AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजून बराच साठा आहे… निलेश राणे यांचा विनायक राऊतांना इशारा

Vinayak Raut : माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह त्यांच्या मुलावर सून गिरीजा यांनी गंभीर आरोप केले आहेत. यावर आता शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी भाष्य केले आहे.

अजून बराच साठा आहे... निलेश राणे यांचा विनायक राऊतांना इशारा
Nilesh Rane on Vinayak RautImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 13, 2026 | 7:42 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि सिंधुदुर्गचे माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह त्यांच्या मुलावर सून गिरीजा यांनी गंभीर आरोप केले आहेत. विनायक राऊत, त्यांचा मुलगा गीतेशने खोटं बोलून माझी आणि माझ्या कुटुंबाची फसवणूक केली. माझा मानसिक आणि भावनिक छळ केला. 2017 साली आमचं लग्न झालं. पण 2018 सप्टेंबरपर्यंत आमच्यात शारीरिक संबंध आले नाहीत. माझ्या बरोबर अघोरी कृत्य करण्यात आली. मला वेगवेगळ्या बाबा बुवांकडे नेलं. त्यांनी वेगवेगळे उतारे टाकले होते असा आरोप केले होते. या सर्व प्रकरणावर शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी भाष्य केले आहे.

विनायक राऊत यांचे तोंड काळं झालं – नितेश राणे

या प्रकरणावर बोलताना निलेश राणे यांनी म्हटले की, ‘असे प्रकार विनायक राऊत सातत्याने करत असतात हे आम्ही ऐकून होतो. आता ते प्रकार त्यांच्या घरातील लोकांनी बाहेर काढलेत. आता ते दुसऱ्यांवर बोट दाखवू शकत नाही. माणूस असा असूच शकत नाही, अशी कृत्य विनायक राऊत आणि त्यांच्या मुलाने केलीत. लाज वाटते ते आमच्या जिल्ह्यातले आहेत. आमच्या जिल्ह्याच नाव त्यांनी खराब केलंय. हे कोणी केलेलं षडयंत्र नाही, तुम्ही केलेलं पाप आहे. अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे, त्यांना लाज वाटली पाहिजे. आता त्यांनी आपलं तोंड उघडू नये. एवढ्या खालच्या थराला राजकारणात कोणी गेलेलं नाही. विनायक राऊत हे ह्यापेक्षा खाली जाऊ शकत नाहीत त्याचं तोंड काळ झालेलं आहे.

अजून खूप काही बाहेर येतील – निलेश राणे

पुढे बोलताना निलेश राणे यांनी म्हटले की, त्यांना नियतीने धडा शिकवलाय. काम करण्यापेक्षा त्यांनी आमच्यावर टीका केली. आता त्यांना तोंड लपवायला जागा नाही. कायम त्यांनी राणेंना संपवण्याच टार्गेट त्यांनी केलेलं पण राणे संपले नाहीत. आम्ही असल्या धंद्यात नाही. अजून खूप काही आहे. अनेक लोक त्यांच्यावर उलटणार ज्यांनी तक्रार केली त्यांच्या कडे अजून बराच साठा आहे. आता विनायक राऊत यांनी आपली थोबड बंद करावीत.

विनायक राऊत माझ्यासाठी झिरो…

मनी लाँड्रिंगबाबत बोलताना निलेश राणे यांनी म्हटले की, ‘विनायक राऊत काळाबाजारी माणूस आहे. व्हाईट इन्कम आणि विनायक राऊत यांचा संबंध काय? राणेंवर टीका केली तर मातोश्री खुश होणार, ह्या धंद्यात ते 10 वर्ष राहिलेत. मणी लाँड्रिंगचे 17 लाख मोजू नका 17 करोड पण होऊ शकतील. विनायक राऊत माझ्यासाठी झिरो आहे. माझ्या आयुष्यात किंमत नसलेला माणूस आहे, जे तपासात बाहेर येईल ते थक्क करणारे असेल.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे