
नवी मुंबई महानगर पालिकेचे भाजपाचे नेते वनमंत्री गणेश नाईक यांची सत्ता कायम राहिली आहे. भाजपाचे उमेदवार गणेश सकपाळ यांचा प्रभाग क्रमांक ८ (अ ) मधून १२०० मतांनी विजय झाला आहे. भाजपा ७४ जागांवर आणि शिंदे यांची शिवसेना ३० जागांवर आघाडीवर आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे २ उमेदवार आघाडीवर असून एक अपक्ष आघाडीवर आहे.
या महापालिकेत भाजपाची सत्ता होती. आता गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे या महायुतीतील नेत्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळाली आहे. नवीमुंबई महानगर पालिका निवडणूकीत सत्ताधारी भाजपा आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्यातच मुख्य लढत झाली आहे. नवीमुंबई महानगर पालिकेत चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक झाली. राज्यात मुंबई महानगर पालिका वगळता इतरत्र बहुसदस्यीय प्रभाग निवडणूका झाल्या आहेत.नवीमुंबई शहरात एकूण २८ बहुसदस्यीय प्रभाग आहेत तर एकूण १११ नगरसेवक निवडून दिले जातात.२७ प्रभागांमधून प्रत्येकी चार नगरसेवक निवडले जातील तर एका प्रभागातून तीन नगरसेवक निवडले जाणार आहेत.
Maharashtra Municipal Election Results 2026 : जालना महापालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता, थेट पंकजा मुंडे यांनी...
Jalgaon Municipal Election Results 2026 : जळगावात महापालिका निवडणुकीत 69 जागांसह महायुतीचा बोलबाला
Worli Ward 197 Election Result 2026 : आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी दिला मोठा झटका
Mumbai Election Result 2026 : मतमोजणीला 5 तास, मुंबईत आतापर्यंत कोण-कोण जिंकले त्या उमेदवारांची यादी
पुणे महापालिका जिंकताच भाजपचा मोठा निर्णय; अजितदादांशी युती नाहीच?
Pune Election Result : काम न करणारे बोलत राहिले, पुणेकर जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला - मुरलीधर मोहोळ
नवी मुंबई महानगरपालिकेची ( NMMC ) शेवटची निवडणूक २२ एप्रिल २०१५ रोजी झाली होती, ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ५२ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर शिवसेनेने ( अखंड ) ३८ जागा जिंकल्या होत्या. तर भाजपाला ६ जागा मिळाल्या आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने १० जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत ५ अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते. नंतर राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक भाजपात गेल्याने भाजपाची सत्ता नवीमुंबई महापालिकेत आली आहे. विशेष म्हणजे साल २०१५ मध्ये एक सदस्यीय प्रभाग होते.
आता नवी मुंबई महानगरपालिकेच्या (NMMC) २०२५-२६ च्या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग प्रणालीनुसार झाल्या आहेत. नवी मुंबईमध्ये (Navi Mumbai) भाजपाची (BJP) सत्ता आहे. नवी मुंबई महापालिकेत भाजपाचे नेते,वनमंत्री गणेश नाईक यांची एकहाती सत्ता आहे. राज्यातील सत्ताधारी महायुतीतील शिवसेना नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या विरोधात उमेदवार उतरवले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे येथे स्थान नगण्य राहिलेले आहे.
वार्ड क्रमांक दोन या वार्डात दिघा गाव, गणेश नगर, आंबेडकर नगर, बिंदु माधव नगर, नामदेव नगर, सजंय गांधी नगर, विष्णू नगर, पंढरी नगर, सुभाष नगर, अण्णाभाऊ साठे नगर या प्रमुख भागांचा समावेश होतो. गेल्यावेळी या वार्डामधून शुभांगी जगदीश गवते या विजयी झाले होते.
प्रभाग क्रमांक २ मध्ये दिघा गाव, गणेश नगर, आंबेडकर नगर, बिंदु माधव नगर, नामदेव नगर, सजंय गांधी नगर, विष्णू नगर, पंढरी नगर, सुभाष नगर, अण्णाभाऊ साठे नगर या प्रमुख भागांचा समावेश होतो.
प्रभाग क्रमांक दोनची एकूण लोकसंख्या २५,८०३ एवढी असून, त्यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या ही ५०५८ इतकी आहे. तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या ४८१ एवढी आहे.
वार्ड क्रमांक २ मध्ये गेल्या निवडणुकीत शुभांगी जगदीश गवते या विजयी झाल्या होत्या.मात्र, गेल्यावेळी एक सदस्यीय निवडणूक होती. गेल्या निवडणुकीत नवी मुंबई महापालिकेत भाजपाची सत्ता आली होती. यंदा देखील भाजपाची सत्ता कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
महापालिका निवडणूक २०२६ च्या आरक्षण सोडतीनुसार प्रभाग क्रमांक दोन (अ) हा अनुसूचित जाती महिलासाठी आरक्षित आहे. प्रभाग क्रमांक दोन (ब ) हा नागरिकांचा विशेष मागास प्रवर्ग ( ओबीसी )आणि प्रभाग क्रमांक दोन (क ) सर्वसाधारण महिला तर प्रभाग क्रमांक ( ड) हा सर्वसाधारणसाठी आरक्षित आहे.
गेल्यावेळी नवी मुंबई महापालिकेत भाजपाने बाजी मारली होती.
* प्रभाग क्रमांक २ ( अ ) मध्ये भाजपाच्या दिपाळी चंद्राम सोनकांबळे, शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या श्वेता सुभाष काळे, आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सुवर्णा दत्ता कदम उभ्या नशीब आजमावत आहेत.
* प्रभाग क्रमांक २ ( ब ) मधून भाजपाचे नविन मोरेश्वर गवते,शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे विजय लक्ष्मण चौगुले, उबाठाचे संजय मोरेश्वर तुरे नशीब आजमावत आहे.
* प्रभाग क्रमांक २ ( क ) मधून भाजपाच्या अपर्णा नवीन गवते, उबाठाच्या मीना सजंय पाचारणे उभ्या राहिल्या आहेत.