आता बदला घेण्याची वेळ, मराठा नेते मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले? कोण आहे टार्गेटवर?

मनोज जरांगे पाटील यांचं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पुन्हा एकदा उपोषण सुरू आहे. गेल्या 11 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. मात्र अजूनही मागण्या मान्य होत नसल्याचं पाहून त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. इतकंच काय तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

आता बदला घेण्याची वेळ, मराठा नेते मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले? कोण आहे टार्गेटवर?
आता बदला घेण्याची वेळ, मराठा नेते मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले? कोण आहे टार्गेटवर?
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Sep 08, 2026 | 3:06 PM

मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. गेल्या 11 दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे त्यांचं उपोषण सुरू आहे. या दरम्यान सराकरी शिष्टमंडळ आणि अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेत त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. तसेच त्या मागण्यांवर अंमलबजावणी करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण जिथपर्यंत समाधानकारक निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं होतं. इतकंच काय तर सरकारला अल्टिमेटमही दिला होता. आता उपोषणाच्या 11व्या मनोज जरांगे पाटील यांचा संताप झाला आहे. अजूनही ठोस असं काही होताना दिसत नसल्याने आपला राग व्यक्त केला आहे. इतकंच काय तर मंत्री राधाकृष्ण पाटील यांच्यावर आगपाखड केली आहे. इतकंच काय तर सरकारवरही टीकास्त्र सोडलं.  जरांगे पाटील म्हणाले की, ‘आता तीन वर्षांच्या बदला घ्यायची वेळ आहे, देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांचं वाटोळं केलं त्याचा बदला घेण्याची वेळ आली आहे. 12 तारखेला मुंबईत बदला घ्यायचा.’

राधाकृष्ण विखे पाटील यांनी मला धमकी देऊ नये, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. विखेंनी गोड बोलून मराठ्यांचं वाटोळं केलं, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली. विखेंनी खरं बोलावं, तुमच्यामुळे मराठ्यांचं वाटोळं झालं, असंही ते पुढे म्हणाले. अंतरवालीत नाही आलात तरी चालेल आम्ही बोलावलंही नाही, असं सांगत त्यांनी सरकारवर आपला राग व्यक्त केला. सत्तेचा आनंद घ्यावासा वाटतो, तसाच अपमानही पचवावा लागतो, अशी बोचरी टीकाही त्यांनी या निमित्ताने केली. सातारा संस्थानचं गॅझेज देतो बोलला होतात, त्याचं काय केलं सांगा? असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला. बावनकुळे, शिरसाटांनी मराठ्यांचं वाटोळं केल्याचा आरोपही त्यानी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणाच्या ताटातला काढून कोणाला देणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे. या विधानावर जरांगे पाटील आक्रमकपणे बरसले आणि म्हणाले की, ताटातला मागतचं नाही. काही बोलायचं. या विधानामुळे तळपायाची आग मस्तकात जाते. आम्ही म्हंटलं का की 32 टक्क्यातील 20 टक्के आरक्षण आम्हाला द्या. आमच्या नोंदी आणि गॅझेट द्या म्हणतोय. ज्यांनी आमचं वाटोळं केलं आम्ही त्याचं वाटोळं करणार. हे आंदोलन खूप अवघड होणार, असा इशाराही त्यांनी दिला. मुंबईला प्रदक्षिणा होणार, असंही ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us