
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार आणि पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजीव देशमुख यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे. राजीव देशमुख यांच्या निधनामुळे राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. राजू देशमुख हे चाळीसगाव विधानसभेचे माजी आमदार होते, 2009 ते 2014 या कार्यकाळात राजू देशमुख हे विधानसभेचे सदस्य होते, मात्र त्यानंतर 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी अशी राजीव देशमुख यांची ओळख होती.
राजीव देशमुख यांनी वयाच्या 55 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला, त्यांना अचानक अस्वस्थ जाणवू लागल्यानं धुळे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. परंतु रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात त्यांनी आपल्या नेतृत्वानं एक वेगळं स्थान निर्माण केलं. ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष होते, तसेच 2009 ते 2014 या कार्यकाळात राजू देशमुख हे विधानसभेचे सदस्य देखील होते.
शरद पवारांचे विश्वासू म्हणून ओळख
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या उठावानंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती, अनेक बड्या नेत्यांनी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांना पाठिंबा दिला, मात्र दुसरीकडे राजीव देशमुख यांनी शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला, शरद पवार यांचे निकटवर्ती म्हणून राजीव देशमुख यांना ओळखलं जायचं, त्यामुळे पक्षात त्यांना महत्त्वाचं स्थान होतं. पक्षाने त्यांच्यावर प्रदेश उपाध्यक्ष पदासारखी मोठी जबाबदारी देखील सोपवली होती.
राजू देशमुख हे चाळीसगाव विधानसभेचे माजी आमदार होते, ते 2009 ते 2014 या कार्यकाळात विधानसभेचे सदस्य होते. मात्र त्यानंतर 2014 साली झालेल्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीकडून राजू देशमुख यांच्या नावाची चर्चा होती, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे.