लॉकडाऊन नाही पण निर्बंध, राज्यात नवे नियम काय? वाचा सविस्तर

लॉकडाऊन नाही पण निर्बंध, राज्यात नवे नियम काय? वाचा सविस्तर
आरोग्यमंत्री राजेश टोपे

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत मंत्रालयात आरोग्यमंत्री आणि टास्क फोर्सच्या तज्ज्ञांची बैठक घेतली. या बैठकीत पूर्ण लॉकडाऊन नाही तर कडक निर्बंध लावण्यावर एकमत झालंय.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Jan 05, 2022 | 9:34 PM

नवीन वर्षाला सुरुवात होताच, महाराष्ट्रात रोज कोरोनाच्या नव्या रुग्णांची रेकॉर्डब्रेक आकडेवारी सुरु झालीय.त्यामुळं आता गर्दी रोखून संसर्गाला आळा घालण्यासाठी, निर्बंध लावण्याची तयारी सरकारनं केलीय. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत मंत्रालयात आरोग्यमंत्री आणि टास्क फोर्सच्या तज्ज्ञांची बैठक घेतली. या बैठकीत पूर्ण लॉकडाऊन नाही तर कडक निर्बंध लावण्यावर एकमत झालंय. महाराष्ट्रात 1 जानेवारीपासून कोरोनाच्या संसर्गात झपाट्यानं वाढ झालीय. त्यातच एकूण रुग्णसंख्येच्या 58 % नवे रुग्ण मुंबईतच आढळत आहेत.

मागील काही दिवसातील आकडेवारी

1 जानेवारीला महाराष्ट्रात 9 हजार 170 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, 2 जानेवारीला 11 हजार 877 इतकी संख्या झाली. 3 जानेवारीला 12 हजार 160 नव्या रुग्णांची नोंद झाली. 4 जानेवारीला रुग्णसंख्या 18 हजार पार झाली, तब्बल 18,466 रुग्ण आढळलेत. वर्षाच्या पहिल्या 4 दिवसांत 51 हजार 673 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडलीय. यापैकी एकट्या मुंबईत 33 हजार 352 रुग्ण आहेत. त्यामुळेच सरकार कडक निर्बंध लावणार आहे.

काय निर्बंध लागू शकतात?

राज्यात विकेंड लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता आहे.
त्यानुसार शनिवारी आणि रविवारी राज्यात कडकडीत बंद पाळला जाईल.
विकेंड लॉकडाऊनच्या काळात गार्डन, चौपाट्या आणि धार्मिकस्थळे पूर्णपणे बंद राहतील.
विकेंड लॉकडाऊनच्या काळात धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांनाही बंदी राहू शकते.
सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम आणि लग्नसोहळ्यांना फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत मुभा मिळू शकते.
अंत्यसंस्कारासाठी 20 लोकांची उपस्थितीची परवानगी मिळू शकते.
दुकानं सकाळी दहा ते रात्री 10 या वेळेत सुरु राहू शकतात.
मेट्रो आणि बसेस 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील.
हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बार सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु राहू शकतात.
सरकारी कार्यालयात 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज.
50 % क्षमतेने सर्व सार्वजनिक वाहतूक सुरु राहू शकते.

कोरोनाकाळातही राजकारण सुरू

दुसरीकडे महाराष्ट्रात राजकीय वातावरणही तापलंय. महाविकास आघाडी सरकार कोरोना दाखवूनच काळी कामं करतात, अशी टीका फडणवीसांनी केलीय. महाराष्ट्रातली कोरोना संसर्गाची संख्या चिंताजनक आहे. त्यातच बाजारपेठांमधली गर्दी कमी होताना दिसत नाही. त्यामुळं तूर्तास निर्बंध लावण्याचा विचार सरकारनं केलाय..त्यामुळं निर्बंध जाहीर झाल्यावर तरी गर्दीला आळा घातला पाहिजे नाहीतर लॉकडाऊनही अटळ असेल.

तुमच्या मुलाला दूरचं पाहताना होतोय त्रास?..त्याला असू शकतो हा डोळ्यांचा आजार…

तुमच्याकडे गोड बातमी आहे..? मग चुकूनही पहिल्या 3 महिन्यात हे करू नका…

Yuzvendra Chahal: चहलच्या बायकोने काश्मीरमध्ये दाखवल्या वेगळ्या अदा, पाहा खास PHOTOS

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें