गिर्यारोहणासाठी दोघे मित्र डोंगरावर, ताटतूट झालेल्या मित्राचा मृतदेह आढळला 

| Updated on: Feb 08, 2021 | 11:47 PM

पनवेलच्या डोंगरावर गिर्यारोहणासाठी गेलेल्या दोन मित्रांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. (One Person died Panvel Mountaineering)

गिर्यारोहणासाठी दोघे मित्र डोंगरावर, ताटतूट झालेल्या मित्राचा मृतदेह आढळला 
Follow us on

पनवेल : पनवेलच्या डोंगरावर गिर्यारोहणासाठी गेलेल्या दोन मित्रांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. वैभव कवडे असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. सुदैवाने निसर्ग मित्र मंडळा आणि पोलिसांच्या मदतीने एकाला वाचवण्यात यश आले आहे. त्याला सुखरुप खाली आणण्यात यश आले आहे. (One Person died during Panvel Chanderi Mountaineering)

पनवेल तालुक्यातील चंदेरी डोंगरावर अनेक गिर्यारोहक गिर्यारोहणासाठी येत असतात. सागर भिलारे (24) आणि वैभव कवडे (24) या दोघांनीही या डोंगरावर गिर्यारोहणाचा प्लॅन आखला होता. त्यानुसार वैभव हा ऐरोली तर सागर हा मुलूंडहून चंदेरी डोंगराजवळ एकमेकांना भेटले.

यानंतर या दोघांनीही चंदेरी डोंगरावर गिर्यारोहण करण्यास सुरुवात केली. डोंगराच्या मध्य रस्त्यावर गेले असताना त्या दोघांची ताटातूट झाली. त्यानंतर सागरने वैभवला फोन करत त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा वैभवशी काहीही संपर्क झाला नाही. यानंतर सागरने घडलेल्या सर्व घटनेची त्याच्या कुटुंबियांना दिली. तसेच पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलीस पथकाने त्वरित निसर्ग मित्र मंडळाशी संपर्क साधला. या पथकाने या दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

यावेळी पोलिसांना सागर भिलारे हा डोंगर कपारीत अडकलेल्या अवस्थेत आढळून आला. तर त्याचा मित्र वैभव कवडे हा पाय घसरुन खाली पडल्याने गंभीररित्या जखमी अवस्थेत सापडला. वैभवला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, त्याला मृत घोषित करण्यात आले. पनवेल तालुका पोलीस ठाण्यात याबाबतची नोंद करण्यात आली आहे. (One Person died during Panvel Chanderi Mountaineering)

संबंधित बातम्या : 

पुणेकरांनो पाणी जपून वापरा! येत्या गुरुवारी पाणीपुरवठा बंद

नागपूर, अमरावती विभागाला अद्यापही कोरोनाचा मोठा धोका? केंद्रीय पथकाचा सतर्कतेचा इशारा, मुख्यमंत्र्यांची सूचना काय?

चोर पोलिसांना घाबरले, पोलीस चोरांना घाबरले; मग काय घडलं? वाचा!