निलेश घायवळचा पाय आणखी खोलात, पुणे पोलीसांचा थेट UKशी संपर्क, लवकरच अटक होणार?

Nilesh Ghaywal: पुण्यातील कुख्यात गुन्हेगार निलेश घायवळ सध्या फरार आहे. तो बनावट पासपोर्टच्या मदतीने लंडनमध्ये गेला असल्याचे समोर आले आहे. आता त्याला अटक करण्यासाठी पोलीसांनी हालचाली सुरु केल्या आहेत.

निलेश घायवळचा पाय आणखी खोलात, पुणे पोलीसांचा थेट UKशी संपर्क, लवकरच अटक होणार?
nilesh ghaywal
| Updated on: Oct 28, 2025 | 4:25 PM

पुण्यातील कुख्यात गुन्हेगार निलेश घायवळ सध्या फरार आहे. तो बनावट पासपोर्टच्या मदतीने लंडनमध्ये गेला असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला होता. आता त्याच्या अटकेसाठी पुणे पोलीसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. पोलीसांनी UK(United kingdom) हाय कमिशला पत्र लिहित निलेश घायवळला ताब्यात घ्या अशी विनंती केली आहे. त्यामुळे आता निलेश घायवळची अडचण आणखी वाढली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

निलेश घायवळला अटक करण्यासाठी पोलीसांच्या हालचाली

निलेश घायवळ हा बनावट पासपोर्टच्या आधारे लंडनला पळाला आहे. आता त्याला ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलीसांनी UK हाय कमिशला पत्र लिहिले आहे. या पत्रात घायबळवर पुण्यात बरेच गुन्हे दाखल आहेत. त्याला डिटेक्ट करून आम्हाला रिपोर्ट करावं. निलेश घायवळला परत भारतात पाठवावे असं पोलीसांनी पत्रात म्हटले आहे. यानंतर आता UK हाय कमिशनकडून निलेश घायवळचे ट्रॅकिंग सुरू करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

UK हाय कमिशनकडून सकारात्मक प्रतिसाद

निलेश घायवळवर पुण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला भारतात परत पाठवावे असं पुणे पोलीसांनी म्हटलं आहे. आता घायवळ लवकरच भारतात परतणार असल्याचे आश्वासन हाय कमिशनकडून मिळालं असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. याआधी निलेश घायवळविरुद्ध रेड कॉर्नर आणि ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आल्या आहेत. तसेच त्याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला होता. आता त्याला अटक होण्याची शक्यता आहे.

निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी सुरू

निलेश घायवळची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरु आहे. याबाबत बोलताना पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की, निलेश घायवळच्या कुटुंबीयांच्या नावावर जामखेड येथे तब्बल 60 एकर जमिनीचा ठावठिकाणा लागला आहे. त्याची कागदपत्रे आम्हाला मिळालेली. पोलीस अशा कागदपत्रांची चौकशी करत आहेत. जमीन विकणारे कोण आहेत? साक्षीदार कोण आहेत? याची चौकशी सुरू आहे. सविस्तर चौकशीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल.