AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आम्ही उंचीपेक्षा कमी माणसांशी बोलत नाही, अमोल मिटकरी यांनी भाजपच्या या नेत्याला लगावला टोला

मी अकोला शहरात राहतो. गेल्या चार वर्षापासून मी खासदार पाहिलाच नाही. या पाच वर्षात खासदारांनी कुठलाही प्रोजेक्ट आणला नाही.

आम्ही उंचीपेक्षा कमी माणसांशी बोलत नाही, अमोल मिटकरी यांनी भाजपच्या या नेत्याला लगावला टोला
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Jun 02, 2023 | 9:24 PM
Share

गणेश सोनोने, प्रतिनिधी,  अकोला : सत्तेचं गलिच्छ राजकारण करायला भाजपने 2 जूनला हा शिव छत्रपती यांचा राज्यभिषेक सोहळा घेतला आहे. असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लगावला आहे. आम्ही दिलेल्या पत्रालाही त्यांनी केराची टोपली दाखलाचंही मिटकरी म्हणतात. श्री मोहन भागवत यांनी हिंदू राष्ट्र आणि हिंदवी स्वराज्य यातील फरक समजून घेऊन नंतर बोलावे. शिवाजी राजे यांनी निर्माण केलेल राज्य हे कुठल्या एका समाजाचं नसून रयतेचं लोककल्याणकारी स्वराज्य होतं. मोहन भागवत हे नवीन इतिहास संशोधक आहेत.

फरक सिद्ध करून दाखवण्याचे आव्हान

माझी त्यांना विनंती आहे की, निवडणुकीच्या तोंडावर भाजपला पाठबळ देण्यासाठी वाद करू नका. जो तुम्ही शोध लावला याचा खुलासा करा. मोहन भागवत यांनी नवीन जावईशोध लावला. त्यामुळे मोहन भागवत यांनी हिंदू राष्ट्र आणि हिंदवी स्वराज्य यातील फरक सिद्ध करून दाखवावा, असे आव्हान अमोल मिटकरी यांनी दिले.

जितेंद्र आव्हाड यांना बदनाम करण्याचे षडयंत्र

जितेंद्र आव्हाड यांच्यावर सिंधी समाज आक्रमक झाला आहे. त्यावर मिटकरी म्हणतात की, भाजपच्या आयटी सेलने जो व्हिडिओ मॉर्फ केला आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. जितेंद्र आव्हाड यांना बदनाम करण्याचा षडयंत्र असल्याचाही आरोप यावेळी मिटकरी यांनी केला आहे.

चार वर्षांपासून खासदार पाहिला नाही

सध्या मोदी सरकारला नववर्षे पूर्ण होत आहेत. त्यासाठी भाजपकडून नऊ वर्षात केलेल्या कामाचा आढावा सादर करण्यात येत आहे. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार म्हणाले, मी अकोला शहरात राहतो. गेल्या चार वर्षापासून मी खासदार पाहिलाच नाही. या पाच वर्षात खासदारांनी कुठलाही प्रोजेक्ट आणला नाही. पक्षाचे लोक म्हणतात की ते बिमार आहेत. पक्षाने त्यांच्या पक्षातीलच एखाद्याला खासदार बनवावं, अशी मागणी यावेळी मिटकरी यांनी केली आहे.

नितेश राणे यांचा घेतला समाचार

आमचा चेक बाउन्स नाही होत. असा टोलाही नितेश राणे यांनी मिटकरी यांना लगावला आहे. त्यावर मिटकरी यांनी नितेश राणे यांचा चांगला समाचार घेतला. माझी उंची पाच फूट सहा इंच आहे. माझ्या उंचीपेक्षा कमी उंचीच्या माणसांशी बोलत नसल्याचा टोलाही अमोल मिटकरी यांनी नितेश राणेंना लगावला आहे.

Follow Us
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान