AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2 खासदार दिल्लीत दाखल, 4 खासदार…शिवसेना स्थापना दिनाआधीच ठाकरे यांना शिंदेंकडून जबर हादरा? राजधानीतून मोठी माहिती!

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि अनिल देसाई हे दिल्लीला पोहोचले आहेत. येत्या 19 जून रोजी शिवसेना पक्षाचा स्थापनादिन आहे. या दिवसाच्या अगोदरच हे सर्व खासदार आपला वेगळा गट स्थापन करण्याच्या विचारात आहेत, असे बोलले जात आहे.

2 खासदार दिल्लीत दाखल, 4 खासदार...शिवसेना स्थापना दिनाआधीच ठाकरे यांना शिंदेंकडून जबर हादरा? राजधानीतून मोठी माहिती!
uddhav thackeray and eknath shindeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 16, 2026 | 9:35 PM
Share

UBT Shivsena MP Revolt : राज्याच्या राजकारणात लवकरच मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरे यांचे खासदार लवकरच बंड करणार असून ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील होण्याची शक्यता आहे. ही संपूर्ण प्रक्रिया घडवून आणण्यासाठी पडद्यामागे बऱ्याच हालचाली सुरू असल्याचे सांगितले जात आहे. संभाव्य फूट टाळण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला एकूण पाच खासदार अनुपस्थित होते. या सर्व घडामोडी घडत असतानाच आता सर्वात मोठी माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून राबवल्या जाणाऱ्या ऑपरेशन टायगर अंतर्गत शिवसेना पक्षाच्या स्थापना दिनाच्या अगोदरच ठाकरे यांना मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे.

नेमकी काय माहिती समोर आली?

मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे याच्या पक्षातील एकूण 9 खासदारांपैकी 6 खासदार बंड करण्याच्या तयारीत आहेत. हे सर्वच खासदार लवकरच आपला नवा गट स्थापन करणार आहेत. ही शक्यता क्षात घेता ठाकरे गटदेखील ही संभाव्य फूट टाळण्यासाठी सक्रिय झाला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि अनिल देसाई हे दिल्लीला पोहोचले आहेत. येत्या 19 जून रोजी शिवसेना पक्षाचा स्थापनादिन आहे. या दिवसाच्या अगोदरच हे सर्व खासदार आपला वेगळा गट स्थापन करण्याच्या विचारात आहेत, असे बोलले जात आहे. त्यासाठी हालचाली वाढल्या आहेत. दोन खासदार दिल्लीमध्ये पोहोचले आहेत. उर्वरित चार खासदार हे आज रात्रीच दिल्लीला पोहोचणार आहेत. हे सर्वाच्या सर्व खासदार वेगळा गट स्थापन करून तो एकनाथ शिंदे यांच्या पक्षात विलीन करणार असल्याचे बोलले जात आहे.

आमचे खासदार कुठेही जाणार नाहीत

दरम्यान, शिंदे यांच्या पक्षाकडून ऑपरेशन टायगर राबवले जात आहे, असे वारंवार सांगितले जात आहे. ठाकरे गटाने मात्र सर्व खासदार आमच्यासोबतच आहेत. ते कुठेही जाणार नाहीत, असा दावा केला आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी