AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नितेश राणे यांचा कॉक्रोच जनता पार्टीवर गंभीर आरोप; थेट पाकिस्तान कनेक्शन समोर आणलं

नितेश राणे यांनी कॉक्रोच जनता पार्टीवर गंभीर आरोप केला आहे. त्यांनी सीजेपी आंदोलनात पाकिस्तान समर्थक आंदोलनात होते, असा आरोप केलाय.

नितेश राणे यांचा कॉक्रोच जनता पार्टीवर गंभीर आरोप; थेट पाकिस्तान कनेक्शन समोर आणलं
nitesh rane news Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 03, 2026 | 11:49 AM
Share

कॉक्रोच जनता पार्टीच्या छत्रपती शिवाजी पार्कातील आंदोलनावरून राजकारण तापलं आहे. सीजेपीच्या आंदोलनातून दिपकेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. दिपकेंनी टीका केल्यानंतर आता भाजप नेते तुटून पडल्याचे दिसून येत आहे. भाजप नेत्यांकडून कॉक्रोच जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. दिपकेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला. त्यानंतर आता मंत्री नितेश राणेंनी गंभीर आरोप केला आहे. काँक्रोच जनता पार्टीच्या कालच्या आंदोलनात पाकिस्तान समर्थक, तुकडे-तुकडे गँगचे सदस्य होते, असं म्हणत मंत्री नितेश राणे यांनी गंभीर आरोप केला आहे.

मंत्री नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. मंत्री नितेश राणे म्हणाले, ‘ सीजेपीच्या आंदोलनात तुकडे तुकडे गँगचे सदस्य होते. शबाना आझमी, नसरुद्धीन शहा, विशाल ददलानी हे तुकडे-तुकडे गँगचे ब्रँड अॅम्बेसडर आहेत. ते काल स्टेजवर येऊन मिठ्या मारत होते. त्यांना मोठं करण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहेत. कुठे बाळासाहेब ठाकरेंचे विचार, कुठे हिंदुत्वाचे विचार…इथे जिहाद्यांना चाटण्याचा काम करत असाल. तर भारत, महाराष्ट्रातील हिंदू समाज , बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणारा नागरिक तुम्हाला माफ करणार नाही’.

‘काल डिनो मोरियाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. आता मला सर्वात मोठी भीती व्यक्ती करायची आहे की, दिशा सालियान प्रकरणातील एफआयआरमध्ये डिनो मोरिया, आदित्य ठाकरेंच्या नावाचा उल्लेख आहे. मिठी नदीच्या घोटाळ्यात त्याचं नाव आलं आहे. डिनो मोरिया हा नाइट लाइफ गँगचा सदस्य आहे. त्यामुळे त्याला कंत्राटे मिळायची. नाइट लाइफ गँगचा प्रमुख आदित्य ठाकरे आहे. म्हणून त्याच्या नावावर लूकआऊट नोटीस काढली पाहिजे. दिशा सालियान असो मिठी नदी घोटाळा असो….अटकेची टांगती तलवार असल्याने ते कधीही फरार होऊ शकतात. त्यामुळे लूकआऊट नोटीस काढून पासपोर्ट जप्त झाला पाहिजे, अशी माझी भूमिका असल्याचे राणेंनी सांगितले.  नितेश राणे यांच्या गंभीर आरोपानंतर विरोधक काय प्रतिक्रिया देणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

Follow Us
पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची
Vidhan Parishad Election : पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची उमेदवार यादी आज जाहीर होणार?; दिल्लीत बैठका सुरू
लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची...
Sanjay Raut : लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका
काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने....
Nagpur : काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने प्रवाशाला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं...
लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
Aaditya Thackeray Tweet : लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; आदित्य ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद
Thane : ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद, नेमकी काय चर्चा होणार?
आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; अय्यरच्या नेतृत्वाखाली...
IND vs PAK Asian Games Final : आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत करणार का गोल्डन कामगिरी?
मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल....
Rohit Pawar : MPSC : मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल तर, MPSCवर मोठे निर्णय कोणते?
येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त, परवाना थेट..
Dharashiv : येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त अन्, परवाना थेट...
मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं....
tv9 Marathi Special Report : Abhijeet Dipke : मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं; CJPच्या आंदोलनात नेमकं काय घडलं?
तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर....
Abhijeet Dipke : तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर पुन्हा दिल्लीत आंदोलन भडकणार?; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा