मनमोहन सिंगांनी कारवाई केली, तुम्हीही कारवाई करा; नवाब मलिक यांचं फडणवीसांना आव्हान

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्हे तर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारच्या काळातही फोन टॅपिगं झाली होती, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पलटवार केला आहे. (nawab malik)

मनमोहन सिंगांनी कारवाई केली, तुम्हीही कारवाई करा; नवाब मलिक यांचं फडणवीसांना आव्हान
nawab malik
Follow us
| Updated on: Jul 20, 2021 | 4:17 PM

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्हे तर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारच्या काळातही फोन टॅपिगं झाली होती, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पलटवार केला आहे. मनमोहन सिंगांच्या काळात कारवाईही करण्यात आली होती. तुम्हीही कारवाई करा, असं आव्हानच नवाब मलिक यांनी फडणवीसांना दिलं आहे. (nawab malik attack devendra fadnavis over phone hacking issue)

नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिलं आहे. मनमोहन सिंग यांच्या काळातही फोन टॅपिंग झाल्याचा दावा भाजप करत आहे. पण मनमोहन सिंग यांच्या काळात झालं तेव्हा त्यांनी ज्यांनी हे प्रकार केले त्यांच्यावर कारवाईही केली. आता केंद्र सरकारने या प्रकरणी कारवाई करावी. नुसतं देशाला बदनाम करण्याचा कट आहे असा दावा करू नये, असा टोला मलिक यांनी लगावला.

केंद्राने हे स्पायवेअर खरेदी केले का?

इस्त्रायलच्या एनएसओ कंपनीच्या पॅगासिस स्पायवेअरद्वारे फोन हॅक केले गेले. केंद्र सरकार म्हणतेय, असे फोन हॅक झाले नाहीत. स्पायवेअर केंद्र सरकारने किंवा त्यांच्या एजन्सीने खरेदी केले की नाही ते सांगावे. पण सरकार ते सांगत नाही. 45 देशात याचा वापर केला जातो, असं भाजपकडून सांगितलं जात आहे. वापर करण्याबाबत आक्षेप नाही. हे स्पायवेअर केंद्राने खरेदी केले असेल तर सांगावे, अशी मागणी त्यांनी केली.

मग त्या आठ देशांची माहिती कशी समोर आली?

टेलिग्राफ कायद्यात देश विरोधी व्यक्तीचे फोन टॅप केले जाऊ शकतात. तशी परवानगी घ्यावी लागते. सरकारने फोन टॅप करायला परवानगी दिली का हे सांगावे. या देशातील पत्रकार, निवडणूक आयोगातील लोक देश विरोधी कारवाया करत होते का? असा सवालही मलिक यांनी केला. हे देशविरोधी कारस्थान आहे, असं भाजप म्हणते. पण इतर 8 देशांची माहितीही कशी समोर आली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

फडणवीस यांनी काय म्हटलं?

पेगसास स्पायवेअरद्वारे राजकीय नेते आणि पत्रकारांचे फोन टॅप केल्याच्या बातम्या आल्याने देशभर खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन फोन टॅपिंगवरून तत्कालीन मनमोहन सिंग सरकारवरच आरोप केले. तसेच काँग्रेसच्या काळात आणि विविध राज्यांमध्ये विविध सरकारांच्या काळात फोन टॅप कसे केले गेले, याची माहितीही दिली. भारतीय संसदेच अधिवेशन डिरेल करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून होतोय. मंत्रिमंडळाचा विस्तार करून सर्व जातीधर्माच्या लोकांना मोदींनी संधी दिली. त्यामुळे अधिवेशन डिरेल करण्याच्या उद्देशान अधिवेशनाच कामकाज डिस्टर्ब केल जात आहे, असं सांगतानाच पॅगसेसच्या बातमीला कोणताही आधार नाही. भारत सरकारची कोणतीही एजन्सी अश्या कोणत्याही पद्धतीची हॅकींग करत नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

भारताला बदनाम करण्याचं षडयंत्र

पेगाससमध्ये 45 देशांचा उल्लेख आहे. पण फक्त भारताची चर्चा होत आहे. जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या हेतून हे होत आहे, असा दावाही त्यांनी केला. एक-दोन मीडिया हाऊसला चाईनीज फंडिंग मिळत असून त्यातू एक बदनामीचा अजेंडा राबवला जात आहे. भारताला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे. अशा बदनामीचा आम्ही निषेध करतो असं सांगतानाच बरोबर अधिवेशनाच्या आदल्याच दिवशी हा रिपोर्ट कसा छापून येतो?, असा सवालही त्यांनी केला. (nawab malik attack devendra fadnavis over phone hacking issue)

संबंधित बातम्या:

फोन टॅपिंग मोदींच्या नव्हे, मनमोहन सिंग यांच्या काळात, देवेंद्र फडणवीसांचा दावा

Pegasus Spyware : एक-दोन मीडिया हाऊसला चायनीज फंडिंग, देवेंद्र फडणवीसांचा मोठा आरोप

Parliament Monsoon Session: फोन टॅपिंग प्रकरणाची जेपीसीकडून चौकशी करा, शिवसेना करणार लोकसभा अध्यक्षांकडे लेखी मागणी

(nawab malik attack devendra fadnavis over phone hacking issue)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.