AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रुग्णांनी आता जावं कुंठ? गंभीर रुग्णांना अंबरनाथ पालिकेच्या कोव्हिड सेंटरमध्ये जागा नाही, खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा

अंबरनाथ शहरात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झालाय. त्यामुळे पालिकेच्या कोव्हिड केअर सेंटरने गंभीर रुग्णांना दाखल करून घेणंच बंद केलंय (Thane Ambernath Corona Update)

रुग्णांनी आता जावं कुंठ? गंभीर रुग्णांना अंबरनाथ पालिकेच्या कोव्हिड सेंटरमध्ये जागा नाही, खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा
सांकेतिक फोटो
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Apr 13, 2021 | 11:36 PM
Share

अंबरनाथ (ठाणे) : अंबरनाथ शहरात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झालाय. त्यामुळे पालिकेच्या कोव्हिड केअर सेंटरने गंभीर रुग्णांना दाखल करून घेणंच बंद केलंय. तर खासगी रुग्णालयात इंजेक्शनसह ऑक्सिजनचाही तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे आता रुग्णांचे हाल बिकट होत चालले आहेत. अंबरनाथ शहरात पालिकेने डेंटल कॉलेजमध्ये कोव्हिड केअर सेंटर उभारलं आहे. तिथल्या 570 पैकी 400 बेड्सला ऑक्सिजन सुविधा आहे. तर आयसीयूमध्ये 16 बेड्स असून त्यातील 7 बेड्सला व्हेंटिलेटर्स आहेत. ऑक्सिजन सुविधा असलेले सर्व बेड सध्या फुल आहेत. तसंच सातही व्हेंटिलेटर्स रुग्णांना लावलेले आहेत (Thane Ambernath Corona Update).

फुफ्फुसात 60 टक्क्यांपेक्षा जास्त संसर्ग झालेल्या 35 रुग्णांसाठी रेमडेसिव्हीर मिळेना

ज्या रुग्णांचा सिटीस्कॅनचा स्कोअर 25 पैकी 15 पेक्षा जास्त असतो, म्हणजेच ज्यांच्या फुफ्फुसात 60 टक्क्यांपेक्षा जास्त संसर्ग असतो, अशा रुग्णांना ऑक्सिजन, स्टेरॉईड्स यासोबतच तातडीने रेमडेसिव्हीर इंजेक्शन देण्याची गरज असते. अशाप्रकारचे 35 रुग्ण सध्या पालिकेच्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल आहेत. मात्र, त्यांना देण्यासाठी रेमडेसिव्हीर इंजेक्शनच कुठे मिळत नसल्यानं या रुग्णांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पुढील २ दिवसात त्यांना इंजेक्शन न दिल्यास मोठ्या प्रमाणात रुग्णांचा मृत्यू ओढावू शकतो (Thane Ambernath Corona Update).

25 पैकी 15 च्या पुढे HRCT स्कोअर असलेल्या रुग्णांना दाखल न करण्याच्या सूचना

रेमडेसिव्हीर इंजेक्शनसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यापासून ते एफडीए, खासगी एजन्सी अशा सगळ्यांकडे मागणी करूनही आणि नगदी खरेदीची तयारी असूनही कुठेही इंजेक्शन मिळत नसल्यानं अंबरनाथ पालिका प्रशासन हतबल झालंय. त्यामुळे आता 25 पैकी 15 च्या पुढे HRCT स्कोअर असलेल्या रुग्णांना दाखलच करून घेऊ नका, अशा सूचना देण्याची दुर्दैवी वेळ नगरपालिका प्रशासनावर आलीय.

खासगी कोव्हिड सेंटरची अवस्थाही बिकटच

सरकारी कोव्हिड सेंटरची ही अवस्था असताना खासगी कोव्हिड केअर सेंटरची अवस्था तर आणखी बिकट आहे. कारण खासगी रुग्णालयांमध्ये रेमडेसिव्हिर इंजेक्शन सोबतच ऑक्सिजनचाही तुटवडा निर्माण झालाय. सध्या जवळपास प्रत्येक रुग्ण फुफ्फुसात संसर्ग झाल्यानंतरच दाखल होत आहे. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हिर या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत.

रुग्णांच्या नातेवाईकांची इंजेक्शनसाठी वणवण

शासनाने दोनच दिवसांपूर्वी थेट रुग्णालयांना इंजेक्शन पुरवण्याचा निर्णय जाहीर केला असला, तरी त्याची अद्याप अंमलबजावणी सुरू न झाल्यानं रुग्णांच्या नातेवाईकांची इंजेक्शनसाठी वणवण सुरू आहे. अशावेळी ना पैसा कामाला येतोय, ना ओळखी. इंजेक्शन अभावी डोळ्यादेखत रुग्णाचा मृत्यू पाहण्याची वेळ नातेवाईकांवर आलीय. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी तातडीने रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळाले नाहीत, तर दोन दिवसांनी अंबरनाथ शहरात मृत्यूचं थैमान पाहायला मिळेल, अशी हतबलता डॉक्टरांनी व्यक्त केलीये. त्यामुळे शासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन अंबरनाथ शहराला तातडीने रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा शहरात मृत्यूचं तांडव सुरू झाल्याशिवाय राहणार नाही.

संबंधित बातमी : राज्यात कोरोनाचा उद्रेक, दिवसभरातील रुग्णांचा आकडा 60 हजार पार, 281 जणांचा मृत्यू 

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?