Video : भाऊ-बहीण दुचाकीवर, पेट्रोलपंपावर गाडी थांबवली, पेट्रोल भरलं आणि……..

| Updated on: May 19, 2021 | 7:23 PM

पेट्रोलपंपावर उभ्या असलेल्या एका दुचाकीला अचानक आग लागली (bike suddenly caught fire near petrol pump).

Video : भाऊ-बहीण दुचाकीवर, पेट्रोलपंपावर गाडी थांबवली, पेट्रोल भरलं आणि........
भाऊ-बहीण दुचाकीवर, पेट्रोलपंपावर गाडी थांबवली, पेट्रोल भरलं आणि........
Follow us on

बुलढाणा : शेगावच्या पेट्रोलपंपावर आज (19 मे) एक मोठी दुर्घटना टळली. पेट्रोलपंपावर उभ्या असलेल्या एका दुचाकीला अचानक आग लागली. विशेष म्हणजे या दुचाकीवरुन दोन बहीण-भाऊ आले होते. त्यांनी गाडीत नुकतंच पेट्रोल भरलं होतं. काही कारणास्तव त्यांनी दोन मिनिटासाठी पेट्रोलपंपाबाहेर गाडी उभी केली होती. यावेळी दुचाकीने अचानक पेट घेतला. या आगीत गाडी जळून खाक झाली. पण सुदैवाने दुचाकी चालक आणि त्याची बहीण बचावली (bike suddenly caught fire near petrol pump).

नेमकं प्रकरण काय?

निमकवळाचे रहिवासी असलेले ऋषिकेश गुरव हे त्यांच्या बहिणीला घेऊन बाईकने निमकवळा येथे जात होते. दरम्यान त्यांनी दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास केवराल पेट्रोलपंपावर गाडी थांबवली. त्यांनी तिथे 100 रुपयांचे पेट्रोल टाकले. त्यानंतर त्यांनी पेट्रोलपंपासमोर दुचाकी उभी केली. यावेळी अचानक त्यांच्या दुचाकीने पेट घेतला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अचानक घडलेल्या या घटनेमुळे पेट्रोलपंपावरील कर्मचारी आणि नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली (bike suddenly caught fire near petrol pump).

आग नेमकी का लागली?

गाडीने पेट घेतल्यानंतर पेट्रोलपंपाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने ती आग विझवण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले. पेट्रोलपंपाजवळ अचानक गाडीने पेट घेतल्याने तिथे गाडीत पेट्रोल भरण्यासाठी आलेले इतर नागरिक संबंधित घटना बघून स्तब्ध झाले. काही नागरिक घटनास्थळापासून लांब पळू लागले. तर काही पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांसोबत आग विझवण्यासाठी पुढे आले. त्यांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. ही आग उष्णतेमुळे की पेट्रोल गळतीमुळे लागली हे अद्यापही समजू शकले नाही.

मोठी दुर्घटना टळली

ऋषिकेश गुरव यांनी दुचाकीत पेट्रोल भरल्यानंतर ते तातडीने त्यांच्या बहिणीला घेऊन निघाले असते तर रस्त्यावरच संबंधित घटना घडली असती. या घटनेत कदाचित त्या दोघी भाऊ-बहिणीला इजा होण्याची शक्यता होती. याशिवाय पेट्रोल पंपाजवळ गाडीने अचानक पेट घेतल्याने घटनास्थळी खळबळ उडाली. पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांनी तातडीने शर्थीने प्रयत्न केले. त्यामुळे पेट्रोलपंपावरील मोठी दुर्घटना टळली.

संबंधित घटनेचा व्हिडीओ बघा :

हेही वाचा : ‘म्युकरमायकोसिस’ रुग्णांना मोठा दिलासा, उपचाराचा सर्व खर्च म. फुले जनआरोग्य योजनेतून होणार, आरोग्यमंत्र्यांची घोषणा