AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar : रोहित पवार यांचं तुकाराम मुंढे यांच्यावर मोठं विधान; फडणवीस सरकारकडे केली मोठी मागणी

रोहित पवार यांनी तुकाराम मुंढे यांच्यावर मोठं विधान केलं आहे. त्यांनी फडणवीस सरकारकडे मोठी मागणी केली आहे.

Rohit Pawar : रोहित पवार यांचं तुकाराम मुंढे यांच्यावर मोठं विधान; फडणवीस सरकारकडे केली मोठी मागणी
rohit pawar on tukaram mundhe Image Credit source: tv9
| Updated on: Aug 16, 2026 | 12:09 PM
Share

वैभव घाग, टीव्ही9 

महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने पान मसालाच्या जाहिरातीवरून बॉलिवूडच्या तीन मोठ्या कलाकारांना कारणे दाखवा नोटीस पाठवल्याने चर्चांना उधाण आलं आहे. मुंढे यांच्या विभागाने अजय देवणग, शाहरुख खान, टायगर श्रॉफ यांना जाहिरातीत सहभागी झाल्याने नोटीस पाठवल्याचे समोर आलं आहे. मुंढे यांच्या विभागाच्या कारवाईवर रोहित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्यांना नोटीस पाठवण्याऐवजी विमल कंपनीच्या मालकाला नोटीस द्या, असे पवार म्हणाले. तसेच मुंढे यांना अंमली विरोधी पथकाचे प्रमुख करा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईवर रोहित पवार म्हणाले, ‘नोटीस देण्याचा अधिकार त्यांना असेल, तर त्या विमल कंपनीच्या मालकाला नोटीस द्या. अभिनेत्यांना कशाला…? कलाकारांना नोटीस देता म्हणजे तुमची अपेक्षा आहे का त्यांनी तुमची कार्यालयात यावं. आता अंमली विरोधी पथकाचा विभाग आहे, त्याचे प्रमुख तुकाराम मुंढे यांना करा. ते पान मसाल्याला इतकं गांभीर्याने घेत आहेत, तर अंमली पदार्थालाही घेतील. माध्यमांवर एकच अधिकारी दिसत असेल, तर बाकीचे अधिकारी काम करत नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे. फक्त एका अधिकाऱ्याला मीडियात हायलाईट दिली जात आहे. तर काम करणारे इतर अधिकारी देखील आहेत, त्यांनाही दाखवा’.

कुंभमेळ्यात घोटाळा झाल्याचा आरोप करत रोहित पवारांनी म्हटलं की, ‘ अघोषित पालकमंत्री हे गिरीश महाजन आहेत, त्यांना का अघोषित केलं आहे, कारण 30 कोटींची काम तिथे सुरू आहेत. महाजन यांच्या जवळ्याच्या लोकांनी टेंडर घेतले. त्यांनी आर्थिक लाभ घेतला. आर्थिक कामाची महाजन यांच्यावर जबाबदारी आहे. भुजबळ काय बोलतात हे आता बघावं लागेल. अघोषित पालकमंत्री असून महाजनांनी महाकुंभाची जबाबदारी घेतली आहेत, त्यात भ्रष्टाचार झाला आहे. पैसा कसा खाल्ला जातो, हे पाहिलं आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांना मी जे पत्र दिल होतं, ते प्रसिद्ध करतो. मुख्यमंत्री फडणवीस यांना विनंती करतो की, पूर्ण माहिती कोणी टेंडर भरले याची दिली पाहिजे. कामं कोणाला दिली जातात हे माहित आहे. येत्या 18 तारखेला एक खूप मोठं आंदोलन मराठी कंत्राटदार करणार आहेत. गुजराती कंत्राटदारांकडून घेतले जात आहेत’.

Follow Us
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?