बिबट्याने घेतला 16 वर्षीय मुलाचा घास, चंद्रपूर शहरालगतच्या दुर्गापुरात रात्री नेमकं काय घडलं?

| Updated on: Feb 18, 2022 | 12:45 PM

दुर्गापुरात रात्री घराशेजारी शौचास गेलेल्या मुलावर बिबट्याने () हल्ला केला. सोळा वर्षीय मुलाला घेऊन बिबट्या पसार झाला. सकाळी या मुलाचा मृतदेहच सापडला. त्यामुळ वनविभागाच्या विरोधात रोष व्यक्त केला जात आहे.

बिबट्याने घेतला 16 वर्षीय मुलाचा घास, चंद्रपूर शहरालगतच्या दुर्गापुरात रात्री नेमकं काय घडलं?
बिबट्याच्या हल्ल्यात दुर्गापुरात सोळा वर्षीय मुलगा ठार झाला.
Follow us on

चंद्रपूर : चंद्रपूर शहरालगत (Chandrapur city) असलेल्या दुर्गापुरात (Durgapur) वन्यप्राण्याने काल रात्री हल्ला केला. बिबट्याने रात्री 10 वाजताच्या सुमारास हा हल्ला केला. रात्री ग्रामपंचायत मागील परिसरात राज भडके हा शौचास गेला होता. आरडाओरडा झाल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यानंतर हा प्रकार लक्षात आला. रात्री काही काळ राजच्या शोधासाठी वनपथक व प्रशासनाने शोधमोहीम राबविली. मात्र राजचा कुठलाही पत्ता न लागला नाही. सकाळी पुन्हा वेगवान शोधमोहीम करण्यात आली. काही वेळापूर्वी वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेडच्या उपक्षेत्रीय व्यवस्थापक कार्यालयाच्या मागच्या भागात राजचा मृतदेह आढळला. या घटनेने दुर्गापूर या शहरी भागातील बिबट (leopard) हल्ल्याच्या दहशतीने नागरिक त्रस्त झाले आहेत. वाघ-बिबट हल्ल्यावर वेळीच उपाययोजना न झाल्यास ग्रामपंचायतीच्या स्तरावर उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय.

संतप्त कामगार आले एकत्र

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र परिसरात वाघ-बिबट हल्ले वाढले आहेत. या हल्ल्याच्या निषेधार्थ केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारावर हजारो कामगारांनी निदर्शने सुरू केली आहेत. काल रात्री देखील लगतच्या दुर्गापूर भागातील एका 16 वर्षीय मुलाला बिबट्याने उचलून नेत ठार केले आहे. वनविभाग व केंद्र प्रशासन जोवर वन्यजीवांच्या मुद्यावर ठोस उपाययोजना करत नाही, तोवर काम बंद आंदोलन करण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे. बुधवारी रात्री कोळसा वाहतूक क्षेत्रातील एका कामगाराचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यामुळे कामगार संतप्त झाले आहेत. वीज केंद्र मुख्य प्रवेशद्वारावर हजारो कामगार एकत्र आले आहेत.

वनविभागाच्या विरोधात रोष

कामगार एकत्र येताच पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. कामगार व केंद्र प्रशासन यांच्यात बातचीत सुरू आहे. मात्र संतापलेले कामगार आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. वाघाचा हल्ल्यात कामगाराचा मृत्यू झाला होता. आता बिबट्याच्या हल्लात सोळा वर्षांचा मुलगा गेला. या घटनांमुळं वन्यप्राण्यांविरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

Nitin Gadkari : नागपूर महापालिकेचं तिकीट कुणाला? ज्याच्या मागं जनता त्यालाच, नितीन गडकरींचा इच्छुकांना सूचक इशारा

Bhandara | मोहाडी, लाखांदुरात भाजपची, तर लाखनीत राष्ट्रवादीची सत्ता; मोहाडीतील विजयी मिरवणुकीत चार नगरसेवक का अनुपस्थित?

नागपूर मनपातील स्टेशनरी घोटाळ्याचा अहवाल सादर, घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता, प्रशासनातील अधिकारी अडकणार?