सामाजिक संस्थेच्या पुढाकारातून बालविवाह रोखले, पोलिसांची घटनास्थळी धाव, कुटुंबांचे समुपदेशन

| Updated on: Feb 19, 2022 | 5:20 PM

जिल्ह्यातील सोनपेठ (Sonpeth) शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरामध्ये तीन बालविवाहाचे (child marriages) आयोजन करण्यात आले होते. मात्र पोलिसांच्या (police) सतर्कतेमुळे हे बालविवाह रद्द झाले आहेत. सोनपेठमध्ये एका सामूहिक विवाह सोहळ्यात हे बालविवाह होणार होते. या घटनेची माहिती निर्धार सामाजिक सेवाभावी संस्थेच्या सचिव सत्यभामा सौंदरमल यांना मिळाली. माहिती मिळाल्यानंतर त्यांनी लगेच पोलिसांशी संपर्क साधला

सामाजिक संस्थेच्या पुढाकारातून बालविवाह रोखले, पोलिसांची घटनास्थळी धाव, कुटुंबांचे समुपदेशन
Image Credit source: टीव्ही9
Follow us on

परभणी : जिल्ह्यातील सोनपेठ (Sonpeth) शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरामध्ये तीन बालविवाहाचे (child marriages) आयोजन करण्यात आले होते. मात्र पोलिसांच्या (police) सतर्कतेमुळे हे बालविवाह रद्द झाले आहेत. सोनपेठमध्ये एका सामूहिक विवाह सोहळ्यात हे बालविवाह होणार होते. या घटनेची माहिती निर्धार सामाजिक सेवाभावी संस्थेच्या सचिव सत्यभामा सौंदरमल यांना मिळाली. माहिती मिळाल्यानंतर त्यांनी लगेच चाईल्ड लाईन, सोनपेठ पोलीस आणि महसूल विभागाला संबंधित बालविवाहाबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सबंधित मुला-मुलींच्या आईवडिलांचे समुपदेशन करण्यात आले. समुपदेशनानंतर आई वडिलांनी हा बालविवाह रद्द करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान पोलिसांच्या सतर्कतेमुळे हे बालविवाह रोखण्यात यश आले आहे. बालविवाह रोखण्यात आल्याने सामजिक संस्थाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

तीन अल्पवयीन जोडप्यांची लग्न

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, परभणी जिल्ह्यातील सोनपेठ शहरातील गणेश नगरमध्ये एका सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यात काही अल्पवयीन जोडप्यांची देखील लग्न लवण्यात येणार असल्याची माहिती सत्यभामा सौंदरमल यांना मिळाली होती. त्यांनी याबाबत तातडीने पोलीस आणि जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. माहिती मिळताच पोलीस आणि जिल्हा प्रशासनातील काही अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संबंधित मुलांच्या आईवडिलांचे समुपदेशन केले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी हा विवाह सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

पोलिसांची तातडीने घटनास्थळी धाव

याबाबत माहिती देताना सत्यभामा सौंदरमल यांनी सांगितले की, त्यांना या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये तीन बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाली होती. हे बालविवाह थांबवण्यासाठी त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी देखील वेळ न घालवता तातडीने घटनास्थळी धाव घेऊन हे बालविवाह रोखले. त्यानंतर त्यांच्या आई-वडिलांचे जिल्हा प्रशासन आणि सामजिक संस्थेच्या वतीने समुपदेशन करण्यात आले.

संबंधित बातम्या

Kalyan : रेल्वे प्रवाशांना दमदाटी करून लुबाडणारे तिघे गजाआड, सीसीटीव्हीच्या आधारे अटक, कल्याण रेल्वे पोलिसांची कारवाई

चंद्रपूर जिल्ह्यात वाघ-बिबट्यांची दहशत, दोन दिवसांत तिघांचा घेतला जीव, वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला?

एका दिवसासाठी पत्नी बाहेर गेलेली, परत आल्यावर अज्ञात मुलीची अवस्था पाहून हादरली, पती फरार