Uddhav Thackeray On Maharashtra Lockdown Highlights : राज्यात उद्यापासून 15 दिवस संचारबंदी

Maharashtra Lockdown Update : महाराष्ट्रात उद्या म्हणजे 14 एप्रिल रात्री 8 पासून कलम 144 अर्थात संचारबंदी ( Section 144 to be imposed in the entire state Maharashtra from tomorrow) लागू असेल.

Uddhav Thackeray On Maharashtra Lockdown Highlights : राज्यात उद्यापासून 15 दिवस संचारबंदी
CM Uddhav Thackeray live

|

Apr 13, 2021 | 9:52 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) जनतेशी संवाद साधून,  राज्यात पुढील 15 दिवस संचारबंदीची घोषणा केली. महाराष्ट्रात उद्या म्हणजे 14 एप्रिल रात्री 8 पासून कलम 144 अर्थात संचारबंदी ( Section 144 to be imposed in the entire state Maharashtra from tomorrow) लागू असेल. पुढील 15 दिवस म्हणजेच 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू होतील. अत्यावश्यक दुकाने वगळता सर्व बंद राहील. सार्वजनिक वाहतूक जसे रेल्वे, बस या केवळ अत्यावश्यक सुविधेतील कर्मचाऱ्यांसाठी लागू राहतील.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासाठी 5400 कोटी रुपयांचं लॉकडाऊन पॅकेज जाहीर केलं. यामध्ये रिक्षावाले, फेरीवाल्यांपासून हातवर पोट असणाऱ्या अनेक घटकांचा समावेश आहे. याशिवाय राज्यातील 7 कोटी नागरिकांना 3 किलो गहू आणि 1 किलो तांदूळ महिनाभर मोफत दिलं जाणार आहे. इतकंच नाही तर गोरगरिबांसाठी शिवभोजन थाळी मोफत दिली जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले. रोजी बंद झालीय पण रोटी बंद होणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

Maharashtra Lockdown news : राज्यात 1 मेपर्यंत कडक निर्बंध लागू, उद्धव ठाकरेंच्या घोषणा जशाच्या तशा

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 13 Apr 2021 09:07 PM (IST)

  Uddhav Thackeray on Lockdown relief : ५४०० कोटी रुपयांची मदत जाहीर

  कोव्हिडसाठी 3300 कोटी तात्काळ निधी म्हणून उपलब्ध. सुविधा वाढवणे, व्हेटिंलेटर्स किंवा तत्सम सुविधांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी देणार. पटकन रुग्ण आला तर विचारत बसायचं नाही, निर्णय घ्या आणि उपाय करा

  ५४०० कोटी रुपयांची मदत जाहीर, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

  राज्य सरकार म्हणून अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना एक महिन्यासाठी प्रत्येकी तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ देणार आहोत. या योजनेमध्ये सात कोटी नागरिकांचा समावेश आहे. दहा रुपयांची शिवभोजन थाळी पाच रुपयांवर आणली होती. पुढचे काही दिवस शिवभोजन थाळी मोफत देणार आहोत.

  संजय गांधी निराधार, श्रावळ बाळ योजना, इंदिरा गांधी निवृत्ती योजना अशा पेन्शन लाभार्थ्यांना १ हजार रुपये आगाऊ देणार आहोत. यामध्ये ३५ लाख लोकांचा समावेश आहे.

  महाराष्ट्र राज्य इमारत कामगार कल्याण मंडळ आहे. त्यात १२ लाख लाभार्थी आहेत. त्यांना १५०० रुपये देणार आहोत.

  नोंदणीकृत घरेलू कामगार यांना निधी देणार आहोत.

  अधिकृत फेरीवाले यांना एका वेळेचे १५०० रुपये देत आहोत. यांची संख्या ५ लाख आहे.

  रिक्षा चालकांना १५०० रुपये देत आहोत. यांची संख्या १२ लाख आहे.

