AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एप्रिल महिन्यात शाळा सुरु ठेवण्यास विरोध, प्रकरण कोर्टात जाणार, काय आहे नेमका दावा?

Maharashtra School Exam: शासनाच्या आदेशानुसार 2 एप्रिल ते 25 एप्रिलपर्यंत परीक्षा घ्यावी लागणार आहे. प्राथमिक शाळा 200 दिवस आणि उच्च प्राथमिक शाळा 220 दिवस घ्यायचा निर्णय झाला आहे. त्यानुसार शाळांचे दिवस पूर्ण झाले आहेत. मग 22 एप्रिलपर्यंत शाळा का सुरू करतात? असा प्रश्न महामंडळाने विचारला आहे.

एप्रिल महिन्यात शाळा सुरु ठेवण्यास विरोध, प्रकरण कोर्टात जाणार, काय आहे नेमका दावा?
प्रातिनिधिक छायाचित्र
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 28, 2025 | 2:54 PM
Share

Maharashtra School Exam: राज्यातील सर्व शाळांमध्ये एकाचवेळी वार्षिक परीक्षा व दुसरी संकलित मूल्यमापन चाचणी आयोजित करण्याची सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत (एससीईआरटी) करण्यात आली होती. त्यावरुन वाद निर्माण झाला आहे. या सूचनेनुसार राज्यातील शाळा एप्रिल महिन्यात सुरु राहणार आहे. परीक्षा 25 एप्रिलपर्यंत घेण्यात येणार आहे. परंतु या निर्णयास महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने विरोध केला आहे. महामंडळाचे सरचिटणीस रवींद्र फडणवीस यांनी या प्रकरणी कोर्टात जाण्याचा दावा केला.

कोर्टात जाण्याची तयारी

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने म्हटले आहे की, विदर्भातील कडक उन्हात 25 एप्रिलपर्यंत प्राथमिक शाळा सुरु ठेवणे चुकीचे आहे. एप्रिल महिन्यात विदर्भात उन्हाचा पारा वाढलेला असतो. त्यामुळे हा प्रकार विद्यार्थ्यांसाठी धोकादायक आहे. आता महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ या विरोधात न्यायालयात जाणार आहे.

शाळा अंतर्गत परीक्षा घेण्याचे अधिकार मुख्याध्यापक आणि शाळा प्रशासनाचे आहेत. पूर्ण एप्रिल महिन्यात शाळा सुरू ठेवायचा आदेश काढला आहे, तो चुकीचा आहे. हा प्रकार धोकादायक आहे. याबाबत शिक्षण मंत्र्यांना वारंवार पत्र पाठवले आहे.

शाळांचे दिवस पूर्ण मग…

शासनाच्या आदेशानुसार 2 एप्रिल ते 25 एप्रिलपर्यंत परीक्षा घ्यावी लागणार आहे. प्राथमिक शाळा 200 दिवस आणि उच्च प्राथमिक शाळा 220 दिवस घ्यायचा निर्णय झाला आहे. त्यानुसार शाळांचे दिवस पूर्ण झाले आहेत. मग 22 एप्रिलपर्यंत शाळा का सुरू करतात? असा प्रश्न महामंडळाने विचारला आहे.

शासनाच्या निर्णयामुळे मोठ्या विद्यार्थ्यांची परीक्षा आधी आणि प्राथमिक शाळेच्या लहान विद्यार्थ्यांची परीक्षा उशिरा संपणार आहे. प्राथमिक शाळेच्या मुलांच्या परीक्षा 25 एप्रिलला संपणार आहेत. परीक्षा संपतील त्याच दिवशी पेपर तपासायचे, असे शिक्षण मंत्र्यांनी सांगितले आहे. लहान क्षमता असलेल्या शाळांमध्ये ठीक आहे. पण मोठ्या शाळांत हे कसे शक्य होणार? असा प्रश्न महामंडळाने विचारला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नाही. कोर्टाने याआधी निर्णय दिला आहे की विदर्भातील तापमान पाहता शाळा प्रशासनाने निर्णय घ्यावा. त्यानंतर सरकारने पत्र काढले होते. सरकार स्वतः काढलेले पत्र सरकार विसरले आहे, असे रवींद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Follow Us
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत