NEET Paper Leak: बापरे! मोटेगावकरचा RCCमधील तो Video आला समोर, नेमकं काय आहे त्यात?
NEET Paper Leak: नीट पेपर फुटी प्रकरणी एक धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. लातूर येथील प्रसिद्ध 'रेणुकाई करिअर सेंटर' (RCC)चे संचालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ते दोन विद्यार्थींनींसोबत संवाद साधताना दिसत आहेत.

देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UGचा पेपर फुटल्यामुळे परिक्षा रद्द करण्यात आली. परिक्षा रद्द झाल्यानंतर लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न एका झटक्यात उद्ध्वस्त झाले. आता सीबीआय या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे लातूरमध्ये सापडले आहेत. लातूरमधील प्रसिद्ध ‘रेणुकाई करिअर सेंटर’ (RCC)चे संचालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांना पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) पुण्यातून अटक केली आहे. दरम्यान, त्यांचा एक व्हिडीओ टीव्ही ९ मराठीच्या हाती लागला आहे. हा व्हिडीओ नेमका काय आहे? जाणून घेऊया…
व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये माटेगावकर हे दोन विद्यार्थीनींना नीट पेपर 2026चा पेपर कसा गेला विषयी विचारताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये ते ‘रेणुकाई करिअर सेंटर’मधील एका विद्यार्थीनीला, RCC मॉकमधून किंवा RCC टेस्टमधून काही प्रश्न आले का? असा प्रश्न विचारताना दिसत आहे. त्यावर ती विद्यार्थीनी, त्याच्या बाहेरचे प्रश्न आलेच नाहीत असे उत्तर देते. त्यानंतर माटेगावकर त्या विद्यार्थीनीला तुम्ही RCCमुळे खूश आहात का? असा प्रश्न विचारतो. त्यावर विद्यार्थीनी हो खूप खूश आहे असे उत्तर देते. त्यानंतर त्या विद्यार्थीनीला बायोलीजीविषयी विचारणा करण्यात येते. त्यावर ती मॅक टेस्टमध्ये जे आलं तेच सर्व परिक्षेत होतं असं बोलताना दिसत आहे.
रेणुकाई करिअर सेंटरमधील व्हिडीओ
व्हिडीओमध्ये पुढे माटेगावकर दुसऱ्या एका विद्यार्थीला कसा गेला बेटा तुला पेपर असे विचारताना दिसत आहे. त्यावर ती विद्यार्थीनी छान, केमिस्ट्री, फिजक्स, बायो सगळे पेपर छान गेल्याचे सांगते. त्यानंतर पुढे ती विद्यार्थीनी तुम्ही जे 101 प्रश्न दिले होते ना त्यामधून जवळपास सर्वच प्रश्न आले होते असे म्हणते. व्हिडीओच्या शेवटी माटेगावकर RCCचे मॉक पेपर मोअर दॅन सफिशिएंट आहेत ना असे बोलताना दिसत आहे.
शिवराज माटेगावकरचा हा व्हिडीओ समोर येताच मोठी खळबळ माजली आहे. या व्हिडीओमुळे माटेगावकरवरील संशय अधिक बळकट होत असल्याचे दिसत आहे. नीट परीक्षेत गेस पेपर कसा जुळला हे त्यांनी या व्हिडिओत सांगितल्या नंतर त्यांच्या बद्दल पोलिसांत एका पालकाने गोपनीय तक्रार दिली. त्यामुळे चौकशी आणखी कसून होत आहे. या व्हिडिओत अनेक प्रश्न जुळल्याचा गेस पेपर देखील दाखविण्यात आला आहे.