Chandrapur | चंद्रपूर जिल्ह्यात क्रूरतेचा कळस, चक्क कुत्र्याच्या मानेला आणि पायाला दगड बांधून फेकून दिले पाण्यात!

कुत्र्याला दगड बांधून पाण्यात फेकून निर्दयतेने मौज कशाप्रकारे लोक घेत आहेत, हे व्हिडीओमध्ये दिसते आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असल्याची माहिती मिळते आहे, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जातोयं.

Chandrapur | चंद्रपूर जिल्ह्यात क्रूरतेचा कळस, चक्क कुत्र्याच्या मानेला आणि पायाला दगड बांधून फेकून दिले पाण्यात!
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jul 18, 2022 | 3:05 PM

चंद्रपूर : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात एका कुत्र्याला क्रूरतेने दगड बांधून पाण्यात फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोयं. काही युवक व ग्रामस्थ एका नाल्याच्या काठाशी बसून कुत्र्याच्या मानेला व शरीराला दगड बांधून पाण्यात फेकतानाचे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसते आहे. व्हायरल होणारा व्हिडीओ (Video) हा क्रूरतेचा कळस असून हे कृत्य चक्क नाल्याच्या काठाशी बसून केले जातंय. कुत्र्याला (Dog) या प्रकाराची कल्पना आल्याने त्याने प्रतिकार करण्याचा केलेला प्रयत्नही व्हिडिओत दिसतोयं.

कुत्र्याला दगड बांधून पाण्यात फेकून दिले

कुत्र्याला दगड बांधून पाण्यात फेकून निर्दयतेने मौज कशाप्रकारे लोक घेत आहेत, हे व्हिडीओमध्ये दिसते आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असल्याची माहिती मिळते आहे, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जातोयं. चंद्रपूर जिल्ह्यात एका कुत्र्याला क्रूरतेने दगड बांधून पाण्यात फेकल्याचा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला.

कुत्रा पाण्यातून बाहेर आला आणि धूम ठोकली

या व्हिडीओत काही युवक व ग्रामस्थ एका नाल्याच्या काठाशी बसून कुत्र्याच्या मानेला व शरीराला दगड बांधून पाण्यात फेकताना दिसत आहेत. क्रूरतेचा कळस म्हणजे हे कृत्य नाल्याच्या काठाशी बसून असलेले सर्वजण ते कौतुकाने बघत आहेत. कुत्र्याला या प्रकाराची कल्पना आल्याने त्याने प्रतिकार करण्याचा केलेला प्रयत्नही व्हिडिओत चित्रीत झालाय. दगड बांधून पाण्यात फेकून निर्दयतेने त्याची मौज घेतल्याचेही व्हिडीओत दिसत आहे. मात्र, हा प्रकार फसल्याने कुत्रा पाण्यातून बाहेर आला व त्याने धूम ठोकली.