  आदिवासी कुटुंबाना प्रति कुटंब २००० रुपये देत आहोत. त्यांची संख्या १२ लाख आहे.

  कोविड संदर्भातील उभारणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त निधी ३३०० कोटी कोविडसाठी बाजूला काढून ठेवत आहोत.

  हे सगळ करण्यासाठी पाच हजार चारशे कोटी रुपये निधी बाजुला काढून ठेवत आहे.

 • 13 Apr 2021 09:05 PM (IST)

  Uddhav Thackeray on Lockdown relief : उद्धव ठाकरेंच्या मोठ्या घोषणा

  राज्यातील 7 कोटी लाभार्थींना पुढील 1 महिना 3 किलो गहू 2 किलो तांदूळ देणार.

  पुढचा एक महिना 2 लाख शिवभोजन थाळ्या मोफत देणार. आधी 10 रुपयांची थाळी 5 केली आता मोफत करणार. ही सरकारची जबाबदारी.

  35 लाख लोकांना 1000 रुपये आगाऊ देणार.

  राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी 1500 रुपये देणार. 12 लाख कामगारांना उपयोग होणार.

  घरेलू कामगारांनाही आर्थिक मदत करणा.

  अधिकृत फेरीवाल्यांना 1500 रुपये देणार.

  परवानाधारक रिक्षाचालकांना 1500 रुपये – १२ लाख लाभार्थी आहेत.

  खावटी योजनेच्या आदिवासी कुटुंबांना – २ हजार रुपये – १२ लाख लाभार्थी

 • 13 Apr 2021 09:01 PM (IST)

  Uddhav Thackeray On Maharashtra Lockdown LIVE : 3 किलो गहू, 1 किलो तांदूळ 1 महिन्यासाठी मोफत

  राज्य सरकारतर्फे अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 3 किलो गहू, 1 किलो तांदूळ 1 महिन्यासाठी मोफत. रोजी थांबली असली तरी रोटी थांबणार नाही .

  नोंद केलेले लाभार्थी आहेत, ते 7 कोटी आहेत. या सर्वांना 1 महिना 3 किलो गहू आणि १ किलो तांदूळ मोफत देणार

  शिवभोजन थाळी १० रुपयात देत होतो. ही योजना कोव्हिड आल्यानंतर ५ रुपयात केली. आता शिवभोजन थाळ्या गोरगरिबांना मोफत

 • 13 Apr 2021 08:53 PM (IST)

  Uddhav Thackeray On Maharashtra Lockdown LIVE : राज्यात उद्यापासून 15 दिवस संचारबंदी

  उद्या संध्याकाळपासून ब्रेक द चेनसाठी  राज्यात १४४ कलम लागू - पुढचे किमान १५ दिवस राज्यात संचारबंदी

  अनावश्यक येणे जाणे पूर्ण बंद.

  कोणत्याही व्यक्तीला अतिआवश्यक काम नसेल तर बाहेर पडू देऊ नका.

  आवश्यक सेवा वगळून इतर सेवा बंद राहतील

  सकाळी ७ ते रात्री ८ या काळात अत्यावश्यक सेवाच सुरु राहतील.

  सार्वजनिक वाहतूक सुरु राहील, ती केवळ जीवनावश्यक सेवा देणाऱ्यांसाठीच असेल

  औषधे, लस उत्पादक, अत्यावश्यक सेवा देणारे, मास्क वितरक, वैद्यकीय लोक, जनावरेंशी संबंधित दवाखाने उघडी राहतील

  पत्रकारांनाही सूट असेल. पेट्रोल पंप सुरु राहतील

  हे वगळता बंद राहील. बांधकामं जिथे सुरु आहेत, तिथेच कर्मचाऱ्यांची राहण्याची सुविधा करा. त्यांना वाहतूक करु देऊ नका. थोडी वाहतूक सुरु ठेवत असाल तर बांधकाम उद्योग चालू ठेवू शकता.

