‘..अन् लाल किल्ल्यावर शपथ घेण्याचं स्वप्न काही सुटेना’, व्हिडीओ ट्वीट करत नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

आदित्य ठाकरे यांनी पुन्हा दिल्लीच्या तख्ताचा उल्लेख केल्याने त्यावर आता भाजप नेते सडकून टीका करत आहे. आदित्य ठाकरेंनी असे वक्तव्य केल्यानंतर आता नितश राणे (Nitesh Rane) गप्प बसतील, असे होणारच नाही. नितेश राणे यांनीही ट्विट करत लगेच आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.

..अन् लाल किल्ल्यावर शपथ घेण्याचं स्वप्न काही सुटेना, व्हिडीओ ट्वीट करत नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
आदित्य ठाकरेंवर नितेश राणेंची टीका
Image Credit source: tv9
| Updated on: Feb 27, 2022 | 5:28 PM

मुंबई : आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांनी पुन्हा एकदा दिल्लीच्या तख्तावर शिवसेना बसणार असल्याचा पुनरुच्चार केला आहे. शिवसेना नेते संजय राऊत तर रोज सांगतात की येत्या लोकसभेत चित्र पटलणार आहे. आम्ही दिल्लीच्या गादीपर्यंत पोहोचणार आहोत. भाजपवाले बरोजगार होणार आहेत. उद्या आमचीही वेळ येईल असा उल्लेख राऊतांच्या बोलण्यात सर्सास येतो. भाजपकडून (Bjp) आणि केंद्राकडून मुंबईचे महत्व कमी करण्याचा डावा आहे. असा आरोपही शिवसेनेकडून सतत होत आहे. अशातच आदित्य ठाकरे यांनी पुन्हा दिल्लीच्या तख्ताचा उल्लेख केल्याने त्यावर आता भाजप नेते सडकून टीका करत आहे. आदित्य ठाकरेंनी असे वक्तव्य केल्यानंतर आता नितश राणे (Nitesh Rane) गप्प बसतील, असे होणारच नाही. नितेश राणे यांनीही ट्विट करत लगेच आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.

साधा नारळ फुटेना…

नितेश राणे यांनी नेहमीच्या शैलीत खोचक ट्विट करत आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. काही करता साधं नारळ फुटता फुटेना, पण लाल किल्ल्यावर शपथ घ्यायचे स्वप्न काही सूटेना!! अशा आशयाचे ट्विट करत नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात आदित्य ठाकरे नारळ फोडायला संघर्ष करताना दिसून येत आहेत. याच व्हिडिओचा आधार घेत नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार निशाणा साधाल आहे. नितेश राणे हे अनेकदा आदित्य ठाकरेंना टार्गेट करताना दिसून येतात. नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यापासून शिवसेना आणि राणे यांच्यातलं राजकी वैर तर अनेकदा उफाळून आलंय. आणि आताही तेच होताना दिसतंय.

नितेश राणे यांचे ट्विट

आदित्य ठाकरे काय म्हणाले होते?

2024मध्ये आपण सर्व दिल्लीत बसणार म्हणजे बसणारच, असं आदित्य ठाकरे यांनी सकाळीच स्पष्ट केलं. मी दिल्लीत जे बोललो ते उत्तर प्रदेशातही बोललो. इथेही तेच सांगत आहे. महाराष्ट्रातून अनेक गोष्टी हलविण्याचे डाव सुरू आहेत. पण 2024ला शिवसेना तिथे बसेल आणि सगळं थांबवेल. शिवसेना प्रत्येक राज्याला न्याय देईल. केंद्रीय एजन्सीचं जे काम सुरू आहे, ते केवळ प्रचारासाठीच सुरू आहे. कोणतंही राज्या त्याला घाबरणार नाही, झुकणार नाही. प्रत्येक राज्यात शिवसेना निवडणूक लढेल. भूमिपुत्रांना न्याय देई, असंही आदित्य यांनी सांगितलं. आदित्य ठाकरेंच्या याच वक्तव्याचा समाचार राणेंनी घेतलाय.

2024मध्ये शिवसेना दिल्लीत बसणार म्हणजे बसणारच; आदित्य ठाकरेंचा पुनरुच्चार

Russia-Ukraine Crisis : युक्रेनच्या मदतीसाठी फ्रान्ससह काही देश, जर्मनी पाठविणार टँकविरोधी शस्त्र

मराठा मंत्र्यांनी समाजाचा विश्वासघात केलाय, त्यांनी जनाची नाही तर मनाची ठेवावी, राधाकृष्ण विखे पाटलांचा हल्लाबोल