Kelve Beach Drowned : केळवे समुद्रकिनाऱ्यावर सहा जण बुडाले, बुडालेल्यांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश

| Updated on: Mar 03, 2022 | 6:58 PM

दोन स्थानिक लहान मुले पोहण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उतरली होती. मात्र समुद्राला ओहोटी असल्याने ही मुलं बुडू लागली. नाशिकच्या या तरुणांचे लक्ष या मुलांकडे गेले. मुलं बुडत आहेत हे लक्षात आल्यानंतर यातील 4 तरुण या मुलांना वाचवण्यासाठी पाण्यात गेले.

Kelve Beach Drowned : केळवे समुद्रकिनाऱ्यावर सहा जण बुडाले, बुडालेल्यांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश
Follow us on

पालघर / मोहम्मद हुसेन (प्रतिनिधी) : केळवे समुद्रकिनाऱ्या (Kelve Beach)वर 6 जण बुडाल्या (Drowned)ची दुर्दैवी घटना पालघरमध्ये घडली आहे. यापैकी दोघांना वाचवण्यात यश आले आहे. चौघांचे शव बाहेर काढण्यात आले आहेत. समुद्रात पोहण्यासाठी उतरलेली दोन स्थानिक लहान मुले बुडत होती. त्यांना वाचवण्यासाठी गेलेले नाशिकचे चार तरुणही समुद्रात बुडाले. यापैकी एकाला पोहता येत असल्याने तो बचावला. एका स्थानिक मुलाला वाचवण्यात यश आले आहे. स्थानिकांनी युद्धपातळीवर शोध घेत चारही मृतदेह बाहेर काढले. बचावलेल्या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (6 people drowned in Kelve sea palghar, One rescued, three missing)

लहान मुलांना वाचवण्यासाठी गेले होते तरुण

पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या केळवे समुद्रकिनाऱ्यावर नाशिकमधील कॉलेज तरुणांचा मोठा ग्रुप पिकनिकसाठी आला होता. यावेळी दोन स्थानिक लहान मुले पोहण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उतरली होती. मात्र समुद्राला ओहोटी असल्याने ही मुलं बुडू लागली. नाशिकच्या या तरुणांचे लक्ष या मुलांकडे गेले. मुलं बुडत आहेत हे लक्षात आल्यानंतर यातील 4 तरुण या मुलांना वाचवण्यासाठी पाण्यात गेले. मात्र हे चौघेही पाण्यात बुडाले. या चौघांपैकी एक तरुण पोहणारा असल्यामुळे तो बचावला आहे. तर बुडणाऱ्या एका लहान मुलाही वाचवण्यात यश आले आहे. स्थानिक व्यवसायिक व स्थानिक मच्छिमार मंडळींनी शोध मोहिम राबवत चारही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. घटनास्थळी पोलिसही दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरु आहे. चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.

मयतांची नावे

ओम विसपुते(नाशिक)
दीपक वडाकाते(नाशिक)
कृष्णा शेलार( नाशिक)
अथर्व नागरे(केळवे) (6 people drowned in Kelve sea palghar, One rescued, three missing)

इतर बातम्या

दगडाने ठेचून चाकूने भोसकले! एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या, यवतमाळातील थरारक घटना

धक्कादायक | आमदारांच्याच गावातील सरपंचावर खुनी हल्ला; कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमधील खळबळजनक घटना