AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar Health Update: शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, कशी आहे प्रकृती?

Sharad Pawar Health Update: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक (Ruby Hall Clinic) या रुग्णालयात अॅडमिट होते. तिथून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांना तपासणीसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आले आहेत.

Sharad Pawar Health Update: शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, कशी आहे प्रकृती?
| Updated on: Feb 25, 2026 | 4:35 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची काही दिवसांपूर्वी प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक (Ruby Hall Clinic) या रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले होते. त्यांच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज सकाळी शरद पवार यांना रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज देण्यात आला. आता नियमित तपासणीसाठी शरद पवार हे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत.

आज सकाळीच पुण्यातील रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

22 फेब्रुवारी रोजी शरद पवार यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना उलट्या सुरु झाल्या होत्या. उलट्या होत असल्यामुळे शरद पवार यांना डीहायड्रेशन झाले आहे. त्यामुळे पुण्यातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यांच्या सर्व चाचण्यांचे रिझल्ट हे नॉर्मल होते. त्यांना आराम मिळावा यासाठी दोन दिवस रुग्णालयात ठेवण्यात आले होते.

पुढील 2 ते 3 दिवस ब्रीच कँडी रुग्णालयात

आज सकाळी शरद पवार यांना पुण्यातील रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ते मुंबईत आले आहेत. मुंबईत आल्यानंतर रुटीन चेकअपसाठी शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या नियमीत केल्या जाणाऱ्या चाचण्या येथे करण्यात येणार आहेत. पुढील दोन ते तीन दिवस त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात ठेवले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Follow Us
CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत
CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत.
कचऱ्याने हैराण नागरिक आक्रमक; MIDC कार्यालयाबाहेर टाकला कचऱ्याचा ढीग,
कचऱ्याने हैराण नागरिक आक्रमक; MIDC कार्यालयाबाहेर टाकला कचऱ्याचा ढीग,.
ठाकरेंचा विश्वासू नेता हे काय बोलून गेला, बड्या खासदाराविषयी केलं सूचक
ठाकरेंचा विश्वासू नेता हे काय बोलून गेला, बड्या खासदाराविषयी केलं सूचक.
महागाईविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार! भायखळ्यात रस्त्यावर उतरले शिवसैनिक
महागाईविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार! भायखळ्यात रस्त्यावर उतरले शिवसैनिक.
आता हातभट्टीला सरकारने थेट...पुण्याच्या दारुकांडानंतर रामदास आठवलेंची
आता हातभट्टीला सरकारने थेट...पुण्याच्या दारुकांडानंतर रामदास आठवलेंची.
विखे लवकरच भिकेला लागणार, संजय राऊतांचा विखे-पाटलांवर घणाघात
विखे लवकरच भिकेला लागणार, संजय राऊतांचा विखे-पाटलांवर घणाघात.
सर्वात मोठी घडामोड! 447.27 कोटींचा तो आदेश रद्द... रिलायन्सला सर्वोच्च
सर्वात मोठी घडामोड! 447.27 कोटींचा तो आदेश रद्द... रिलायन्सला सर्वोच्च.
NEET घोटाळ्याविरोधात रस्त्यावर उतरली युवा काँग्रेस; सरकारविरोधात....
NEET घोटाळ्याविरोधात रस्त्यावर उतरली युवा काँग्रेस; सरकारविरोधात.....
काँग्रेसची शाल घालून सुप्रिया सुळेंच स्वागत; म्हणाल्या, माझा काँग्रेस
काँग्रेसची शाल घालून सुप्रिया सुळेंच स्वागत; म्हणाल्या, माझा काँग्रेस.
लाडक्या बहिणींनी लगेच लक्ष द्या! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय
लाडक्या बहिणींनी लगेच लक्ष द्या! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय.