पोलादपूरच्या ओंकारची जागतिक गोफण स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड, आर्थिक मदतीचं आवाहन

| Updated on: Aug 14, 2021 | 4:20 PM

पोलादपूर तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून एक सुसंस्कृत उच्च विद्याविभूषित नम्र तरुण शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिके दाखवित प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना या युद्धकलांचे प्रशिक्षण देत असल्याने त्या तरुणाबाबत सर्वत्र उत्कंठा अन् उत्सुकता वाटत आहे.

पोलादपूरच्या ओंकारची जागतिक गोफण स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड, आर्थिक मदतीचं आवाहन
Follow us on

रायगड : पोलादपूर तालुक्यातील घागरकोंड येथे कृषी पर्यटनासाठी फार्महाऊस आणि शेळीपालन करून तरुणांना शेतकरी आणि मावळ्यांच्या जीवनपद्धतीचे आकर्षण निर्माण करणारा उच्चविद्याविभूषित आणि परदेशात नोकरी करून आपल्या वडिलांच्या मूळगावी परतलेल्या ओंकार उतेकर या तरुणाची जागतिक गोफण स्पर्धेसाठी 14 जणांच्या भारतीय संघात निवड झाली.

त्या तरुणांबाबत सर्वत्र उत्कंठा अन् उत्सुकता

स्पेन देशात होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आर्थिक चणचण भासत असल्याने ओंकार उतेकर याने मदतीचे आवाहन केलेय. पोलादपूर तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून एक सुसंस्कृत उच्च विद्याविभूषित नम्र तरुण शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिके दाखवित प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना या युद्धकलांचे प्रशिक्षण देत असल्याने त्या तरुणाबाबत सर्वत्र उत्कंठा अन् उत्सुकता वाटत आहे.

भारताच्या गोफण संघात 14 जणांमध्ये स्थानही

वडील मुंबई पोलिसांत असल्याने जन्म मुंबईत झाला अन् एमबीए करून दुबई येथे काही वर्षे नोकरी करून परतल्यानंतर ओंकार याला मूळ गावाची साद ऐकू आली. महाविद्यालयीन काळात बॉक्सिंग खेळात नैपुण्य प्राप्त करणाऱ्या ओंकार उतेकर याला छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये घागरकोंड येथे वडिलांचे मूळ गाव असल्याने लाठी-काठी-बनाटी, तलवारबाजी आणि गोफण गलोलीसारखे शिवकालीन युद्धकलेचे मर्दानी खेळ लीलया आत्मसात झाले आणि त्याने या युद्धकलेचा प्रसार सुरू केला. याचदरम्यान, ओंकार याचा हातखंडा असलेल्या गोफण खेळात त्याने एकाग्रता पणाला लावून भारताच्या गोफण संघात 14 जणांमध्ये स्थानही मिळविले.

ओंकार उतेकरला आर्थिक निकड भासतेय

येत्या 14 ते 17 ऑक्टोबरपर्यंत स्पेन देशात होणाऱ्या या वर्ल्ड स्लिगिंग स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मोठा आर्थिक खर्च असताना ओंकार याने दुबईतून आल्यानंतर सगळी जमापुंजी शेळी पालन व पशू पालन करून मर्दानी खेळांचा प्रसार करण्यासह कृषी पर्यटनासाठी गुंतवली असल्याने आता स्पेन देशात जाऊन स्लिगिंग चॅम्पियन स्पर्धेत सहभागी होत भारतासाठी एक पदक आणण्याची पक्की खात्री असलेल्या ओंकार उतेकर याला आर्थिक निकड भासत आहे. आता शिवकालीन युद्ध कलांचा प्रचार, प्रसार व प्रात्यक्षिके पाहणाऱ्या इतिहासप्रेमींना ओंकार उतेकर याने या स्पेन दौऱ्यासाठी मदतीचे आवाहन केले.

संबंधित बातम्या

Nitin Gadkari letter to Maha CM : भावनिक साद आणि गर्भित इशारा, नितीन गडकरींच्या पत्रातील पाचवा स्फोटक मुद्दा

मुंबईत ऐकावं ते नवलच, फेरीवाल्याकडे अनेक घरं, कोट्यवधीची माया, पोलिसांनी कशी उघड केली क्राईम साखळी?

Omkar of Poladpur selected in Indian team for World Sling Championship, appeal for financial help