निदा खानला वाचवणाऱ्या AIMIM च्या नगरसेवकाचं शिक्षण सातवीच, पण संपत्तीचा आकडा हैराण करणारा
Nida Khan Conversion Case : आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील निदा खानला अटक करण्यात आली आहे. तिला वाचवणाऱ्या AIMIM च्या नगरसेवकाच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. नगरसेवकाच्या संपत्तीचा आकडा देखील आता समोर आला आहे.

Nida Khan Conversion Case : नाशिकमधील प्रसिद्ध आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणात पोलीस कठोर कारवाई करताना दिसत आहे. ज्या AIMIM च्या नगरसेवकाच्या घरात निदा खान हिला लपवून ठेवण्यात आलं होतं, त्या AIMIM च्या नगरसेवकाच्या संपत्तीवर बुलडोझर चढवण्यात आला आहे. या नगरसेवकाचं नाव मतीन पटेल असं असून त्यांचं शिक्षण फक्त सातवी आहे. तर त्यांच्या संपत्तीचा आकडा देखील फार मोठा आहे. मिळालेल्या माहितीनुसार मतीन पटेल यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. पण नोटिशीला पटेल त्यांनी दिलेला खुलासा समाधानकारक नसल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं. उच्च न्यायालयानेही या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिल्याने महापालिकेने त्यांच्या संपत्तीवर कारवाई करण्यास सुरुवात केली.
नाशीक टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान हिला AIMIM चे नगरसेवक मतीन पटेल यांनी आश्रय दिल्याची माहिती समोर आली. मतील पटेल यांनी ज्या बंगल्यामध्ये निदा खान हिला लपवून ठेवलं होतं, तो बंगला बेकायदेशीर असल्याची नोटीस औरंगाबाद महानगरपालीकेने नगरसेवकाला बजावली होती. पालिकेने नोटीशीत असं देखील लिहिलं होतं की, त्यांच्या काही संपत्ती बेकायदेशीररित्या बांधण्यात आल्या आहेत. एवढंच नाही तर, महापौर समीर राजुरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतीन पटेल यांना कारणे दाखवा नोटीस पाठवल्यानंतर, त्यांनी समाधानकारण उत्तर दिलं नाही तर, त्यांच्या संपत्तीवर कारवाई करण्यात येईल असं देखील सांगितलं होतं… शिवाय गैरव्यवहार प्रकरणी नाव समोर आल्यास त्यांची सदस्यता देखील धोक्यात येऊ शकते.. असं देखील सांगण्यात आलं होतं.
मतीन पटेल यांच्या बंगल्यात राहत होती निदा खान…
निदा खान टीसीएस कंपनी धर्मांतर प्रकरणी 10 एप्रिलपासून फरार होती. तिला 7 मे रोजी छत्रपती संभांजीनगर येथील नारेगाव येथील दोन मजल्याच्या बंगल्यातून अटक करण्यात आली. त्याठिकाणी निदा तिच्या चार नातेवाईकांसोबत राहत होती… हा बंगला मतीन पटेल यांचा आहे… असे आरोप करण्यात येत आहेत. अशात कारवाई करत पथकाने बंगल्यावर बुलडोझर चढवला आहे. याप्रकरणी मतीन पटेल आता वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
किती आहे मतीन पटेल यांची संपत्ती?
मतीन माजिद शेख उर्फ माजिद पटेल AIMIM चे नगरसेवक आहेत. मतीन पटेल पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. 35 वर्षीय मतीन माजिद शेख यांनी निवडणूत प्रतिज्ञापत्रात सांगितलं होतं की, त्यांचं शिक्षण सातवी पर्यंत झालं आहे. त्यांनी संपत्तीचा आकडा देखील सांगितला होता. त्यांच्याकडे 86 लाख रुपये किंमतीचे तीन कृषी भूखंड, नारेगाव याठिकाणी 11 लाख रुपयांचं एक गैर-कृषी भूखंड आहे… तर 4 लाख रुपयांचं एक घर आहे… याप्रकरणी पोलीस आता कसून चौकशी करत आहेत.