AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tukaram Mundhe: इन्स्टावर तुकाराम मुंढे सुसाट, फडणवीस, शिंदेंना टाकले मागे, फॉलोअर्स किती वाढले?

Tukaram Mundhe Instagram : शिस्तप्रिय सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची सोशल मीडियावरही क्रेझ वाढली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचा कारभार हाती घेतल्यापासून भेसळखोर धास्तीत आहेत. यामुळे मुंढे यांची लोकप्रियता शिखरावर आहेत. इन्स्टावर त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांना मागे टाकले आहे.

Tukaram Mundhe: इन्स्टावर तुकाराम मुंढे सुसाट, फडणवीस, शिंदेंना टाकले मागे, फॉलोअर्स किती वाढले?
तुकाराम मुंढे इन्स्टाImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Sep 08, 2026 | 2:57 PM
Share

धडाकेबाज सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची सोशल मीडियावरही क्रेझ वाढली आहे. अन्न आणि औषध प्रशासन खात्याचा कारभार त्यांनी हाती घेतल्यापासून दूध, मिठाई, तेल आणि इतर अन्न घटकात भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. औषधांपासून ते अन्न पदार्थांपर्यंत भेसळखोरांनी मोठा धसका घेतला आहे. अनेक हॉटेल्स, कॅन्टिन, ढाबे आता चकाचक झाले आहेत. मुढें यांची लोकप्रियता समाज माध्यमांवर सुद्धा वाढली आहे. इन्स्टाग्रामवर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागे टाकले आहेत.

नेत्यांना मुंडे यांनी टाकले मागे

करड्या शिस्तीचे अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोशल मीडियावर भरारी घेतली आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, इन्स्टाग्रामवर त्यांचे फॉलोअर्सच नाही तर ऑडियन्स एंगेजमेंटही वाढली आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर बड्या नेत्यांनाही पिछाडीवर टाकलं आहे.

इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सच्या संख्येत वाढ

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या इन्स्टाग्राम खात्यावरील फॉलोअर्सची संख्या वाढली आहे. त्यांचे इन्स्टावर 34 ते 37 लाख फॉलोअर्स आहेत. तर त्या तुलनेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळपास 29 लाख तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे 13 ते 30 लाखांच्या जवळपास फॉलोअर्स आहेत.

सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे, त्यांचा एंगेजमेंट रेटही वाढला आहे. त्यानुसार, तुकाराम मुंढे यांचा एंगेजमेंट रेट हा 20.35 टक्के इतका आहे. तर मुख्यमंत्री फडणवीस यांचा एंगेजमेंट रेट हा 0.50 टक्के आणि एकनाथ शिंदे यांचा एंगेजमेंट रेट हा 0.24 टक्के इतका आहे.

पोस्ट कमी, पण लोकप्रियता वाढली

गेल्या 60 दिवसांतील पोस्टचा विचार करता देवेंद्र फडणवीस यांच्या अकाऊंटवर 97 पोस्ट करण्यात आल्या आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या इन्स्टा खात्यावर 25 पोस्ट करण्यात आल्या आहेत. त्या तुलनेत तुकाराम मुंढे यांच्या खात्यावर अवघ्या 13 पोस्ट करण्यात आल्या आहेत. पोस्टच्या मानाने त्यांचा एंगेजमेंट रेट वाढला आहे.

मे 2026 मध्ये मुंढे यांनी FDA चे आयुक्त म्हणून कारभार हाती घेतला. तेव्हापासून त्यांनी कारवाईचा धडाका लावला आहे. एफडीएने राज्यात दूध डेअर, मोठे ब्रँड्स, हॉटेल, रेस्टॉरंट, शाळेजवळील टपऱ्यांसह मोठी गोदामं आणि इतर प्रतिष्ठानावर कारवाईचा बडगा उगारला आहे. सर्वसामान्य या कारवाईमुळे सुखावले आहेत. लोकांच्या जीवांशी खेळणाऱ्यांविरोधात कारवाई होत असल्याचा दिलासा त्यांना मिळाला आहे. कारवाईचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले आहेत.

Follow Us
आता शिष्टमंडळ पुन्हा चर्चेला जाणार नाही! विखे-पाटलांचा जरांगेंना संदेश
Radhakrishna Vikhepatil | आता शिष्टमंडळ पुन्हा चर्चेला जाणार नाही! राधाकृष्ण विखे-पाटलांचा जरांगेंना स्पष्ट संदेश
पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट
Water Shortage | पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट; शेतकऱ्यांसमोर मोठं संकट
संतोष पंडित प्रकरणात नवा ट्विस्ट! महिलेच्या समर्थनार्थ नागरिक एकवटले
Pune Protest | संतोष पंडित प्रकरणात नवा ट्विस्ट! तक्रारदार महिलेच्या समर्थनार्थ नागरिक एकवटले; ट्रोलर्सविरोधात कठोर कारवाईची मागणी
लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली अन्... वाघ यांचा पटोलेंवर घणाघात
Chitra Wagh | लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली अन् सावत्र भावाच्या... चित्रा वाघ यांचा नाना पटोलेंवर घणाघात
मराठा आरक्षणावर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
Sudhir Mungantiwar | मराठा आरक्षणावर सुधीर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! गुणरत्न सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं
नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल
Sanjay Raut | नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल; पुढे म्हणाले, देशाचे कॅबिनेट...
श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले
Sanjay Gaikwad | श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले...
रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं! मराठा आरक्षणावर सरकारची...
Maratha Reservation | रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं! मराठा आरक्षणावर सरकारची महत्त्वाची बैठक; फडणवीसांसह...
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...