  हॉटेल रेस्टॉरंटवर पूर्वीप्रमाणे निर्बंध, होम डिलिव्हरी सुरु

  रस्त्यावरील खाद्यपदार्थां सकाळी 7 ते राभी ८ पर्यंत सुरु राहील. गर्दी करु नये

 • 13 Apr 2021 08:51 PM (IST)

  Uddhav Thackeray On Maharashtra Lockdown LIVE : उद्या 14 एप्रिलपासून निर्बंध लागू होतील

  निर्बंध घालतोय, पण पर्याय नाही. कडक पावलं उचलतोय. लॉकडाऊन म्हणत नाही, पण काही निर्बंध तसेच आहेत. साखळी तुटायला हवी. रोजीरोटी महत्त्वाची आहेच. रोजीरोटीसोबत जीव वाचवायला हवेत. तोच महत्त्वाचा मुद्दा आहे. हात जोडून विनंती करतो, आजपर्यंत जे निर्बंध टाकले ते वाढवतोय. उद्या 14 एप्रिलपासून रात्री ८ पासून निर्बंध लागू होती, पंढरपूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक होतेय तिथे सूट असेल, मतदानानंतर तिथेही लागू होतील

 • 13 Apr 2021 08:49 PM (IST)

  Uddhav Thackeray On Maharashtra Lockdown LIVE : उणीदुणी काढण्याची वेळ नाही

  ही उणीदुणी काढण्याची वेळ नाही. महाराष्ट्र आपलेला माफ करणार नाही. पंतप्रधानांना विनंती केली, देशातील सर्व नेत्यांना सांगा राजकारण बाजूला ठेवा. हे संकट मोठं आहे. ही जर साथ असेल तर आपण एकसाथ लढली पाहिजे. नाईलाजाने

 • 13 Apr 2021 08:48 PM (IST)

  Uddhav Thackeray On Maharashtra Lockdown LIVE : निवृत्त डॉक्टर, परिचारिकांना महाराष्ट्राच्या लढाईत सहभागी व्हा

  आरोग्य व्यवस्था वाढवतोय पण हे एकतर्फी आहे. कारण आरोग्य व्यवस्था वाढले तरी डॉक्टर हवेत. जे नवे उत्तीर्ण झालेले डॉक्टर आहेत, त्यांना आवाहन करतोय, निवृत्त डॉक्टर, परिचारिकांना महाराष्ट्राच्या लढाईत सहभागी व्हा.

 • 13 Apr 2021 08:47 PM (IST)

  Uddhav Thackeray on coronavirus : रुग्णवाढ भयावह आहे, जिथे व्यवस्था आवश्यक तिथे पुरवणार

  येत्या काळात ब्रिटनप्रमाणे लसीकरण प्रचंड वाढवावा लागेल. पहिली लाट ही काहीच नव्हती. दुसरी लाट भयानक आहे. त्यामुळे तिसरी लाट कशी असेल सांगता येत नाही.

  गेल्यावेळी आपण अंदाज बांधत होतो. आता आपण हातपाय गाळून बसलो नाहीत. आपण जिद्दीने लढतोय. सध्या रुग्णवाढ भयावह आहे. ऑक्सिजन, औषधांची कमतरता जाणवतेय. येत्या काळात आरोग्य व्यवस्था पुन्हा वाढवतोय. जिथे जिथे आवश्यक तिथे व्यवस्था वाढवणार

 • 13 Apr 2021 08:44 PM (IST)

  Uddhav Thackeray On Maharashtra Lockdown LIVE : हवाई मार्गे ऑक्सिजन पाठवा

  रस्त्याने ऑक्सिजन आणणे कठीण आहे. हवाई मार्गे ऑक्सिजन मिळत असेल तर ती परवानगी देऊन एअरफोर्सने ऑक्सिजन पाठवा, अशी केंद्राला विनंती केली.

