शिर्डीत हजारो भाविकांची मांदियाळी; कळस दर्शनासाठी मोठी गर्दी

साई मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी आषाढी एकादशीच्या निमित्ताने भाविकांनी कळस दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र मंदिर आवारात पाहायला मिळत आहे.

शिर्डीत हजारो भाविकांची मांदियाळी; कळस दर्शनासाठी मोठी गर्दी
शिर्डीत हजारो भाविकांची मांदियाळी; कळस दर्शनासाठी मोठी गर्दी

शिर्डी : आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर विठूनामाचा गजर सुरु आहे. मोठ्या प्रमाणावर भाविकांना कोरोना महामारीमुळे सलग दुसऱ्या वर्षी पंढरपूरच्या विठुरायाला भेटता आलेले नाही. तरी भक्त मंडळी आपापल्या परिसरातील मंदिरात कोरोना नियमावलीचे पालन करून विठ्ठल नामाचा गजर करताना दिसत आहेत. शिर्डीतही आज हजारो भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली आहे. (Depression of thousands of devotees in Shirdi; Large crowd for the summit darshan)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची खबरदारी

शिर्डी माझे पंढरपूर अशी श्रद्धा ठेवत हजारो भाविक साईचरणी नतमस्तक झाले. साई मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी आषाढी एकादशीच्या निमित्ताने भाविकांनी कळस दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र मंदिर आवारात पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये याची खबरदारी भाविकांकडून घेतल्याचे दिसतेय. अनेक लोक आपल्या कुटुंबियांना घेऊन हजर झाल्याचेही पाहायला मिळाले. परिसरात पोलीस आणि स्वयंसेवक मंडळी भक्तांच्या सेवेसाठी सज्ज आहेत.

कोरोना संकटमुक्तीसाठी साईदरबारी साकडे

द्वारकामाई मंदिराच्या बाहेर दुपारच्या मध्यान्ह आरतीत असंख्य भाविक सामिल झाले होते. साईनामाचा जयघोष करत भाविकांनी कोविड संकटातून मुक्ती मिळावी असं साकडं साईबाबांना घातले. साई मंदिर बंद असले तरी निर्बंध काहीसे शिथील असल्याने परराज्यांतूनदेखील भाविकांचा ओघ दर्शनासाठी सुरू आहे, दरम्यान दरवर्षी आषाढी एकादशीला निघणारी रथयात्रा कोरोनाचे संकट अद्याप दूर झाले नसल्यामुळे रद्द करण्यात आली आहे. ही रथयात्रा निघू न शकल्याचे नैराश्य हौशी भाविकांच्या चेहऱ्यावर दिसून आले.

मंदिर परिसरात आकर्षक सजावट

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर साई समाधी मंदिर, द्वारकामाई, चावडी तसेच गुरूस्थान मंदिराला दुबई येथील साईभक्त डॉ. अनिता दिनेश यांनी दिलेल्या देणगीतून आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. साई समाधीवर विठ्ठलाचा फोटो ठेवून पाद्यपुजा करण्यात आली. त्याचबरोबर कोट्यवधी रुपयांच्या आभुषणांसोबत साईबाबांच्या मुर्तीला तुळशीमाळांचा श्रृंगार करण्यात आला आहे. तसेच आकर्षक विद्युत रोषणाईने साईबाबा मंदिराचा परिसर उजळून निघाला आहे.

दासगणू महाराजांना साईबाबांनी विठ्ठलरुपात दर्शन दिले होते!

साईबाबांचे समकालीन भक्त दासगणू महाराजांची एकदा पंढरपूर वारी चुकली आणि व्याकूळ झालेल्या दासगणू महाराजांना साईबाबांनी विठ्ठल रुपात दर्शन दिल्याचा उल्लेख साईसतचरित्रात आढळतो. त्यानंतर कवीमन असलेल्या दासगणू महाराजांनी ‘शिर्डी माझे पंढरपूर’ या आरतीची रचना केली. आज‌देखील ही आरती साईबाबांच्या आरतीसोबत म्हटली जाते. पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जावू न शकणारे परिसरातील असंख्य भाविक साईबाबांना विठ्ठल स्वरूप मानून दर्शनासाठी हजेरी लावतात. (Depression of thousands of devotees in Shirdi; Large crowd for the summit darshan)

इतर बातम्या

मनमोहन सिंगांनी कारवाई केली, तुम्हीही कारवाई करा; नवाब मलिक यांचं फडणवीसांना आव्हान

‘Pegasus’ची बातमी निराधार, फोन टॅपिंग काँग्रेसच्या काळातच; देवेंद्र फडणवीस यांचा दावा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI