Amravati DCC Bank election : यशोमती ठाकूर यांची हॅट्रिक; मात्र ‘सत्ता अजून स्थापन व्हायचीय’, बच्चू कडू नवा डाव टाकणार?

| Updated on: Oct 05, 2021 | 5:18 PM

यशोमती ठाकूर व काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या सहकार पॅनलने बाजी मारत 21 पैकी 13 जागांवर विजय मिळवत बँकेत आपली सत्ता अबाधित ठेवलेली आहे.

Amravati DCC Bank election : यशोमती ठाकूर यांची हॅट्रिक; मात्र सत्ता अजून स्थापन व्हायचीय, बच्चू कडू नवा डाव टाकणार?
यशोमती ठाकूर_बच्चू कडू
Follow us on

अमरावती: अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निकाल आज हाती आलेले आहेत. या निकालात जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर व काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या सहकार पॅनलने बाजी मारत 21 पैकी 13 जागांवर विजय मिळवत बँकेत आपली सत्ता अबाधित ठेवलेली आहे. जिल्हा बँकेच्या या निवडणुकीत सातशे कोटी गुंतवणूक प्रकरणी सव्वातीन कोटी रुपयांची दलाली खाल्ल्याचा आरोप करण्यात आला होता. बँकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा प्रचार परिवर्तन पॅनलने सातत्याने केला होता.सहकार पॅनलला13 जागा मिळाल्या असल्या तरी सत्ता अजून स्थापन व्हायची आहे.राजकारणात कधीही गुणाकार बेरीज होऊ शकते, असं म्हणत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बँकेतील पुढील राजकारण कसे असेल याचे संकेत दिले आहेत. बँकेत पुढच्या काळात गैव्यवहार होणार नाही याची आपण पुरेपूर काळजी घेऊ, असे देखील राज्यमंत्री बचू कडू यांनी सांगितले.

सहकार पॅनल शेतकऱ्यांसाठी काम करणार

अमरावती जिल्हा बँक निवडणुकीत बँकेचे माजी अध्यक्ष बबलू देशमुख व उत्तरा जगताप यांच्या वर ED ने नोटीस बजावल्या आहेत असे आरोप करण्यात आले. मात्र, विरोधकांचे सर्व आरोप नाकारत मतदाराणी आम्हाला निवडून दिले आहे. बँकेत कोणताही भ्रष्टाचार झाला नाही पालकमंत्री यशोमती ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली आमचे पॅनल शेतकऱ्यांसाठी काम करणार आहे,असं माजी अध्यक्ष बबलू देशमुख यांनी सांगितले.

विरोधकांचे बिनबुडाचे आरोप

जिल्हा बँक निवडणुकीत पालकमंत्री यशोमती ठाकुर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.बँकेत चांगल्या पद्धतीने काम केले मात्र विरोधकांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत.बँकेने शेतकऱ्यांसाठी काम केले येत्या काळात महिलांच्या बचत गटाच्या माध्यमातून सक्षम करु, असे यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

एकूण जागा 21

सहकार पॅनल 13
परिवर्तन पॅनल 5
अपक्ष 3

विजयी उमेदवार

सहकार पॅनल

चांदुर रेल्वे -वीरेंद्र जगताप

धामणगाव -श्रीकांत गावंडे

अमरावती -सुनील वऱ्हाडे

भातकुली -हरिभाऊ मोहोड

चिखलदरा -दयाराम काळे

दर्यापूर -सुधाकर भारसाकळे

तिवसा -सुरेश साबळे

बबलूभाऊ देशमुख- ओबीसी मतदार संघ..
बळवंत वानखडे अनुसूचित जाती,पुरुषोत्तम अलोणे विमुक्त जाती,
प्रकाश काळबांडे- सहकारी पत संस्था…

महिला राखीव..

सुरेखा ठाकरे, मोनिका मर्डिकर…

परिवर्तन पॅनल

राज्यमंत्री बच्चू कडू -चांदूरबाजार,
जयप्रकाश पटेल -धारणी सेवा सह.
रवींद्र गायगोले – व्यक्तिगत मतदार संघ
चित्रा डहाणे -मोर्शी सेवा सहकारी संघ…
अजय मेहकरे अंजनगाव सेवा सहकारी…

अपक्ष विजयी उमेदवार

अभिजीत ढेपे नांदगाव खडेश्वर
नरेशचंद्र ठाकरे – वरूड
आनंद काळे अचलपूर..

फटाके फोडण्यावरून पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद

अमरावती जिल्ह्या मध्यवर्ती सहकारी बँकेची मतमोजणी आज सकाळ पासून गाडगे महाराज सभागृहात सकाळ पासून सुरू झाली होती. दुपारी 2 वाजताच्या सुमारास सहकार पॅनलचे काही कार्यकर्ते आंदोस्तव साजरा करीत असताना पोलिसांनी त्यांना हटकले. या कारणावरून पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू झाला. हाच वाद सुरू असताना बँकेचे माजी अध्यक्ष बबलू देशमुख व सहकार पँनल चे प्रमुख यांचा एका व्यक्तीने अभिनंदन केले व त्याच वेळेस त्यांचा खिसा कापण्याचा प्रयत्न झाला. कार्यकर्त्यांनी त्या खिसेकापू व्यक्तीला कार्यकर्त्यांनी मारहाण सुरू केली आणि यावेळी पोलिसांनी गर्दी पांगवण्याकरिता सौम्य लाठीचार्ज केला यात बबलू देशमुख यांच्या सह त्यांच्या पुतण्याला ही लाठीचार्जचा सामना करावा लागला.

इतर बातम्या:

Amravati DCC Bank Election : अमरावती जिल्हा बँक निवडणूक; विजयानंतर बच्चू कडूंची पाहिली प्रतिक्रिया

Amravati DCC Bank election : बच्चू कडू जिंकले, पण पॅनलचं काय? यशोमती ठाकूरांच्या पॅनलला कडवं आव्हान

Amravati DCC Bank election result live updates Yashomati Thakur register victory Bacchu Kadu Panel won five seats