सर्वात मोठी बातमी! हालचालींना वेग… ठाकरेंच्या खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीला रवाना, रात्रीत मोठं काहीतरी घडणार?

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना ठाकरेंचे काही खासदार दिल्लीला गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.

सर्वात मोठी बातमी! हालचालींना वेग... ठाकरेंच्या खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीला रवाना, रात्रीत मोठं काहीतरी घडणार?
Eknath Shinde Going to delhi
Image Credit source: Google
| Updated on: Jun 16, 2026 | 11:17 PM

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना ठाकरेंचे काही खासदार दिल्लीला गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या ठाकरे गटाचे दोन खासदार हे दिल्लीत आहेत, तसेच दोन खासदार नॉट रिचेबल असल्याचेही समोर आले आहे. त्यानंतर आता एकनाथ शिंदे हेही दिल्लीला रवाना झाल्याचे समोर आले आहे, त्यामुळे रात्रीत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

ठाकरेंचे खासदार दिल्लीत

समोर आलेल्या माहितीनुसार परभणीचे खासदार संजय जाधव, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब बाकचौरे, खासदार राजाभाऊ वाजे हे सर्वजण सध्या दिल्लीला गेल्याची माहिती समोर आली आहे. यातील काही खासदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. हे खासदार आता नवा गट स्थापन करणार असल्याचे समोर आले आहे. त्यासाठी ते उद्या लोकसभा सदस्यांना पत्र देणार असल्याचे समोर आले आहे.

19 जूनपूर्वी वेगळा गट स्थापन होणार?

समोर आलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या 9 खासदारांपैकी 6 खासदार बंड करण्याच्या तयारीत आहेत. येत्या 19 जूनला शिवसेना पक्षाचा स्थापनादिन आहे. या दिवसाच्या अगोदरच हे सर्व खासदार आपला वेगळा गट स्थापन करण्याच्या विचारात आहेत, असे बोलले जात आहे. त्याबाबतची तयारीही सुरू झाली असल्याचे समोर आले आहे. हे खासदार उद्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार असून त्यांना वेगळा गट स्थापन करण्याबाबत पत्र दिले जाणार असल्याचेही समोर आले आहे. असे झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना हा सर्वात मोठा धक्का असणार आहे.

खासदार नाराज

दरम्यान, काही खासदार हे उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीवर नाराज असल्याची माहिती समोर आली होती. उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला काही खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते, तर काही खासदार ऑनलाईन उपस्थित होते. तेव्हापासून हे खासदार फुटणार असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता घडामोडींना वेग आला आहे.

Follow Us