चिंचेच्या झाडावर चढून सत्याग्रह, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल, आंदोलनाचे कारण काय?

| Updated on: May 04, 2023 | 8:25 PM

आपल्यावर प्रेम करणारी माणस प्रेम करतात. तेव्हा हा विश्वासघात वाटतो. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर आलंच पाहिजे.

चिंचेच्या झाडावर चढून सत्याग्रह, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल, आंदोलनाचे कारण काय?
Follow us on

धाराशिव : शेतकरी बलवंत थिटे यांनी चिंचेच्या झाडावर बसून सत्याग्रह आंदोलन सुरू केलंय. ते म्हणाले, मी आपला चाहता. आपण पंतप्रधान व्हावेत, यासाठी प्रण केला होता. आज आपण, राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आपण त्या पदावरून दूर होत असल्याचं जाहीर केलं. पण, हे करत असताना पक्षातल्या एक-दोघांना तरी विश्वासात घेणं अपेक्षित होतं. पण, आपण सुप्रिया सुळे आणि अजित पवार या दोघांनाच विचारात घेतलं. पक्ष म्हणजे घर नव्हे. आपल्यावर प्रेम करणारी माणस प्रेम करतात. तेव्हा हा विश्वासघात वाटतो. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर आलंच पाहिजे. यासाठी मी माझ्या शेतातील चिंचेच्या झाडावर बसून सत्याग्रह आंदोलन करत आहे.

आपण दुसरा अध्यक्ष नेमालं. दुसरा अध्यक्ष नेमणे योग्य आहे. पण, आपल्यावर जीवापार प्रेम करणारे जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आपल्यासाठी जीव की प्राण असलेल्या लोकांना विश्वासात घेणे अपेक्षित होते, असं बलवंत थिटे यांचे म्हणणे आहे.

हे सुद्धा वाचा

चिंचेच्या झाडावर चढून आंदोलन

धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील शेतकरी बळवंत थिटे यांनी शेतातील चिंचेच्या झाडावर चढून सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. तो फक्त स्वतःच्या घरातील सांगून. मात्र इतरांना विश्वासात न घेता राजीनामा दिला.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्ते पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा होता. या भावनेतून बलवंत थिटे यांनी आपल्या शेतातील चिंचेवर चढून सत्याग्रह सुरू केलाय. बलवंत थिटे यांनी केलेल्या अनोख्या सत्याग्रहाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे.

त्यावेळी वाढवली होती दाढी

शरद पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या या शेतकऱ्याने यापूर्वी आंदोलन केले होते. त्यावेळी शरद पवार हे पंतप्रधान व्हावे म्हणून. 1993 ते 2014 या काळात आपली दाढी वाढवून शरद पवार यांचे पंतप्रधान पदासाठी समर्थन केले होते.