोकांचा चाकणकरांवर आरोप आहे. चाकणकरांना कट कारस्थान करायची सवय आहे, मी असल्या प्रकरणाने घाबरणार नाही. माझी बदनामी करण्यासाठी हे सगळ होतं आहे. माधवीचे रक्त होते की कुंकवाचे पाणी होते, आजच्या व्हिडीओमध्ये काय दिसत नव्हते ? कायदेशीर कारवाईने मी दाखवुन देणार आहे. दरम्यान, रूपाली ठोंबरे पाटील यांच्या बहिणीसह चार जणांविरुद्ध खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. त्यामुळे रुपाली पाटील ठोंबरे यांनी पोलिस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षकांशी वाद घातला आहे.