AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Russia-Ukraine Crisis : युक्रेनच्या मदतीसाठी फ्रान्ससह काही देश, जर्मनी पाठविणार टँकविरोधी शस्त्र

एएफपी न्यूज एजन्सी रिपोर्टनुसार, जर्मनी युक्रेनला 1,000 टँकविरोधी शस्त्र, 500 हवेतून मारा करणारे मिसाईल पाठविणार आहे. काही देश युक्रेनच्या बाजूने मदतीसाठी समोर आले आहेत.

Russia-Ukraine Crisis : युक्रेनच्या मदतीसाठी फ्रान्ससह काही देश, जर्मनी पाठविणार टँकविरोधी शस्त्र
सैनिकांना बळ देण्यासाठी सोबत यूक्रेनचे राष्ट्रपती.Image Credit source: AFP
| Edited By: | Updated on: Feb 27, 2022 | 2:48 PM
Share

रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे. काही देश युक्रेनच्या मदतीसाठी समोर आलेत. जर्मनी (Germany) च्या सरकारनं शनिवार सांगितले की, युक्रेनला टँकविरोधी शस्त्र पाठविण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. रशियाच्या स्विफ्ट बँकिंग प्रणालीवर काही निर्बंधांचे समर्थन करण्यात आले आहे. जर्मनीच्या आर्थिक आणि जलवायू मंत्रालयातने शनिवारी सांगितले की, नेदरलँडला जर्मनीत तयार झालेले 400 टँकविरोधी शस्त्र युक्रेनला पाठविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. युक्रेनवर रशियाचा हल्ला ही खूप मोठी बाब आहे. सध्य स्थितीत आम्ही ब्लादिमीर पुतीन यांच्या आक्रमक सेनेशी लढण्यासाठी युक्रेनची मदत करणार आहोत, असं जर्मन चांसलर ओलाफ शॉल्त्स यांनी स्पष्ट केलंय.

युक्रेन संकटात सापडल्यानंतर अमेरिकाही मदतीला

एएफपी न्यूज एजन्सीच्या अहवालानुसार, जर्मनी युक्रेनला 1,000 टँकविरोधी शस्त्र, 500 हवेतून मारा करणारे मिसाईल पाठवणार आहेत. फ्रान्स युक्रेनला सैन्यांसाठी आवश्यक उपकरणे देणार आहे. यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन (Joe Biden) यांनी सैन्य सहायतेसाठी 350 मिलीयन डॉलर देण्याची घोषणा केली. अमेरिकेचे विदेशमंत्री एंटनी ब्लिंकन यांना बायडेन यांनी निर्देश दिले की, विदेशी सहायता अधिनियमाअंतर्गत मदत दिली जावी. मदत युक्रेनच्या सुरक्षेच्या दृष्टीने दिली जाईल. अमेर‍िकेकडून ही मदत युक्रेन संकटात सापडल्यानंतर येत आहे.

युक्रेनला मित्रराष्ट्रांकडून मदतीचा हात

नेरदलँड युक्रेनला दोनशे हवाई रॅकेट देणार आहे. अमेरिका पस्तीस कोटी डॉलरची हत्त्यारे पुरविणार आहे. चेक रिपब्लिकन हा देश 85 लाख डॉलरची हत्यारे, दारुगोळा पुरविणार आहे. स्लोवाकिया सेन्यासाठी 26 लाख युरोप ही एकप्रकारे तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात आहे, असे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केले आहे.

Russia Ukraine War : हंगेरीच्या बुडापेस्टमधून तिसरे विमान भारताकडे रवाना

Russia Ukraine War : यूक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचं पहिलं विमान मुंबईत दाखल, विद्यार्थ्यांकडून सुटकेचा निश्वास

रशिया-यूक्रेनवरची आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी, यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी मोदींकडे मदत मागितली, झेलेन्स्किचं ट्विट

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.