AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत ऐकावं ते नवलच, फेरीवाल्याकडे अनेक घरं, कोट्यवधीची माया, पोलिसांनी कशी उघड केली क्राईम साखळी?

रेल्वे पोलिसांच्या मते आरोपी संतोषकुमार 2005 च्या आसपास उत्तर प्रदेशहून मुंबईला आला. सुरुवातीला तो दादर स्टेशनच्या ब्रिजवर शेव्हिंग ब्लेड्स विकायचा. त्यावेळी तो काही गुन्हेगारांच्या संपर्कात आला आणि त्याने खंडणीखोरीचं तंत्र अवगत केलं

मुंबईत ऐकावं ते नवलच, फेरीवाल्याकडे अनेक घरं, कोट्यवधीची माया, पोलिसांनी कशी उघड केली क्राईम साखळी?
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Aug 14, 2021 | 8:30 AM
Share

मुंबई : मुंबईत चक्क एक फेरीवालाच संघटित गुन्हेगारीचं रॅकेट चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून कल्याणपर्यंत वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवरील फेरीवाल्यांकडून तो खंडणी वसुली करत होता, आणि अशाप्रकारे त्याने कोट्यवधींची माया जमवली. जीआरपी अर्थात रेल्वे पोलिसांनी एका फेरीवाल्याच्याच तक्रारीवरुन आरोपी संतोषकुमार सिंग (Santoshkumar Singh) उर्फ बबलू ठाकूर (Bablu Thakur) याच्या मुसक्या आवळल्या. या 43 वर्षीय म्होरक्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करत, त्याच्या पत्नीसह एकूण आठ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

दहा कोटींपेक्षा अधिकच्या मालमत्ता

रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार संतोषकुमारने मुंबई, नवी मुंबई आणि उत्तर प्रदेशातील त्याचे गाव सुलतानपूरमध्ये कोट्यवधींच्या मालमत्ता विकत घेतल्या आहेत. पोलिसांना मुंबई परिसरातच 10 प्रॉपर्टी सापडल्या आहेत. यामध्ये इमारतींमधील फ्लॅट्ससह चाळीतील घरांचाही समावेश आहे. दादर, परळ, कल्याण, तुर्भे आणि सुलतानपूरमधील पाच एकर जमीन ही संतोषकुमार सिंग आणि त्याची पत्नी रिता यांच्या नावावर आहेत. कागदोपत्री त्यांचे मूल्य पाच कोटी रुपये असले, तरी सध्याच्या बाजारभावानुसार ते दहा कोटींपेक्षा अधिक असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

सिंग दाम्पत्याने विकत घेतलेल्या बहुतांश जागा या चाळीत असून त्यांचा पुनर्विकास होण्याची शक्यता आहे. म्हणजेच रिडेव्हलपमेंटनंतर नफा मिळवण्याच्या उद्देशानेच त्यांनी गुंतवणूक केली असावी, असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी म्हटल्याचं ‘मिड डे’ वर्तमानपत्रातील रिपोर्टमध्ये आहे.

काय होती मोडस ऑपरेंडी?

रेल्वे पोलिसांच्या मते आरोपी संतोषकुमार 2005 च्या आसपास उत्तर प्रदेशहून मुंबईला आला. सुरुवातीला तो दादर स्टेशनच्या ब्रिजवर शेव्हिंग ब्लेड्स विकायचा. त्यावेळी तो काही गुन्हेगारांच्या संपर्कात आला आणि त्याने खंडणीखोरीचं तंत्र अवगत केलं. सुरुवातीला त्याने स्थानिक गुन्हेगारांना दारुची ऑफर दिली. त्या बळावर संतोषने त्यांना रॅकेट चालवायला शिकवलं. टोळीचे सदस्य इतर फेरीवाल्यांना ‘संरक्षण हफ्ता’ (Protection Money) देण्यासाठी धमकावायचे. हा हफ्ता साधारणपणे दिवसाला 500 ते 5 हजार रुपयांपर्यंत असायचा, असंही पोलिसांनी सांगितलं.

विमानाशिवाय बात नाही

काही वर्षांतच संतोषकुमार सिंग लाखात कमावू लागला. त्याने मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. टोळीतील सदस्यांनाही तो या रकमेतील मोठा वाटा द्यायचा. अशाप्रकारे त्याने महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर रॅकेट तयार केली. 2010 नंतर तर संतोष आणि त्याच्या कुटुंबीयांनी गावी जाण्यासाठी रेल्वे प्रवास बंद केला. ते केवळ विमानाने जायचे.

आठ महिने तुरुंगाची हवा

2006 मध्ये संतोषला अटक करण्यात आली होती. त्याच्याविरुद्ध खंडणी, दरोडा, हत्येचा प्रयत्न अशा 25 केसेस दाखल करण्यात आल्या होत्या. अवैध शस्त्र बाळगल्याच्या प्रकरणात त्याने आठ महिने तुरुंगाची हवाही खाल्ली होती. बऱ्याचशा खटल्यांमध्ये त्याला सहज जामीन मिळायचा आणि तो साक्षीदारांनाच धमकावायचा. त्यामुळे त्याच्याविरुद्ध केस उभीच राहायची नाही. मात्र यावेळी आम्ही मोक्का (MCOCA) लावून कारवाई केली आहे, असं पोलिसांनी सांगितलं.

30 सेव्हिंग्ज अकाऊण्ट

रेल्वे पोलिसांनी संतोषकुमार सिंगला एक महिन्यांची कोठडी सुनावली आहे. त्याची माया 30 हून अधिक सेव्हिंग्ज अकाऊण्ट्समध्ये असल्याची माहिती आहे. यातील बहुतांश खाती पतपेढ्यांमध्ये, तर काही राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये आहेत. तो दररोज एका पतसंस्थेत पैसे जमा करायचा. मग या मालमत्ता कर्जाद्वारे खरेदी केल्या आहेत, हे दाखवण्यासाठी तो त्यांच्याकडून कर्ज घ्यायचा. त्याच्या सर्व बचत खात्यांमधील जवळपास 12 लाख रुपये गोठवण्यात आले आहेत.

संतोषच्या टोळीत कोण कोण होतं?

विजय भुतेकर आणि पंकज भोसले हे इतर फेरीवाल्यांना धमकवण्याचं काम करत. भोसले आणि भुतेकर यांच्याविरुद्ध किमान 15 गुन्हे दाखल आहेत. याशिवाय लता पवार पैसे गोळा करायची, संतोषची प्रेयसी दीपाली कामथे हिने त्याना केस दाखल झाल्यावर पळून जाण्यास मदत केली होती. समीर लालझरे आणि संजय मोहिते हे राज्यातील राजकीय पक्षांचे सदस्य आहेत. खंडणीच्या पैशातून विकत घेतलेल्या मालमत्ता संतोषची पत्नी रिताच्या नावावर असल्याने तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या तावडीतून वाचण्यासाठी गेल्या चार वर्षांत संतोषने अनेक वेळा आपल्या गँगचे सदस्य बदलले आहेत.

नाट्यमय पाठलागानंतर जेरबंद

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संतोषकुमारला पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली होती. ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर नाट्यमय पाठलागानंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. केस दाखल झाल्याचं समजताच गोवंडीतील गँग मेंबर्ससोबत त्याने पोबारा केला होता. मात्र स्थानिक पोलिसांची मदत आणि नाकाबंदी करत आम्ही त्याला ठाण्यापर्यंत गाठलं. पोलिसांच्या गाड्या त्याच्या मागावर होत्या, थांबायला सांगूनही तो ऐकत नव्हता. अखेर आमच्या पथकाने त्याच्या गाडीची समोरची काच फोडली आणि ठाणे टोलनाक्याजवळ त्याची धरपकड केली.

संतोषवर अंकुश ठेवणारा मास्टरमाईंड सीएसएमटी भागातून हे रॅकेट चालवत असल्याचा पोलिसांना संशय आहे. या सूत्रधाराबाबत अद्याप ठोस पुरावे हाती लागलेले नाहीत, कारण संतोषसोबत त्याने कधीच फोनवर संभाषण केलेले नाही. त्यामुळे त्या दिशेनेही पोलिसांचा तपास सुरु आहे.

संबंधित बातम्या :

वैशाली वीर झनकर यांना एक दिवसाची पोलीस कोठडी, उद्या कोर्टात पुन्हा हजर करणार, दिवसभरात काय-काय घडलं?

नाकाबंदी सुरु असताना गाडी थांबवली, वाहतूक पोलिसाला दगडाने मारहाण, कल्याणमधील धक्कादायक घटना

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.