‘…तर मी कार्यक्रम बंद करणार’, गौतमी पाटील हिचा सर्वात मोठा निर्णय

नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात हुल्लडबाजांनी पुन्हा गोंधळ घातल्याची बातमी समोर आली आहे. अहमदनगरच्या नागापूर येथे गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

...तर मी कार्यक्रम बंद करणार, गौतमी पाटील हिचा सर्वात मोठा निर्णय
| Edited By: Chetan Patil | Updated on: Aug 02, 2023 | 12:02 AM

अहमदनगर | 1 ऑगस्ट 2023 : नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात हुल्लडबाजांनी पुन्हा गोंधळ घातल्याची बातमी समोर आली आहे. अहमदनगरच्या नागापूर येथे गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी काही तरुणांनी हुल्लडबाजी करत गोंधळ घातला. हुल्लडबाजांनी इतका गोंधळ घातला की त्यांनी थेट दगडफेक करायला सुरुवात केली. या दगडफेकीत एक महिला किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

या गोंधळामुळे गौतमी पाटीलला अर्ध्यावरच कार्यक्रम बंद करावा लागला. यापुढे आयोजकांनी व्यवस्थित बंदोबस्त ठेवला नाही तर कार्यक्रम रद्द करण्याचा इशारा गौतमी पाटीलने दिला. गोंधळ झाल्यास मी कार्यक्रम घेणार नाही, अशी भूमिका गौतमी पाटील हिने जाहीर केली.

नवनागापूरच्या सरपंचांच्या नातीच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी काही हुल्लडबाजांनी धिंगाणा घातला. विशेष म्हणजे एमआयडीसी पोलीस आणि खाजगी बाउन्सर तिथे असताना त्यांच्यासमोर हुल्लडबाजांनी धिंगाणा घातला.

Follow Us