AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात पालकावर पहिल्यांदाच कारवाई, सीबीआयने उचललेला कोण आहे डॉ. मनोज शिरुरे?

नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई करत लातूर येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांना अटक केली आहे. आपल्या मुलासाठी त्यांनी फुटीर पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पालकावरील ही पहिलीच कारवाई असून, शिक्षण व वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात पालकावर पहिल्यांदाच कारवाई, सीबीआयने उचललेला कोण आहे डॉ. मनोज शिरुरे?
कोण आहे डॉ. मनोज शिरुरे ?
| Updated on: May 21, 2026 | 10:42 AM
Share

नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने धडाधड मोठी कारवाई सुरू केली आहे. लातूर, पुणे, नाशिक आणि नांदेडमध्ये धाडसत्र करत सीबीआयने अनेकांची धरपकड केली आहे. कोचिंग क्लासेसनाही टाळं ठोकलं आहे. तसेच धरपकड करण्यात आलेले हे सर्वजण पेपरफुटी प्रकरणाशी संबंधित आहेत. त्यांनीच पेपर फोडून तो विकल्याचा आरोप आहे. मात्र, या प्रकरणात आता मोठी अपडेट येत आहे. सीबीआयने पहिल्यांदाच या प्रकरणात पालकावर कारवाई केली आहे. डॉ. मनोज शिरुरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. कोण आहेत हे मनोज शिरुरे? काय करतात? याचाच घेतलेला हा आढावा.

आरोप काय?

मनोज शिरुरे यांना सीबीआयने लातूरमधून अटक केली आहे. त्याने या प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकर याच्याकडून पेपर घेतल्याचा आरोप आहे. मुलासाठी त्याने पेपर घेतल्याचा आरोप आहे. ही माहिती सीबीआयला मिळताच सीबीआयने त्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात आणि वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. डॉक्टर असलेले पालकही आपल्या मुलांसाठी शॉर्टकटचा मार्ग अवलंबत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

शिरूरे नेमकं काय करतात?

डॉ. मनोज शिरुरे हे बालरोग तज्ज्ञ आहेत. ते मूळचे लातूरचे रहिवशी आहेत. लातूरच्या जुना औसा रोड विभागात त्यांचं सिद्धिविनायक बाल रुग्णालय आहे. त्यांचं रुग्णालय चांगलं चालतंही. नीट पेपरफुटीचं प्रकरण समोर आल्यानंतर गेल्या आठ दिवसापासून लातूरमध्ये सीबीआय तळ ठोकून आहे. सीबीआयने आधी मोटेगावकरांची कसून चौकशी केली आणि त्यानंतर त्याला अटक केली. त्यानंतर त्याच्याकडून सीबीआयने असंख्य माहिती मिळवली. त्याची कडी जोडत सीबीआय डॉ. शिरुरेपर्यंत पोहोचली. सीबीआयने काल संध्याकाळी शिरुरे यांच्या रुग्णालयावर छापा टाकला. त्यानंतर त्यांची साडे चार तास कसून चौकशी केली. त्यांना उलटे सुलटे प्रश्न विचारले. त्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली देताच सीबीआयने त्यांच्या मुसक्या आवळल्या. पालकांवर होणारी ही पहिलीच कारवाई असल्याने लातूरसह अख्खा महाराष्ट्र हादरून गेला आहे.

मोबाईल जप्त…

चौकशी सुरू असतानाच सीबीआयने शिरूरे यांच्याकडील मोबाईल जप्त केला. त्याने कुणाकुणाला संपर्क साधला होता. मोटेगावकरांशी कधीपासून संपर्कात होता आणि कुणा कुणाला नीटचे पेपर विकले का? किंवा व्हायरल केले का? याचा तपास सीबीआय करणार आहे. तसेच त्याच्या रुग्णालयातून सीबीायने महत्त्वाचे कागदपत्रेही जप्त केली आहे. सीबीआयकडून त्याचे बँक अकाऊंटही चेक केले जाणार आहेत. त्याने मोटेगावकरांशी आर्थिक व्यवहार केले होते का? केले होते तर कितीचे केले होते? याची माहिती सीबीआय गोळा करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Follow Us
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, म्हणाले
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांनो, गोधन विकू नका; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, पुढे म्हणाले...
इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
Delhi Protest : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
Thackeray Bandhu : ज्ञानेश कुमार हटाव आंदोलनानंतर ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!