2024मध्ये शिवसेना दिल्लीत बसणार म्हणजे बसणारच; आदित्य ठाकरेंचा पुनरुच्चार

गजानन किर्तीकर म्हणाले मुंबईचं महत्त्व कमी केलं जात आहे. सगळं दिल्लीला नेण्याचा डाव आहे. पण 2024मध्ये आपण सर्व दिल्लीत बसणार म्हणजे बसणारच, असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

2024मध्ये शिवसेना दिल्लीत बसणार म्हणजे बसणारच; आदित्य ठाकरेंचा पुनरुच्चार
2024मध्ये शिवसेना दिल्लीत बसणार म्हणजे बसणारच; आदित्य ठाकरेंचा पुनरुच्चार
Follow us
| Updated on: Feb 27, 2022 | 3:17 PM

मुंबई: शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी पुन्हा एकदा दिल्लीच्या तख्तावर शिवसेना बसणार असल्याचा पुनरुच्चार केला आहे. गजानन किर्तीकर (gajanan kirtikar) म्हणाले मुंबईचं (mumbai) महत्त्व कमी केलं जात आहे. सगळं दिल्लीला नेण्याचा डाव आहे. पण 2024मध्ये आपण सर्व दिल्लीत बसणार म्हणजे बसणारच, असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं. मी दिल्लीत जे बोललो ते उत्तर प्रदेशातही बोललो. इथेही तेच सांगत आहे. महाराष्ट्रातून अनेक गोष्टी हलविण्याचे डाव सुरू आहेत. पण 2024ला शिवसेना तिथे बसेल आणि सगळं थांबवेल. शिवसेना प्रत्येक राज्याला न्याय देईल. केंद्रीय एजन्सीचं जे काम सुरू आहे, ते केवळ प्रचारासाठीच सुरू आहे. कोणतंही राज्या त्याला घाबरणार नाही, झुकणार नाही. प्रत्येक राज्यात शिवसेना निवडणूक लढेल. भूमिपुत्रांना न्याय देई, असंही आदित्य यांनी सांगितलं.

आदित्य ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा पुनरुच्चार केला. इतर पक्ष नाटकं करतात, आपण परखडपणे बोलतो. मराठीचं काय होणार याची आजच्या दिवशी चिंता करत बसण्यापेक्षा आजचा दिवस साजरा करुया. मराठी भाषा दिल्लीच्या तख्तापुढे झुकली नाही आणि आजही मराठी दिल्लीपुढे झुकणार नाही, असं परखड मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं.

शासकीय मराठी समजण्यास अवघड

सुभाष देसाईंनी आम्हाला म्हणजे शासकीय स्तरावर मराठी भाषा सक्तीची केली आहे. ती समजायला जरा अवघड आहे. जीआर वाचायला घेतला तर समजत नाही. देसाई सरांना विनंती आहे की ती थोडी सोपी करुन द्यावी, असं ते म्हणाले.

मराठी मंडळाची इमारत उभारतोय

मरिन ड्राईव्हला आपण मराठी भाषा मंडळाची इमारत उभारत आहोत. मराठी बदलते आहे. मराठी भाषेचा अभ्यास करण्याकरता वाचनालय उभारत आहोत. गिरगांव चौपाटीच्या बाजुला मराठी आणि संस्कृतीचे कलादालन सुरु करत आहोत. जास्तीत जास्त चित्रीकरण मुंबईत होतील या करता प्रयत्न सुरू आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

दहावीपर्यंत मराठीत शिकवावंच लागेल

मराठी भाषेच्या शाळा, मातृभषेतील शाळा कमी होतात की जास्त यावरुन वाद सुरू असतात. पालकांचा कल सेमी इंग्रजीकडे असतो. मुंबई महापालिकेच्या शाळेत नव्या एसएससी बोर्डासह 11 शाळा सीबीएससी आणि आयसीएससी करता सुरू आहेत. मुंबई महापालिकेच्या 1232 शाळा आहेत. मात्र, कोणतंही बोर्ड असो 10 वी पर्यंत मराठी शिकवलंच जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

काही बंडलबाज पोरंही जन्माला येतात, जातात तिकडेच लग्न करून सेटल होतात, अजितदादांची तुफान फटकेबाजी

मागे घशात हात घालून दात काढले, आता एकमेकांचे कपडे फाडतायत; सेना-भाजपच्या वादावर मनसेचा हल्लाबोल

मराठा मंत्र्यांनी समाजाचा विश्वासघात केलाय, त्यांनी जनाची नाही तर मनाची ठेवावी, राधाकृष्ण विखे पाटलांचा हल्लाबोल

Non Stop LIVE Update
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.