AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AAIB चा अंतिम अहवाल येत नाही तोवर कोणतेही निर्देश देता येणार नाहीत, अजित पवार अपघात प्रकरणी मुंबई हायकोर्टाचे आदेश

अजितदादा पवार यांचे २८ जानेवारी रोजी सकाळी बारामती विमान तळावर विमान लँड होत असताना निधन झाले होते. राज्याच्या महत्वाचा नेता अशा प्रकारे ऐन राजकीय उमेदीत अपघाती मृत्यू पावल्याने देशभर खळबळ उडाली होती.

AAIB चा अंतिम अहवाल येत नाही तोवर कोणतेही निर्देश देता येणार नाहीत, अजित पवार अपघात प्रकरणी मुंबई हायकोर्टाचे आदेश
ajit pawar plane crash case
| Updated on: Jun 15, 2026 | 10:29 PM
Share

२८ जानेवारी रोजी अजितदादा पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाले होते. या प्रकरणात हायकोर्टाने आज महत्वाचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात AAIB चा अंतिम अहवाल येत नाही तोवर कोणतेही निर्देश देता येणार नाही असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. या प्रकरणाचा पाठपुरावा अजितदादा यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी लावून धरला आहे. आता हायकोर्टाच्या निकालानंतर त्यांची काय प्रतिक्रीया येते याकडे लक्ष लागले आहे.

अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाची सखोल चौकशी करणाऱ्या दोन याचिका मागे घेण्यात आल्या आहेत. कारण, मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात AAIB चा अंतिम अहवाल नाही, तोवर कोणतेही निर्देश देता येणार नाहीत असे म्हटले आहे. त्यामुळे या दोन याचिकांना मागे घेण्यात आल्या आहेत. या याचिकाकर्त्यांना पुन्हा दाद मागण्याची मुभा देण्यात आली असल्याचे हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.

तर आम्ही पुन्हा न्यायालयात येणार…

अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाचा जोपर्यंत AAIB दिल्ली यांचा अंतिम अहवाल येत नाही, जोपर्यंत तपास चालू आहे. त्यांच्याकडून तपासातून काही निष्कर्ष पुढे येत नाही आणि अहवाल पुढे येत नाही, तोपर्यंत आम्ही काय करु शकत नाही असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढे जे काही येईल, त्यानंतर आम्ही तुमच्या केसचा विचार करु असे माननीय न्यायालय म्हटले आहे. त्यामुळे आम्ही आता AAIB दिल्ली यांच्याकडे पाठपुरावा करु आणि AAIB दिल्ली यांनी जर दोन महिन्यात अहवाल पाठविला नाही तर आम्ही पुन्हा न्यायालयात येणार आहोत असे यावेळी याचिकादाराच्या वकीलांनी स्पष्ट केले आहे.

Follow Us
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय