AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ऑपरेशन टायगर’चा आज फैसला! घडामोडींना वेग, आदित्य ठाकरे यांचा ओमराजे निंबाळकर यांना प्रतिसाद, थेट..

ओमराजे निंबाळकर आज मोठा राजकीय फैसला घेणार आहेत. त्यांच्या या फैसल्यानंतर ऑपरेशन टायगर यशस्वी होणार की, नाही हे स्पष्ट होईल. यादरम्यानच रात्री मोठ्या घडामोडी घडताना दिसल्या. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी मध्यरात्री ओमराजे निंबाळकर यांची भेट घेतली.

'ऑपरेशन टायगर'चा आज फैसला! घडामोडींना वेग, आदित्य ठाकरे यांचा ओमराजे निंबाळकर यांना प्रतिसाद, थेट..
Omraje Nimbalkar
| Updated on: Jun 21, 2026 | 8:51 AM
Share

ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून एकनाथ शिंदे गटाने शिवसेना ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार फोडले. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही बंडखोरी केली. बाकी 5 खासदार शिवसेना शिंदे गटाकडून अज्ञातस्थळी हलवण्यात आले. मात्र, ओमराजे निंबाळकर वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडाच्या केसचा निर्णय असल्याने आपल्या कुटुंबियांसोबत आहेत. काल त्यांना मोठा धक्का बसला. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणात सर्व आरोपींनी पुरावे नसल्याने कोर्टाने निर्दाेष मुक्तता दिली. त्यानंतर आपली राजकीय भूमिका एक ते दोन दिवसात स्पष्ट करणार असल्याचा निर्णय ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले. त्यापूर्वीच आपल्या राजकीय भूमिकेबद्दल बोलताना ओमराजे निंबाळकर दिसले होते. त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. फक्त हेच नाही तर त्यादरम्यान उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावरही बोलताना ते दिसले.

वडिलांच्या केसचा निकाल आपल्याच बाजूने लागावा, याकरिता ओमराजे निंबाळकर हे शिवसेना शिंदे गटात जात असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला. आता ओमराजे निंबाळकर यांची मनधरणी शिवसेना ठाकरे गटाकडून केली जात आहे. याकरिता ओमराजे निंबाळकर यांचे अत्यंत जवळचे त्यांच्या जिल्ह्यातील दोन आमदारांना कामाला लावले.

काल आमदार कैलास पाटील थेट मातोश्रीवर पोहोचले होते. जर ओमराजे निंबाळकर यांनी त्यांचा निर्णय बदलला तर 5 खासदारांची खासदारकी धोक्यात येऊ शकते, ज्यांनी शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केली. यामुळेच आपले 6 खासदार परत आणण्याकरिता शिवसेना ठाकरे गटाकडून जोर लावला जात आहे. आज ऑपरेशन टायगरच्या फैसला होणार आहे. आज धाराशिवमध्ये होणाऱ्या बैठकीकडे सर्वांच्या नजरा आहेत, तिथेच फैसला होणार आहे.

5 खासदारांची राजकीय भविष्य धोक्यात आहे. आपले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून ओमराजे निंबाळकर आपला निर्णय घेणार आहे. तिथेच स्पष्ट होईल की,एकनाथ शिंदे यांचे ऑपरेशन टायगर यशस्वी झाले की, नाही. त्यामध्येच मध्यरात्रीच कैलास पाटील आणि वरूण सरदेसाई यांनी ओमराजे निंबाळकर यांची भेट घेतली. ज्याने घडामोडींना वेग आला.

ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले होते की, मी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर यापूर्वी कधी बोललो नव्हतो, बोलणार नाही आणि भविष्यातही बोलणार नाही. याला प्रतिसाद देताना आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे यांचे मन मोठे आहे, ज्यांना परत यायचे आहे, त्याचे स्वागत आहे. पक्षाच्या विरोधात जातील, त्यांच्यावर कारवाई होणार. ओमराजे निंबाळकरांशी कुठलाही संपर्क झाला नाही, त्यांचे तळ्यात मळ्यात असो पण डुबायला नको हे त्यांच्यावर आहे,असे स्पष्ट आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

Follow Us
6 खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त.
Uddhav Thackeray | विश्वासू खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त...
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीह
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीही उपस्थिती
कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
kalyan | कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव...
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव... मुख्यमंत्र्यांनी सूत्रसंचालकाला मध्येच अडवलं अन्...
6 बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
Uddhav Thackeray | 6 बंडखोर खासदारांविरोधात उद्धव ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा घराबाहेर गराडा; पुण्यातील राजकीय हालचालींना वेग
परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला
Parbhani| परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला, अनेकजण जखमी
शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
Amit Shah | शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम...
Omraje Nimbalkar | शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम निर्णय घेणार!
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी... राजकारणातील घडामोडींना वेग