AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET Paper Leak : नीट प्रकरणात मोठी कारवाई, शिक्षक आणि पालक दोघांना अटक; मोठे धागेदोरे हाती येणार?

देशात गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाची मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात सीबीआयने दोन जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका शिक्षकाचा आणि एका डॉक्टरचा समावेश आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

NEET Paper Leak :  नीट प्रकरणात मोठी कारवाई, शिक्षक आणि पालक दोघांना अटक; मोठे धागेदोरे हाती येणार?
NEET Paper Leak Case
| Updated on: May 27, 2026 | 11:15 AM
Share

सीबीआयने नीट प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पुण्यातून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. एक शिक्षक आणि एक पालक अशा दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांपैकी एकाचा मनिषा हवालदार आणि दुसऱ्याचा मोटेगावकरांशी संबंध असल्याची माहिती पुढे आली आहे. या अटकेमुळे मोठे धागेदोरे हाती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणात अजून कोण कोण आहे? याची कसून चौकशी या दोघांकडून केली जाणार असून पेपरफुटीत या दोघांचा किती सहभाग होता याचाही तपास केला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

सीबीआयने पुण्यातून तेजस शाह नावाच्या  फिजीक्सच्या शिक्षकाला अटक केली आहे. त्याच्या मोबाईलमध्ये गॉड नावाने नंबर सेव्ह होता. शिवाय मनिषा हवालदारकडून त्याने पेपर घेतल्याची माहिती आहे. तो मनिषा हवालदारच्या संपर्कात होता. त्यामुळेच सीबीआयने त्याला अटक केली असून आता त्याची कसून चौकशी केली जाणार आहे. टेलिग्राम ग्रुपमध्येही तो होता का? याचीही माहिती घेतली जाणार आहे. तसेच पेपर फोडल्यानंतर त्याने त्यातून आर्थिक कमाई केली का? याचाही शोध घेण्यात येणार आहे. त्याचं बँक अकाऊंटही तपासलं जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दोन नव्या विद्यार्थ्यांची चौकशी

दरम्यान, सीबीआयने डॉ. मनोज शिरूरे यालाही अटक केली आहे. त्याचा मोटेगावकराशी थेट संबंध असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच नीट पेपर फुटी प्रकरणात लातूर मध्ये सीबीआयच्या पथकाकडून चौकशी सुरूच आहे. नव्याने दोन विद्यार्थ्याची चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे. आता पर्यंत पाच डॉक्टर आणि चार विद्यार्थी, पालकांची चौकशी करण्यात आली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणाशी धागेदोरे कसून तपासले जात आहेत.

मोटेगावकर बोलला

नीट परीक्षेच्या अगोदरच पेपर मिळाल्याची कबुली शिवराज मोटेगावकर याने सीबीायला दिल्याची माहिती आहे. सीबीआयच्या चौकशीत मोटेगावकरने त्याच्या मुलाला नीट परीक्षेच्या अगोदरच पेपर मिळाल्याची कबुली दिल्याची माहिती कळते आहे. सीबीआयने अधिकृतरित्या ही माहिती दिलेली नसली तरी मोटेगावकर याने मुलाला डॉक्टर करण्यासाठी पेपर विकत घेतल्याचे समोर आले आहे. मोटेगावकरला 10 दिवसांची पोलिस कोठडी मिळालेली होती. या दरम्यान झालेल्या चौकशीत मोटेगावकरने नीट परीक्षेच्या अगोदरच पेपर मिळाल्याचे कबूल केले असल्याचे कळते आहे.

बांधकाम पाडणार

दरम्यान, लातूर महानगर पालिकेने मोटेगावकरला दिलेला बांधकाम परवाना वादात सापडला आहे. औद्योगिक सहकारी संस्थेची जागा मोटेगावकरच्या नावावर नसताना देखील बांधकाम परवाना दिला गेल्याचे समोर आले आहे. त्यावर आता आमदार अमित देशमुख यांनी मनपा कठोर कार्यवाही करेल अस म्हटले आहे. कायद्याच्या चौकटीत राहूनच लातूर महानगर पालिकेत कारभार केला जाईल. कायदा बाहेर जाऊन कोणी काम करीत असेल तर त्याच्यावर कार्यवाही होईल अस अमित देशमुख यांनी म्हटलं आहे. ते लातूर इथं माध्यमांशी बोलत होते.

Follow Us
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...