State Government : राज्यात नवीन 23 संवर्धन राखीव, 5 अभयारण्ये; वाचा कुठे असतील ही अभयारण्ये?

| Updated on: Jun 15, 2022 | 2:00 PM

राज्य सरकारने पाच अभयारण्यासाठी जागा आरक्षित करण्याचे धोरण आखले आहे. यापैकी कन्हारगाव अभयारण्याची अधिसुचना ही काढण्यात आली असून उर्वरीत अभयारण्याची प्रक्रिया ही सुरु आहे. या पाच अभयारण्यात चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हारगावचा समावेश आहे.

State Government : राज्यात नवीन 23 संवर्धन राखीव, 5 अभयारण्ये; वाचा कुठे असतील ही अभयारण्ये?
सांकेतिक छायाचित्र
Follow us on

मुंबई : वनक्षेत्र वाढले तर (Conservation of environment) पर्यावरणाचे संवर्धन होणार आहे. काळाच्या ओघात पर्यावरणाबाबत जागृत होणे गरजेचे होते पण याकरिताही आता प्रयत्नांची पराकष्टा करावी लागत आहे. त्याअनुशंगाने (Maharashtra) महाराष्ट्राची गेल्या दोन-अडीच वर्षापासून ध्येयवादी वाटचाल सुरु आहे. राज्याच्या सकारात्मक दृष्टीकोनामुळेच वनाचे क्षेत्र तर वाढत आहेच शिवाय (Wildlife) वन्यजीवांचा भ्रमणमार्ग हा मोकळा होताना दिसत आहे. शासनाने नेहमीच पर्यावरणस्नेही विकासाला प्राधान्य दिले असून शाश्वत विकासाचा तो महत्वाचा आधार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले आहे. राज्य सरकारने नव्याने निर्माण केलेल्या 23 संवर्धन राखीव क्षेत्रापैकी 9 राखीव क्षेत्र हे अधिसूचित करण्यात आले आहेत. याबाबत राज्य सरकारने कार्यवाही केली आहे.

पाच अभयारण्ये, एकाची अधिसूचना

राज्य सरकारने पाच अभयारण्यासाठी जागा आरक्षित करण्याचे धोरण आखले आहे. यापैकी कन्हारगाव अभयारण्याची अधिसुचना ही काढण्यात आली असून उर्वरीत अभयारण्याची प्रक्रिया ही सुरु आहे. या पाच अभयारण्यात चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हारगावचा समावेश आहे. याचे क्षेत्र 269.40 चौरस किमी, अंधारी वन्यजीव अभयारण्य 78.40 चौरस मिटर, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई भवानी- 122. 740 चौ.कि.मी, गडचिरोली जिल्ह्यातील कोलामार्का- 175.72 चौ.कि.मी., बुलडाणा जिल्ह्यातील विस्तारीत लोणार वन्यजीव अभयारण्य 86.94 चौकिमी या अभयारण्याची घोषणा करण्यात आली आहे.

नवीन संवर्धन राखील क्षेत्र हे असे

पर्यावरण संवर्धनाच्या अनुशंगाने राज्य सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे. नवीन संवर्धन राखीव क्षेत्र हे ठरविण्यात आले आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी येथील 29.53 चौ.कि.मी, जोर जांभळी हे 65.11 चौ.कि.मी, आंबोली दोडामार्ग 56.92 चौ.कि.मी, विशाळगड 92.96 चौ.कि.मी, पन्हाळगड 72.90 मायणी पक्षी संवर्धन 8.67चौ.कि.मी, चंदगड 225.24 चौ.कि.मी, गगनबावडा 104.39 चौ.कि.मी, आजरा भुदरगड 238.33 चौ.कि.मी, मसाई पठार 5.34 चौ.कि.मी, नागपूर जिल्ह्यातील मुनिया 96.01 चौ.कि.मी, मोगरकसा 103.92 चौ.कि.मी, अमरावती जिल्ह्यातील महेंद्री 67.82, धुळे जिल्ह्यातील चिटबावरी 66.04 चौ.कि.मी, अलालदरी 100.56 चौ.कि.मी, नाशिक जिल्ह्यातील कळवण 84.12 चौ.कि.मी, मुरागड 42.87 चौ.कि.मी, त्र्यंबकेश्वर 96.97 चौ.कि.मी, इगतपुरी 88.50 चौ.कि.मी, रायगड जिल्ह्यातील रायगड 47.62, रोहा 27.30 चौ.कि.मी, पुणे जिल्ह्यातील भोर 28.44 चौ.कि.मी, सातारा जिल्ह्यातील दरे खुर्द 1.07 चौ.कि.मी यांचा समावेश आहे. यातील तिलारी, जोर जांभळी, आंबोली दोडामार्ग, विशाळगड, पन्हाळगड, मायणी, चंदगड, मुनिया आणि महेंद्री ही 9 संवर्धन राखीव क्षेत्र अधिसूचित झाली आहेत.

हे सुद्धा वाचा

ही आहेत जैवविविधता वारसा स्थळे

पुणे जिल्ह्यातील गणेशखिंड 33.01 चौ.कि.मी, धुळे जिल्ह्यातील लांडोरखोरी 48.8 चौ.कि.मी, कोल्हापूर जिल्ह्यातील बांबर्डे मायरेस्टिका 2.59 चौ.कि.मी, आणि शिुस्टुरा हिरण्यकेशी ही चार जैवविविधता वारसा स्थळे मागील अडीच वर्षाच्या काळात घोषित करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या सर्वांची अधिसुचना देऊनही झाल्या आहेत. तर लोणार ला रामसर साईट हा दर्जा देण्यात आला आहे.