Video: पुजा अरुण राठोडच्या गर्भपाताबद्दल ‘त्या’ डॉक्टरचं म्हणणं काय? Exclusive

| Updated on: Feb 17, 2021 | 7:35 PM

पूजा अरुण राठोड या रुग्णावर मी उपचार केले नाहीत, या संदर्भात उपस्थित असलेले डॉक्टर तुम्हाला माहिती देऊ शकतील," असे उत्तर डॉ. श्रीकांत वारदे यांनी दिले आहे. (pooja arun rathore shrikant varade)

Video: पुजा अरुण राठोडच्या गर्भपाताबद्दल त्या डॉक्टरचं म्हणणं काय? Exclusive
डॉ. श्रीकांत वारदे
Follow us on

यवतमाळ : यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पूजा अरूण राठोड (pooja arun rathore) नावाच्या मुलीचा गर्भपात झाल्याचे समोर आहे. ही माहिती समोर आल्यानंतर आता आता पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा गुंता वाढला आहे. गर्भपात केलेली पूजा अरूण राठोड आणि आत्महत्या केलेली पूजा चव्हाणचा (Pooja Chavan)  काही संबंध आहे का? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. याविषयी बोलताना, “पूजा अरुण राठोड या रुग्णावर मी उपचार केले नाहीत, या संदर्भात उपस्थित असलेले डॉक्टर तुम्हाला माहिती देऊ शकतील,” असे उत्तर डॉ. श्रीकांत वारदे यांनी दिले आहे. पूजा अरुण राठोड या रुग्णाच्या गर्भपाताच्या रिपोर्टवर डॉ. वारदे (dr. shrikant varade) यांची सही आहे. ते ‘टाव्ही 9 मराठी’ शी बोलत होते. (not done the treatment of pooja arun rathore said dr. shrikant varade)

“रुग्णालयातील सर्व कागदपत्रांची संगणकातून ही प्रिंट येत असते. त्यामुळे पूजा अरुण राठोडच्या गर्भपाताच्या रिपोर्टवर माझी स्वाक्षरी असू शकते. नेहमी रिपोर्टींग डॉक्टर वेगळे असतात. मी या रूग्णावर उपचार केलेले नाहीत. या संदर्भात उपस्थिती असलेले डॉक्टर तुम्हाला माहिती देवू शकतील,” अशी सावध प्रतिक्रिया डॉ. श्रीकांत वारदे यांनी दिली.

डॉ. श्रीकांत वारदे यांची प्रतिक्रिया :

 

पूजा अरुण राठोडचा पहाटे गर्भपात

यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पूजा अरूण राठोड नावाच्या मुलीचा गर्भपात झाल्याची नोंद आहे. ही पूजा अरूण राठोड हीच पूजा चव्हाण आहे का याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. पण नाव पूजा आणि त्यानंतर ह्या प्रकरणात अरूण राठोडचं असलेलं कनेक्शन यावरुन पूजा चव्हाण हीच पूजा अरूण राठोड असावी, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. विशेष म्हणजे मंत्री आणि अरूण राठोड यांची ही व्हायरल ऑडिओ क्लीप आहे. त्यातही प्रेग्नंसीबाबत चर्चा होताना दिसते आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही नवी माहिती महत्त्वपूर्ण मानली जाते आहे.

पूजा अरूण राठोड ही 6 फेब्रुवारीला पहाटे 4 वाजून 34 मिनिटांनी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेली होती. तशी नोंद अहवालात आहे. तिचा वॉर्ड क्रमांक 3 होता आणि डॉ. श्रीकांत वारदे यांनी तिच्यावर उपचार केल्याचं रिपोर्टमध्ये दिसतं आहे. टीव्ही 9 मराठीनं डॉक्टरांशी संपर्क केला पण ते नॉट रिचेबल आहेत.

इतर बातम्या :

मोठी बातमी : श्रीमती पूजा अरुण राठोडचा यवतमाळमध्ये गर्भपात!  

‘नो वन किल्ड जेसिका’ सारखी पूजा चव्हाण प्रकरणाची गत होईल, राज्य सरकारच्या भूमिकेवर फडणवीसांकडून प्रश्नचिन्ह 

पूजा राठोडचा गर्भपात ते पूजा चव्हाणची आत्महत्या, यवतमाळ ते पुणे 45 तासांचा घटनाक्रम

(not done the treatment of pooja arun rathore said dr. shrikant varade)