मराठी बोलणार नाही, रिक्षा चालवणार आणि पैसेही कमावणार, उत्तर भारतीय नेत्याचं प्रताप सरनाईक यांना थेट चॅलेंज

Auto-Taxi Marathi Mandatory: राज्यात 15 ऑगस्ट 2026 पासून ऑटो-रिक्षा चालकांना मराठी बोलण्याची सक्ती करण्यात होती. आता प्रताप सरनाईक यांच्या या नियमाला एका नेत्याने आव्हान दिले आहे.

मराठी बोलणार नाही, रिक्षा चालवणार आणि पैसेही कमावणार, उत्तर भारतीय नेत्याचं प्रताप सरनाईक यांना थेट चॅलेंज
| Updated on: Aug 16, 2026 | 12:31 PM
राज्यात 15 ऑगस्ट 2026 पासून ऑटो-रिक्षा चालकांना मराठी बोलण्याची सक्ती करण्यात आली आहे. ज्या रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी येत नाही, त्यांचे परमिट रद्द  करणार असल्याची घोषणा परिवहन मंत्र्यांनी केली होती. या नियमाचे स्वात सगळीकडे होत आहे. पण दुसरीकडे काही लोक विरोधही करत आहेत. यातच आता एका नेत्याने एक व्हिडिओ शेअर करत या नियमावर जोरदार टीका केली आहे. ते बिनधास्तपणे म्हणाले आहे की “आम्ही रिक्षा चालवणार, पैसेही कमावणार पण मराठी कदापी बोलणार नाही,” असे म्हणत व्हिडिओ शूट करुन शेअर केला आहे आणि मंत्री प्रताप सरनाईक यांना आव्हान दिले आहे.
महाराष्ट्रात रिक्षाचालकांसाठी मराठी भाषेची सक्ती आणि परमिट रद्द करण्याच्या मुद्द्यावरून राजकीय वाद पेटला आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ‘मराठी न बोलणाऱ्या उत्तर भारतीय रिक्षाचालकांचे परमिट रद्द केले जाईल’ असा स्पष्ट शब्दात इशारा दिला होता. या इशाऱ्याला उत्तर भारतीय विकास सेनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पंडित संजय दुबे यांनी आता आव्हान केले आहे. यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून थेट आव्हान दिले आहे. “मी रिक्षा चालवणार, पैसे कमावणार, पण मराठी बोलणारच नाही,”.

व्हिडिओमध्ये संजय दुबे यांनी म्हटले आहे की, “15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले होते. मात्र आजच्या दिवशी राज्याचे परिवहन मंत्री आमच्यावर पुन्हा हा नियम लागून करुन गुलामी पत्करायला सांगत आहे. कोणताही तरुण ही गुलामगिरी आता सहन करणार नाही. तुम्ही मराठी भाषेच्या नावाखाली आम्हाला धमकवतात आहात? हा हिंदुस्तान आहे आणि आम्ही प्रेमाच्या भाषेचा नक्कीच आदर करू, पण सत्तेच्या जोरावर कोणतीही गोष्ट लादता येणार नाही.  माझेही काही मराठी भाषा बोलणारे मित्र आहेत, मी त्यांचा नेहमीच आदर केला आहे, पण जर तुम्ही  गुंडगिरी करणार असाल तर मात्र आम्ही खपवून घेणार नाही.”
प्रताप सरनाईक यांच्या डेडलाईनला आव्हान देताना त्यांनी म्हटले की, “तुमचे हे सरकार फार काळ टिकणार नाहीये, ते लवकरच कोसळणार . मी उत्तर भारतीय विकास सेनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून बजावून सांगतो, जर तुम्ही आम्हाला गुलामी करायला सांगाल तर आम्ही तुमचे कदापी ऐकणार नाही. तुमची भाईगिरी, गुंडगिरी अजिबात इथे चालणार नाही. मी रिक्षा चालवणार, पैसे पण कमावणार, पण मराठी बोलणार नाहीच, अशा उर्मट भाषेत दुबे यांनी सरनाईकांना आव्हान दिले आहे.”
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us