 • 13 Apr 2021 08:44 PM (IST)

  Uddhav Thackeray on vaccination : आम्ही लसीकरण वाढवतोय, आताची लाट मोठी

  सध्या परिस्थिती कठीण, जीएसटीला मुदतवाढ द्या. मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी. नैसर्गिक आपत्ती येते, त्यावेळी जे निकष लावतो, ज्यांची रोजी रोटी गेलीय त्यांना मदत देण्याची विनंती पंतप्रधानाकडे करतोय. आपत्ती बिकट आहे. कोरोनावर औषध नाही, पण लस सापडलीय. पंतप्रधानांनी टीका महोत्सव करा म्हटलंय. आम्ही लसीकरण वाढवत आहोत.

  आताची लाट मोठी आहे. लसीकरणानंतर लगेच प्रतिकारशक्ती येत नाही. पुढची लाट येण्यापूर्वी लसीकरण आवश्यक

 • 13 Apr 2021 08:39 PM (IST)

  Uddhav Thackeray On oxygen LIVE : एकही रुग्णसंख्या लपवत नाही, केंद्राकडे ऑक्सिजनची मागणी

  औषधे जिथून मिळतील तिथून घेतोय. केंद्राकडे विनंती केलीय. पंतप्रधानांनाही विनंती केली. रोजच्या रोज त्यांच्याकडे अहवाल जातोय. एकही मृत्यू किंवा रुग्ण लपवत नाहीत. सर्व परिस्थितीला तोंड देतोय. त्यामुळे पंतप्रधानांना ऑक्सिजन देण्याची विनंती केली. त्यांच्या क्षमतेप्रमाणे ऑक्सिजन पुरवठा सुरु झाला आहे. अधिकचा ऑक्सिजन इतर राज्यातून देण्यासाठी  परवानगी मागितली आहे. ईशान्येकडील राज्यातून परवानगी दिलीय, ती हजारो किमीवर आहेत.

 • 13 Apr 2021 08:37 PM (IST)

  Uddhav Thackeray On Maharashtra Lockdown LIVE : ऑक्सिजन संपतोय, मागणी वाढतेय

  या कठीण काळात सर्वांशी चर्चा करतोय, पण निष्पण्ण काहीच नाही. सध्याचा जो काळ आहे, ही परिस्थिती हातातून गेली तर नंतर काहीच होणार नाही. सध्या १२०० मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती होते. सध्या हा आरोग्यासाठीच वापरला जातो. आज 950 मेट्रिक टन ऑक्सिजन वापरला जातोय. हा अपुरा पडतोय. रेमडेसीव्हिरची प्रचंड मागणी आहे.

 • 13 Apr 2021 08:35 PM (IST)

  Uddhav Thackeray On Exam LIVE : कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या

  कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या, त्या पुढे घेतल्या जाऊ शकतात. मात्र सध्या आपली कठीण परीक्षा सुरु आहे

 • 13 Apr 2021 08:35 PM (IST)

  Uddhav Thackeray On Maharashtra Lockdown LIVE : यंत्रणा आणि सुविधांवर मोठा भार आलाय

  गेल्यावर्षी चाचणी केंद्र 1-2 होत्या, आता 523 केंद्र आहेत. तरीही चाचण्यांचे रिपोर्ट येण्यास वेळ लागत आहे. पण साहजिक आहेत. यंत्रणावर भार आलाय. यंत्रणांची क्षमता असते. रोज चाचण्यांची संख्या वाढवतोय. ८५ हजारावरुन सव्वा दोन लाख चाचण्या होत आहेत.

  कोव्हिड सेंटर २६०० होती ४ हजारावर गेलेत. बेड साडेतीन लाखापर्यंत गेलेत

 • 13 Apr 2021 08:33 PM (IST)

  Maharashtra Lockdown Update Uddhav Thackeray Live : सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

  सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. गेल्यावर्षीही अशाच शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी प्रार्थना केली होती, पुढचा गुढीपाडवा कोव्हिडमुक्त होऊदे. मधल्या काळात परिस्थिती तशी झाली होती. डिसेंबर-जानेवारीपर्यंत कोव्हिडवर नियंत्रण मिळवलं होतं.

  गेल्यावर्षीचा पाडवा आणि यंदाचा पाडवा यात फरक काय? युद्ध जिंकत आलो होतो, पण फार भयानक रुग्णवाढ होतेय. आजचा रुग्णवाढीचा आकडा सर्वाधिक आहे. ६० हजार २१२ कोव्हिड रुग्ण आज नोंदवले

 • 13 Apr 2021 08:19 PM (IST)

  Maharashtra Lockdown Update : मुख्यमंत्री 8 दिवसांचा लॉकडाऊन करतील : प्रवीण दरेकरांचा अंदाज

  मुख्यमंत्री आठ दिवांसाचा लॉकडाऊन करतील, अशी शक्यता आहे. अनेकांची पंधरा दिवसांची मागणी आहे. पण हातावर पोट असणाऱ्यांसाठी महत्त्वाचं आहे. व्यापारी, दुकानदार रस्त्यावर उतरले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी काहीतरी महत्त्वाचा प्लॅन द्या, असं सांगितलं. मुख्यमंत्री लॉकडाऊनची घोषण करत असतील तर त्यांचा त्याबाबतचा प्लॅन कदाचित तयार असतील. येत्या एक-दोन दिवसात ते घोषणा करतील, ते कधी कृतीत येईल याची आम्ही वाट बघतोय, असं विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले.

 • 13 Apr 2021 07:30 PM (IST)

  राज्यातील ७ कोटी जनतेला मोफत धान्य देण्याचा विचार

  राज्यातील ७ कोटी जनतेला मोफत धान्य देण्याचा सरकारचा विचार, ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ मोफत देण्याचा विचार, लॅाकडाऊन काळात सरकार निर्णय घेण्याची शक्यता

 • 13 Apr 2021 07:17 PM (IST)

  Maharashtra Lockdown update : पालकमंत्री अस्लम शेख काय म्हणाले?

  मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळीही त्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घोषणा करतील अशी माहिती दिली होती. “महाराष्ट्रात उद्या लॉकडाऊनची (Maharashtra Lockdown) घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आजच निर्णय घेतील. इतकंच नाही तर लॉकडाऊनबाबत नियमावली (Maharashtra Lockdown guidelines) आजच तयार होईल”, असं मुंबईचे पालकमंत्री आणि राज्याचे मंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांनी आज माध्यमांना सांगितलं होतं.

 • 13 Apr 2021 07:02 PM (IST)

  Maharashtra Lockdown LIVE Mumbai local update : लोकल ट्रेनलाही ब्रेक लागण्याची शक्यता

  पुढच्या लॉकडाऊनमध्ये कदाचित मुंबईच्या लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनला (Mumbai Local) पुन्हा ब्रेकही लागू शकतो. कारण, लोकलमध्ये सर्वाधिक वेगाने कोरोना परसतोय, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यातच लोकलची गर्दी नियंत्रणात येत नसल्याने लोकल बंद करण्याचा विचारही सरकार करत असल्याचं बोललं जात आहे. केवळ अत्यावश्यक सेवेसाठी लोकल सुरु ठेवली जाऊ शकते.

 • 13 Apr 2021 07:01 PM (IST)

  Maharashtra Lockdown Update : ब्रेक द चेन (Break the chain)

  कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकार हर तऱ्हेचे प्रयत्न करत आहे. त्यासाठी ब्रेक द चेन ही मोहीम हाती घेतली आहे. साखळी तोडण्यासाठी संपर्क तोडणे आवश्यक आहे. त्यासाठीच आता लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नसल्याचं चित्र आहे.

Published On - Apr 13,2021 9:11 PM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें