
निवडणूक आयोगाच्या विरोधात विरोधकांचा आज सत्याचा मोर्चा आहे. या मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली असून जवळपास राज्यातील सर्व विरोधी पक्ष या मोर्चात सहभागी होत आहेत. मुंबईत मोर्चासाठी राज्यभरातून कार्यकर्ते दाखल होताना दिसत आहेत. या मोर्च्यात ऊद्धव ठाकरे , अदित्य ठाकरे , राज ठाकरे, अमित ठाकरे , जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, वर्षा गायकवाड, विजय वडेट्टीवार यांच्यासोबत सर्व डावे पक्षाचे नेते ऊपस्थित राहणार आहेत. दुपारी 1 वाजता मोर्चाला सुरूवात होईल. ‘सत्याचा मोर्चा’ची जवळपास पूर्ण तयारी झाल्याचे दिसतंय. विरोधी पक्षांची झेंडे ठिकठिकाणी मुंबईत लावण्यात आलीत. सर्वपक्षीय झेंडे लावून जोरदार वातावरण निर्मिती करण्यात आली.
शिवसेना (उबाठा), मनसे, काँग्रेससह सर्व डावे पक्ष यात सहभागी होत आहेत. खोट्या मतदारांविरुद्ध खरे मतदार जागे व्हा! अशाप्रकारच्या घोषणा मोर्चात दिल्या जाणार आहेत. बोगस मतदार यादी, यादीतील फेरफार असे गंभीर आरोप करत विरोधकांकडून हा मोर्चा काढला जातोय. सध्या बिहारच्या निवडणुकीची चर्चा असतानाच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यातही मुंबई महानगरपालिकेची निवडणूकही देशाच्या राजकीय पटलावर अनेक समीकरणांमध्ये बदल घडवून आणण्यास कारणीभूत ठरेल असं म्हटलं जात आहे.
तत्पूर्वी महाराष्ट्रात मतचोरी आणि मतदार याद्यांमध्ये असणारा घोळ लक्षात आणून देत निवडणूक आयोगालाही वेठीस धरलं आहे. याच धर्तीवर लोकशाहीचा आवाज बुलंद करण्यासाठी 1 नोव्हेंबर 2025 रोजी विरोधी पक्षांनी वज्रमूठ एकवटत ‘सत्याचा मोर्चा’ची हाक दिली आहे. विरोधकांच्या सत्याच्या मोर्चावर पावसाचे सावट आहे. मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झालीये. रात्रीही मुंबईत मुसळधार पाऊस पडला होता.
निवडणूक आयोगाविरोधातील मोर्चाची ठाकरेंच्या सेनेकडून जय्यत तयारी केली जातंय. पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना देण्यासाठी ठाकरेंच्या सेनेची काल रात्री 9 वाजता ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेना नेते अनिल परब आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं. मोर्चाला येताना शक्य तो मुंबई लोकलने मोर्चाला पोहचा पदाधिकाऱ्यांना शिवसेनेकडून आदेश. रात्री 9 वाजता आदित्य ठाकरे, अनिल परब अरविंद सावंत यांनी ऑनलाईन पद्धतीने बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं.